Posts

Showing posts with the label सार्वजनिक वाहतूक

निर्णय योग्य मात्र अमंलबजवाणीत दिसाळपणा

Image
सध्या महाराष्ट्र एसटी महामंडळाविषयक कोणत्या बातम्या माध्यामध्ये येत आहेत, याचा आढावा घेतल्यास नागरिकांना एन एम सी सी  विषयक समस्यांच्या बातम्यांनी माध्यमे भरून गेलेली आढळत आहेत नागरिकांनी मागणी नोंदवलेली असून देखील त्यांना कार्ड उपलब्ध न होणे, कार्ड तिकीट काढताना स्कॅन न होणे,तिकीट वापरबाबतचे लोकांचे अज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्य अडचणी आणि या साऱ्यामुळे कंडक्टर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सलतीचे तिकीट न देता पूर्ण तिकीट आकाराने यातून प्रवाशी आणि कंडक्टर होणारे वाद ज्याची परिणीती काही वेळा कंडक्टर असलेल्या कर्मचाऱयांनी प्रवाश्यास अर्ध्यताच उतरवायला लावणे या सारख्या बातम्या एसटी विषयक अत्यंत  नियमित झाल्याचे सध्याचे चित्र आहे.  यापूर्वी एसटीचे खासगीकरण करण्याच्या आलेल्या बातम्या तसेच अन्य राज्यात या प्रकारचे कोणतेही कार्ड आवश्यक नसताना महाराष्ट्रात होणारी सक्ती या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या वर  सांगितलेल्या समस्या यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाल्याचे चित्र साधा महाराष्ट्रात दिसत आहे. समोरचा प्रवाशी महिला आहे हे ढळढळीत दिसत असताना अन वयाचा पुरावा  म...

आम्हाला वाहक हवेच!

Image
प्रति  प्रताप सरनाईकजी  परिवहन मंत्री,  महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेशी सप्रेम जय महाराष्ट्र  साहेब मी खासगी क्षेत्रात   नोकरी करत असलो तरी एसटी बसचा चाहता आहे. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल  तिथे प्रवास' या योजनेच्या फायदा घेत महाराष्टाचा  कानाकोपरा अनेकदा पालथा घातला आहे. या प्रवाशामध्ये मला सर्वात जास्त मदत झाली असेल तर ती आपल्या एसटी महामंडळाच्या वाहकांची. आपल्या एसटी महामंडळाचे वाहक हे प्रवाशांसाठी अक्षरशः देवदूत असतात. कोणत्या प्रवाशास कुठे उतरायचे आहे? हे लक्षात घेत अचूकपणे त्याविषयी चालकाला सांगणे आणि प्रवासी पूर्ण उतरला आहे याची खात्री करूनच चालकाला बस पुढे नेण्यासाठी सुचना करणे याबाबत वाहक आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडतात. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. सर्व प्रवाशांनी तिकीटू घेतली आहेत ना ? कोणाचे पैसे देणे बाकी आहे का?  तसेच सध्याचा ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मिश्र जगात पैश्याचे अचुक हिशोब ठेवण्याचे काम आपले वाहक करत असतात. थांबा नसताना देखील कोणत्याही प्रवाश्याने हात दाखवल्यावर त्यास सेवा देण्याचे काम वाहकच करतात मात...

विनाशकाले...

Image
आजपासून साधरणत: आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारने एसटी महामंडळाबाबत एक निर्णय घेतला. महामंडळाच्या जागा खासगी विकासकाच्या माध्यमातून ४९ वर्ष इतक्या दिर्घ मुदतीच्या कराराने विकसीत करण्याचा. मुळात एसटी महामंडळाची आजची आर्थिक स्थिती बघता, महामंडळ पुढचे वर्ष तरी बघू शकेल का?असी स्थिती असताना राज्य सरकारने थेट अर्ध शतक वर्षासाठी महामंडळाची जागा खासगी विकासकांना देण्याचा निर्णय घेतला. या जागा विकसीत करुन त्याद्वारे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली जाईल,असे यावेळी राज सरकारकडून सांगण्यात आले.  कोंबडी रोज एक सोन्याचे अंडी देत असताना सर्वच अंडी एकाचवेळी मिळावी,यासाठी कोंबडीला मारले असता,एकही अधिकचे अंडे न मिळता कोंबडी मरुन जाण्याची कथा आपण पंचततंत्रात वाचली असेल.माझा मते राज्य सरकारचा निर्णय याच पथडीतील आहे.  एसटी महामंडळाच्या जागा शहरात मोक्याचा ठिकाणी आहेत. त्यांचे क्षेत्र ही मोठे आहे.ही गोष्ट विचारात घेता एकेका जमिनीची किंमत डोळे पांढरे करणारी आहे,हे मान्य केले तरी या जमिनीच्या आधारे आर्थिकदृष्ट्यासंपन्न होण्याचे धोक्याचे आहे.देव न करो पण नाशिकचा ठक्कर बझार सारखा हा प्रकल्प फसला तर...

फक्त अनावश्यक सवलती आवरा !

Image
प्रति  देवेंद्रजी फडणवीसजी   मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेशी  जय महाराष्ट्र  साहेब, आपल्या आदेशान्वये, 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळला, नागरिकांच्या बोलीभाषेत एसटीला आपण निधी देणार नसल्याचे जाहिर केले.राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने निधी देत नसल्याचे कारण आपण यावेळी दिले. एसटीने स्वत:हुन उत्पनाचे स्त्रोत शोधावेत असी आपली भुमिका देखील आपण त्यावेळी जाहिर केली.  मुळात एसटीला राज्य सरकारकडे निधी का मागावा लागतो,याचा विचार कराल का, साहेब. राजकीय स्वार्थासाठी नेत्यांकडून विविध सवलती जाहिर केल्या जातात. या सवलतीमुळे एसटीला कमी किमतीत तिकीट संबंधित प्रवाश्यास द्यावे लागते‌.नियमित प्रवाशी वर्गाला जेव्हढा वाहतूक खर्च येतो,तितकाच या सवलती मिळवणाऱ्या प्रवाश्याकडून येतो.मात्र त्या बदल्यात रक्कम मिळत नाही.ती कमी मिळते साहेब.आपले एसटी महामंडळ तब्बल ५२ प्रकारच्या तिकीटात सवलती देते. देशातील कोणतेही राज्य परिवहन महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटात सवलत देत नाही.ज्या आपण देतो साहेब.  लोककल्याणकारी राज्यात गोरगरीब जनतेला सम्मानाचे जगणे जगता ...

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

Image
मा‌.प्रताप सरनाईक, साहेब परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य   सप्रेम जय  महाराष्ट्र  साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यातील एसटी बसचे आर्थिक उत्पन वाढावे, आणि प्रवाश्यांना सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी एसटी बस स्टँडपासून २०० मीटरच्या हद्दीत खासगी वाहतूक होणार नाही, हे बघण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आपण नुकतेच जाहिर केले. एसटीची स्थिती सुधारण्यासाठी आपण उपाययोजना करत आहात,हे बघून आनंद वाटला. आज आपल्या महाराष्ट्रात अनेक पालक आपल्या मुलीला फक्त कमी तिकीट आहे, म्हणून घरापासून दूर असलेल्या गावात शिक्षणासाठी पाठवत आहेत.त्यांना शिक्षणाचा प्रवाहात टिकण्यासाठी एसटी टिकणे आवश्यक आहे. साहेब, मी  एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या मार्फत महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या ४ जिल्ह्याचा अपवाद वगळता आपली महाराष्ट्राची एसटी जाते अस्या राज्याच्या काना कोपऱ्यात आणि राज्याबाहेर अहमदाबाद,सुरत, इंदोर, बेळगाव, बंगळूरू,पणजी, वापी आदी ठिकाणी  फिरलोय. या फिरण्यात मला काही बाबी निर्दसनास आल्या आहेत.ज्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत म...

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग 2)

Image
सध्या आपले महाराष्ट्र सरकार सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहे, हे आपण कालच्या भागात बघितले. कालच्या भागाला वाचकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी मला वैयक्तिक व्हाट्सअप वर प्रतिक्रिया कळवल्या,आणि हा लेख लिहीत असताना देखील कळवत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांचे  मनापसून धन्यवाद.  आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया मला लिहण्यासाठी खुप बळ देतात. असो. कालच्याच लेखात मी मांडु इच्छिणारा मात्र विस्तार भयास्तव न मांडलेला मुद्दा मांडण्यासाठी मी हा लेखाचा दुसरा भाग लिहीत  आहे. तर वाचक मित्र-मैत्रिणींनो, मी एसटी बसचा चाहता आहे. माझ्या फेसबुक अकाउंटवर मी 'माझे प्रवाश्याचे आवडते माध्यम भाग 1 आणि 2' या अल्बमद्वारे  सुमारे २,५०० (हो अडीच हजार ) एसटी बस आणि एसटी विषयक बातम्याचे फोटो अपलोड केले आहेत. एसटी बसच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया या ४जिल्ह्याचा अपवाद वगळता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे.‌तसेच महाराष्ट्राबाहेरील अहमदाबाद, बंगळूरू, इंदौर, पणजी या शहरांना देखील भेटी दिल्या आहेत. हे जेव्हा ...

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

Image
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

Image
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

Image
मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री  महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेसी  साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही‌.झोपायला जे...

रेल्वेच्या रो रो सेवेचा विस्तार करण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट

Image
मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर एक ज्वलनशील टँकर उलटल्राने सुमारे ३६ तास वाहतूक बंद राहिली. या घटनेतून रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेचे महत्त्व पुन्हा अधोरेखीत झाले. काही विशिष्ट पदार्थ घेऊन जाणारे ट्रक रो रो सेवेच्या माध्यमातूनच पाठवाण्याची सक्ती करण्याची गरज आहे. सध्या रेल्वेची रोल ऑन रोल ऑफ (रो रो) ही सेवा प्रामुख्याने कोकण रेल्वेवर वापरली जाते.या सेवेचा विस्तार मुंबई- पुणे सारख्या ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.त्या ठिकाणी सुद्वा  करण्याची गरज आहे. हे आपणास या अपघाताने दाखवून दिले आहे. भारतीय रेल्वे मालवाहतूकीसाठी सात वेगवेगळ्या प्रकारच्या वँगन वापरते.त्यातील BRN या प्रकारच्या वँगनचा उपयोग विविध प्रकारचे ट्रक, रणगाडे वाहून नेण्यासाठी होतो. कोकणामध्ये जी रो रो नावाने परीचीत असणारी सेवा रेल्वेमार्फत देण्यात येते, त्यासाठी या प्रकारचे वँगन वापरले जातात. रो रो  हा शॉर्टफॉर्म आहे. याचे पूर्ण नाव रोल ऑन रोल ऑफ असे आहे. रोल ऑन रोल अर्थात रो रो या सेवेत  ट्रक, कार थेट रेल्वेच्या डब्यावर चढवले जातात. रेल्वे मार्फत इच्छित स्थळी पोहोचल्यावर हे ट्रक पुन्...

सिंहावलोकन २०२५: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

Image
लवकरच आपण ग्रेनियन कॅलेंडर २०२५ निरोप देवून नवीन ग्रेनियन वर्ष २०२६ मध्ये प्रवेश करु.‌या नव्या वर्षात प्रगतीचे विकासाचे नविन ध्येय गाठताना आपण सरत्या वर्षात कुठे होते.हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सरत्या २०२५या वर्षाचा क्षेत्र आणि विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघूया‌.   सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्तवाची बाबा आहे देशातील सर्वच लोक खासगी वाहने घेऊ शकत नाहीत तसेच देशातील रस्त्यांचा विवचार करता हे योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या देशात तर हि बाब अनेक नवीन समस्या निर्माण करते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे तसेच तीत्या त्या प्रदेशातील वाहतुकीचा भर सहन करण्यास सक्षम देखील असावी लागते   वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्या क्लॉनुरूप वाढ तसेचग आधुनिकता येणे आवश्यक आहे आपल्या भारतातील सार्वजनिक व्यवस्था याचा विचार करता वेगाने बदलत आहे अधिक सक्षम होत आहे सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक व्यवस्था कोणत्या प्रकारे बदलली याचा विचार करूया     भारतात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा विचार करता ...

इथेही 56

Image
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार  कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.        एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये‌.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे. देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय‌....

एसटी महामंडळाची उलट गंगा!

Image
    सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे  प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे  महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या  बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो  आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून  प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे‌.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता  हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीचे...

15 नाही 66 टक्के दरवाढ!

Image
       आपल्या महाराष्ट्र एसटीने आपल्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्याची वाढ केल्याची माहिती तुम्हाला असेलच. ही दरवाढ जाहीर करताना, आपल्या महामंडळाने फक्त सर्वसाधारण तिकिटाचीच दरवाढ जाहीर केली होती, आणि एसटी महामंडळाकडून जे पास देण्यात येतात त्यांची दरवाढ नंतर जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. दरवाढ जाहीर केल्यानंतर 4 दिवसांनी अर्थात 29 जानेवारी रोजी महामंडळाने एक परिपत्रक जाहीर प्रसिद्ध करून पासची दरवाढ जाहीर केली..पासची दरवाढ  बघताना, 'आवडेल तिथे प्रवास' या पासामध्ये तब्बल 66% ची दरवाढ करण्यात आलेली आहे असे दिसून आले. जे पूर्णतः अयोग्य आहे.पुर्वी प्रौढांसाठी 4दिवसांसाठीचा शिवशाहीचा पास 1520रुपयांमध्ये होता जो आता 2533 रुपयेला मिळेल. तसेच साध्या बसचा 4दिवसांच्या प्रौढाच्या पाससाठी 1170 च्या ऐवजी 1814 रूपये मोजावे लागतील 7दिवसाच्या प्रौढ साध्या बसचा प्रवास 2040च्या 3171 रुपयांना मिळेल तर 7 दिवसाचा शिवशाही पास 3030ऐवजी 4429रूपयांना मिळेल        एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या या पासचा फायदा घेत, अनेक हौसी प्रवाशी महाराष्ट्राचा कान...

महाराष्ट्राच्या एसटीने गमावलेली संधी

Image
नुकतीच आपल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्यात आली सन 2021 पासून तिकीट दरात वाढ न केल्याचे कारण या निमित्तने देण्यात आले. एसटी महामंडळाचे उत्पन्नाचा मुख्य साधन असणाऱ्या तिकीटांचे दर आणि वाढलेले अन्य खर्च बघता  या समतोल साधण्यासाठी तिकिटाचे दर वाढवणे आवश्यकच होते असेही याबाबत सांगण्यात आले. मात्र या वाढलेल्या तिकीट दरांमुळे महाराष्ट्र एसटीने एक मोठी संधी मात्र गमावलेली आहे हे नाकारता येत नाही ती संधी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार करण्याची, आणि या  विस्तारातून आपला नफा अधिकाधिक वाढवण्याची .आपल्या शेजारील कर्नाटक राज्य हे त्यांच्या प्रादेशिक सीमांचा बाहेर मोठ्या प्रमाणात सेवा देत आपला नफा कमवते मात्र मात्र आपल्या महाराष्ट्र एस टी मध्ये 15 टक्के दरवाढ झाल्याने आपली ती संधी हूकलेली आहे हे सत्य स्वीकारायलाच हवे..     आपल्या भारतातील सर्व एस टी महामंडळाची एक शिखर संस्था आहे ऑल ऑल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन नावाची या ट्रान्सपोर्ट युनियनच्या नियमानुसार आंतरराज्य एसटी बस वाहतुकीचे नियमन होते या नियमानुसार एखाद्या राज्याला...

सिंहावलोकन २०२४ : सार्वजनिक वाहतूक

Image
        लवकरच आपण ग्रेनियन कॅलेंडर २०२४निरोप देवून नवीन ग्रेनियन वर्ष २०२५मध्ये प्रवेश करु.‌या नव्या वर्षात प्रगतीचे विकासाचे नविन ध्येय गाठताना आपण सरत्या वर्षात कुठे होते.हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सरत्या २०२४या वर्षाचा क्षेत्र आणि विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघूया‌.         सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्तवाची बाबा आहे देशातील सर्वच लोक खासगी वाहने घेऊ शकत नाहीत तसेच देशातील रस्त्यांचा विवचार करता हे योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या देशात तर हि बाब अनेक नवीन समस्या निर्माण करते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे तसेच तीत्या त्या प्रदेशातील वाहतुकीचा भर सहन करण्यास सक्षम देखील असावी लागते  वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्या क्लॉनुरूप वाढ तसेचग आधुनिकता येणे आवश्यक आहे आपल्या भारतातील सार्वजनिक व्यवस्था याचा विचार करता वेगाने बदलत आहे अधिक सक्षम होत आहे सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक व्यवस्था कोणत्या प्रकारे बदलली याचा विचार करूया   भारतात मोठ्या प्रमाणात स...

एसटीचे हे बदल आपणास माहिती आहे ना?

Image
          गेले काही दिवस आपण सर्वजण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलो असताना, आपल्या एसटीमध्ये दोन घडामोडी घडल्या आणि एक अफवा पसरली. महामंडळाकडून 'शिवशाही' हा प्रकार बंद करण्यात आल्याचा अफवेबाबत महामंडळाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्याने, मी त्याविषयी बोलणार नाही .महामंडळाने आपल्या  बसेसच्या ताफ्यात केलेला बदलाविषयी फारसे न बोलले गेल्याने, त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन                  तर मित्रांनो, आताआतापर्यत महामंडळ,  अशोक लेलँड, टाटा किंवा आयशर या कंपनीकडुन फक्त चेसीस विकत घेत असे.त्यानंतर स्वत:च्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये त्यावर बस बांधणी करत असे.(एसटीच्या रत्नागिरी, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे स्व मालकीच्या कार्यशाळा आहेत) त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाचा अपव्यय होत असे.खासगी बसवाहतूकदार याच कंपन्यांकडून थेट तयार बस विकत घेत असताना, एसटी या प्रकारचे धोरण अमंलात आणत असल्यामुळे तीचे मोठे नुकसान देखील होत असे.हे नुकसान लक्षात आल्यामुळे, महामंडळाच्या व्यवस्थपकांनी क...