Posts

Showing posts with the label जग

अमेरिकेच्या फायद्यासाठी, अमेरिकेकडून,अमेरिकेतर्फे लादण्यात आलेले युद्ध

Image
सध्या जगभरात अमेरीका- इराणचे युद्ध सुरू आहे, हे आपणस माहिती असेलच.इराणचा सर्वोच्च प्रमुख अयात्तूला खोमोनी हे त्यांच्या देशातील जनतेवर अत्याचार करत आहे‌ त्यावर अमेरिकेने एव्हढे मोठे युद्ध करायचे कारणच काय ?, जिनिव्हा शांती करारानुसार तो त्यांचा अंतर्गत प्रश्न समजून दूर्लक्ष का केले नाही.किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला का दाखल केला नाही? असे प्रश्न आपल्या मनात आले असतील तर सांगतो. अमेरिकेचे 'माझं ऐकत नाही, तूला संपवूनच टाकतो' हे धोरण कारणीभूत आहे त्यास.  स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या देशात अशांतता निर्माण करुन तेथील सत्ताधिश हटवायचा तिथे आपल्या बाहुल्याला राज्याभिषेक करायचा, बाहुला ऐकायचे थांबला,की आपणच राज्याभिषेक केलेल्या बाहुल्याला हटवायचे आणि नवा बाहूल्याला राज्याभिषेक करायचा.जर नवा बाहुला सापडला नाही तर त्या देशाला स्वत:च्या दैवावर सोडुन देयचे. हा या धोरणाचा विस्तार म्हणता येईल. जगभरात अमेरिकेने हेच केले आहे. ईराक, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, व्हेनिझएला, आणि आता इराण हे त्यातील प्रमुख देश म्हणता येईल.ईराकचे सत्ताधिश सद्दाम हुसेनकडे जगाचा विनाश होईल,असी संहारक शस्त्रे आहेत,अस...

सिंहावलोकन २०२५: जागतिक घडामोडी

Image
    नविन ग्रेनियर वर्ष २०२६ सुरु होण्यास आता अत्यंत कमी वेळ शिल्लक राहिला आहे.त्या अर्थाने हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहे.हा आढावा क्षेत्र निहाय घेतल्यास उत्तम ठरेल असे मला वाटल्याने मी तो क्षेत्रनिहाय घेत आहेत.या लेखात आपण जागतिक घडामोडी बघूया २०२५ हे वर्ष जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने निर्णायक ठरले. कोविडनंतरच्या पुनर्बांधणीचा टप्पा संपत असताना जगाने नव्या भू-राजकीय वास्तवाचा सामना केला. जागतिक GDP वाढ सरासरी ३ टक्क्यांच्या आसपास स्थिरावली असली, तरी अमेरिका, चीन, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यातील वाढीचे दर असमान राहिले. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुमारे २ टक्के वाढीसह स्थिर राहिली, तर चीनची वाढ ४.५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान मर्यादित झाली. रशिया-युक्रेन संघर्ष आणि मध्य-पूर्वेतील अस्थिरता यामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला. कच्च्या तेलाचे दर सरासरी ८०–९० डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिले, ज्याचा थेट परिणाम महागाईवर झाला. अनेक विकसित देशांमध्ये महागाईचा दर ३–४ टक्क्यांपर्यंत खाली आला, मात्र विकसनशील देशांसाठी अन्न व ऊर्जा किंम...

रियल चक दे इंडिया..!

Image
शाहरुख खान यांनी अभिनय केलेला 'चक दे इंडिया', हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा क्रीडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या एका काल्पनिक विजयाची कथा मांडण्यात आली आहे.सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या  महिला आशियाई हॉकी  चॅम्पियनशिप भारतीय महिला संघ मिळवत असलेल्या यशामुळे ती रिल कथा रियल झाली असे म्हणता येण्यासारखी स्थिती आहे.साखळी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून हा मजकुर लिहण्यापर्यत खेळवण्यात आलेल्या ५सामन्यात भारताने सर्वच्या सर्व पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या आणि फार मोठ्या फरकाने धुळ चारली आहे मलेशिया विरुद्ध ४-० दक्षिण कोरिया  ३-२ ,थायलंड १३-० ,चीन ३-०, तर जपान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात३-०या फरकाने आपण सामने जिंकल्याने अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे.     आपल्याकडे सध्या निवडणुका सुरू असल्याने या गोष्टीला खूपच कमी जवळपास नाहीच म्हणता येईल अशी प्रसिध्दी देण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्तवाची आहे. एकेकाळी ज्या खेळा...

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

Image
  बांगलादेशच्या   पंतप्रधान   शेख   हशिण   यांनी   देश   सोडला   असून   त्यांनी   भारतमार्गे   लंडनला   प्रयाण   केल्याचे   आपणस   एव्हाना   माहिती   झाले   असेलच .  बंगलादेशमध्ये   लष्कराच्या   मदतीने   काळजीवाहू   सरकार   स्थापन   कऱण्यात   आले   असून   पुढील   सरकार   सत्ता   स्थापन   करेपर्यंत   हे   काळजीवाहू   सरकार   सत्ता   सांभाळेलअसे   या   संदर्भात   विविध   माध्यमामध्ये   सांगण्यात   येत   आहे  .  बांगलादेशमधील   हा   सत्ता   बदल   फक्त   त्या   देशासाठीच   नव्हे   तर   आपल्या   भारतासासाठी   देखील   अत्यंत   महत्वाचा   ठरणार   आहे   .  भारतासाठीचे   बदल   आपण  तीन   प्रकारात   विभाजित   करू   शकतो .  पहिल्या ...

जो बायडान यांच्या माघारीचे कवित्व!;

Image
सोमवार २२ जूलैची सकाळ भारतीयांसाठी मोठ्या धक्क्याची ठरली. डेमोक्रेटीक पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पक्षांतर्गत विरोध, आणि सध्या झालेल्या कोव्हिड १९मुळे निर्माण झालेल्या प्रकृती अस्वाथामुळे हार मानत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आपला पाठिंबा विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना असल्याचे जाहिर केले, आणि जगभर एकच खळबळ उडाली. तसा हा निर्णय अनेकांना अपेक्षीतच होता. नाटो परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलंस्की यांचा उल्लेख पुतीन असा करणे, स्वत:च्या प्रचारादरम्यान उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांंचा ऐवजी ट्रम्प असे उच्चारणे, अनेक चर्चासत्रांमध्ये मध्येच पेंगणे, बोलताना वारंवार अडखळणे‌, सभांमध्ये बोलताना मध्येच काही गरज नसताना मोठा पॉज घेणे. ज आदी काहीसी वृद्धवाची लक्षणे मोठ्या संख्येने दाखवणे, तसेच वयाची ८१वर्ष पुर्ण असणे आदी गोष्टींमुळे त्यांचा उमेदवारीला डेमोक्रेटीक पक्षातूनच मोठा विरोध होत होता.त्यातच आता जगभरातून जवळपास संपलेला कोव्हिड १९ संसर्ग त्...