Posts

Showing posts with the label सिंहावलोकन 2024

सिंहावलोकन,२०२४ :भारत आणि जागतिक परिषदा

Image
      नविन वर्ष २०२५सुरु होण्यास आता अत्यंत मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सरत्या वर्षात आपली काय कय मिळवले, काय काय गमावले याचा आढावा घेतल्यास नविन वर्षात या वर्षात केलेल्या चूका आपण टाळू शकतो‌ जो न्याय वैयक्तिक स्तरावर लागू होतो तोच न्याय मोठ्या स्तरावर विचार केल्यास आपल्या भारत देशाला देखील लागू होतो.देशाचे जवाबदार नागरिक म्हणून आपणास या बाबी माहिती असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेवू भारताचा जागतिक परीषदांमधील सहभाग कोणत्या प्रकारचा राहिला.       या वर्षी  भारत प्रामुख्याने वार्षिक भारत -रशिया समिट ,आशियान समिट, ब्रिक्स समिट शांघाय को ऑपरेशन समिट, क्वाड समिट ,इंडो आशियान समिट, इंडो जी.सी.सी समिट, यु.एन.जी.ए., कॉप २९ या प्रमुख परिषदांमध्ये सहभागी झाला. या वर्षी जूलै महिन्यात २२वी भारत रशिया वार्षिक परीषद रशियाची राजधानी मास्कोला झाली.या परीषदेत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्यात विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली.द्विपक्षीय मुद्यांमध्ये संरक्षण, ...

सिंहावलोकन २०२४: भारत आणि जग (शेजारील देश वगळून )

Image
  आता नवीन वर्ष सुरु होण्यास एका आठवड्या पेक्षा कमी वेळ राहिला आहे पुढील वर्षात आपण या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्या बाबत या वर्षात काय काय झाले याची उजळणी करणे आवश्यक. जी बाब वैयक्तिक आयुष्यात लागू होते,तीच बाब देशासाठी सुद्धा लागू होते.देशाची नविन वर्षात अधिक प्रगती होण्यासाठी देशाची विविध क्षेत्रातील सरत्या वर्षातील कामगिरी जवाबदार नागरिक या नात्याने आपणास माहिती असणे अत्यावश्यक चला तर जाणून घेवूया त्याविषयी.या लेखात मी भारताचे शेजारील देश वगळून अन्य देशांबरोबर भारताचे राजनैतिक संबंध कसे राहिले ?याविषयी सांगणार आहे‌?         तर मित्रांनो, शेजारील देश वगळता अन्य जगाचा विचार करता पश्चिम आशियातील देश हा एक महत्तवाचा घटक आहे.या देशातील कतार या देशाबरोबरचे संबंधात मधूरता आली वर्षाची अखेर होताना, कुवेत देशाकडून  त्यांचा सर्वोच्च नागरी, ' विसम मुबारक अल कबीर' हा पुरस्कार मोदींना देण्यात आला. आखाती देशांनी व्यापारवृढीसाठी गल्फ कंट्री कार्पोरेशन  या नावाने संस्था स्थापन केली आहे.जीला संक्षिप्त स्वरूपात जी.सी.सी. म्हणतात....

सिंहावलोकन २०२४: भारत आणि भारताचे शेजारी देश

Image
                    ग्रेनीयर कॅलेंडर २०२५ सुरु होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे हा कालावधी नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या म्हणता येईल . नव्या वर्षाचे नियोजन अचूक  व्हावे यासाठी आपण सरत्या वर्षाच्या आरंभी कोठे होतो ?या सरत्या वर्षात आपली प्रगती कोठे झाली .?कोठे प्रगती झाली नाही  ? हे माहिती असणे आवश्यक आहे .हे सर्व कळण्याच्या उत्तम मार्ग म्हणजे सरत्या वर्षाचे अवलोकन करणे जी गोष्ट व्यक्तीला लागू होते तीच गोष्ट देशाला देखील लागू होते भारताचे जवाबदार नागरिक या नात्याने आपल्या भारताबाबत आपणास या गोष्टी आपणस माहिती असणे आवश्यक आहे जर आपणास या गोष्टी माहिती असल्यास आपण लोकप्रतिनिधींना त्याबाबत दबाव करू शकतो चला तर जाणून घेउया या सरत्या २०२४ वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशाबरोबर संबंध कसे राहिले ?             या सरत्या वर्षात भारताच्या शेजारील बहुतेक सर्व देशात निवडणुका झाल्या .मार्च महिन्याच्या सुरवातीला बांगलादेशात निवडणुका झाल्या  बांगलादेशात सत्ताधिकारी अवामी लीग ...

सिंहावलोकन २०२४: जागतिक घडामोडी

Image
     नविन ग्रेनियर वर्ष २०२५ सुरु होण्यास आता आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक राहिला आहे.त्या अर्थाने हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहे.हा आढावा क्षेत्र निहाय घेतल्यास उत्तम ठरेल असे मला वाटल्याने मी तो क्षेत्रनिहाय घेत आहेत.या लेखात आपण जागतिक घडामोडी बघूया . सरते वर्ष जागतिक स्तरावर अत्यंत वादळी ठरले .हे वर्ष निवडणूक वर्ष म्हणावे का?इतक्या निवडणूका या सरत्या वर्षात झाल्या           युनाटेड किंग्डम या देशात सत्तांतरण होवून लेबर पार्टिचे सरकार आले कॉन्झरेटिव्ह पक्षाचा अत्यंत दणदणीत पराभव झाला.अमेरिकेत अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आले.बांगलादेशमध्ये अवामी लिग पक्षाने सत्ता तसीच ठेवली.मात्र आरक्षण किमान कमी करावे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला पाकिस्तानात तेथील संसदेच्या निवडणूका झाल्या,ज्यात पाकिस्तान पिपल्य पार्टीचे शहाबाज शरीफ पंतप्रधान झाले. नेपाळमध्ये भारत विरोधी समजणारे पुष्पकमल प्रचंड पंतप्रधानपदी निवडले गेले.निवडल्यावर त्यांनी नेप...

सिंहावलोकन २०२४ :भारताचे आनंदाचे चिंतनाचे,शरमेचे क्षण

Image
1990 पासुन पुढील ५ते ६ वर्षे ज्या २१ व्या शतकाचे गुणगाण केले जात होते‌. त्या २१ व्या वर्षाचे एक चतूर्थांसवे वर्ष म्हणुन ज्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्षाचा आपण उल्लेख करु शकतो त्या २०२५मध्ये आपण लवकरच प्रवेश करणार आहोत.एका अर्थाने हा सिंहावलोकनाचा काळ आहे.मागे बघून काय काय झाले याचा आढावा घेण्याचा हा कालखंड. आपल्या मानवी आयुष्याचा विचार करता कोणत्याही सिंहावलोकनासाठी  वर्ष हा कलावधी उत्तम आहे.चला तर बघुया थोड्याच दिवसात सरणाऱ्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये काय काय घडामोडी घडल्या.मी हा आढावा विषयनिहाय घेणार आहे.या लेखात मी बोलणार आहे.सरत्या वर्षातील आपल्या भारताचे आनंदाचा, चिंतनाच्या दु;खाच्या घटनांविषयी. आपल्या भारतीयांना आनंद होण्याचा अनेक घटना या वर्षात घडल्या. वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यातच जानेवारीत घडली.हिंदूच्या अनेक पिढ्या ज्यासाठी लढल्या,प्रसंगी आपल्या प्राणाचे मोल देखील देण्यास मागे पाहिले नाही ते अयोद्धेथ प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिले‌. त्यानंतर मे महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत नावाजलेल्या फ्रान्सचा फिल्म महोत्सव असलेल्या 'का...

सिंहावलोकन २०२४ :आर्थिक घडामोडी

Image
ग्रेनियर वर्ष २०२४ थोड्याच दिवसात संपेल.नव्या वर्षाची सुरवात करताना या सरत्या वर्षात आपली वाटचाल कसी झाली,?हे आपणास माहिती झाल्यास आपण पुढचे नियोजन व्यवस्थित होईल,आणि नियोजन उत्तम असल्याने आपणास त्याचे फळ देखील उत्तम मिळेल.मात्र या सर्वासाठी आपली सरत्या वर्षातील वाटचाल समजणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी सरत्या वर्षातील विविध क्षेत्रातील विषयातील वाटचाल वेगवेगळ्या लेखाद्वारे मांडत आहे.हा लेख आर्थिक क्षेत्रासाठी. आपले आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून तीन महिने शिल्लक असले तरी आपल्या सर्वांचा आयुष्यात पैश्याचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.अध्यात्मिक क्षेत्रातील लोक यास मोहमाया म्हणत असले तरी पैश्याचे महत्त्व कमी होत नाही.आपल्या सर्व इच्छा आकांक्षाची पुर्ती पैश्यायाद्वारेच होते.जीआर्थिक क्षेत्राशी संबंधित आहे,म्हणून आर्थिक वर्ष संपायला वेळ असला तरी आर्थिक क्षेत्राचा आढावा घेणे आवश्यक आहे.          या वर्षात साधरणत: एप्रिल महिन्यात फिंचद्वारे भारतीय अर्थव्यवस्था वाढीचा दर साडेसहाच्या आसपास राहिल असे भाकित करण्यात आले.देशातील महागाई सातत्याने वाढतच राहिली.किरकोळ महागाईचा निर्दे...

सिंहावलोकन २०२४ : निवडणूका

Image
          आता सुरु असलेले ग्रेनियन कॅलेंडर वर्ष  संपायला मोजकेच दिवस शिल्लक आहेत.नव्या वर्षात पदार्पण करताना आपण काय कमावले,काय गमावले, जे आपल्याला या वर्षात मिळाले ते आपणास मिळाले तर त्याचा वर्तमान स्थितीतच मिळाले असते की,ते दुसऱ्या स्थितीत सुद्धा मिळाले असते याचा आढावा घेतल्यास अनेक चमत्कारी बाबी समोर येतात.या बाबींचा मी क्षेत्रनिहाय आढावा घेत आहे या लेखात निवडणूका हा मुद्दा बघुया.कोणत्याही  लोकशाहीप्रधान देशात निवडणुका या अत्यंत महत्वाच्या समजल्या जातात . हे वर्ष निवडणुकीचे वर्ष म्हणावे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात यावर्षी निवडणुका झाल्या.                         आपल्या भारताचाच विचार करायचा झाल्यास लोकसभेच्या निवडणुकीसह झारखंड, हरियाणा छत्तीसगढ ,  महाराष्ट्र या राज्यासह जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात या वर्षी निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या दरम्यान मतदारांवर विविध घोषणांचा पाऊस पडला साताधिकरी वर्गाकडून विविध योजना या निमित्याने सुरु करण्यात आल्या . लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या ...

सिंहावलोकन २०२४ : सार्वजनिक वाहतूक

Image
        लवकरच आपण ग्रेनियन कॅलेंडर २०२४निरोप देवून नवीन ग्रेनियन वर्ष २०२५मध्ये प्रवेश करु.‌या नव्या वर्षात प्रगतीचे विकासाचे नविन ध्येय गाठताना आपण सरत्या वर्षात कुठे होते.हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी सरत्या २०२४या वर्षाचा क्षेत्र आणि विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बघूया‌.         सार्वजनिक वाहतूक ही कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्तवाची बाबा आहे देशातील सर्वच लोक खासगी वाहने घेऊ शकत नाहीत तसेच देशातील रस्त्यांचा विवचार करता हे योग्य देखील ठरत नाही भारतासारख्या देशात तर हि बाब अनेक नवीन समस्या निर्माण करते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक असणे आवश्यक आहे तसेच तीत्या त्या प्रदेशातील वाहतुकीचा भर सहन करण्यास सक्षम देखील असावी लागते  वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्या क्लॉनुरूप वाढ तसेचग आधुनिकता येणे आवश्यक आहे आपल्या भारतातील सार्वजनिक व्यवस्था याचा विचार करता वेगाने बदलत आहे अधिक सक्षम होत आहे सरत्या वर्षात भारतातील सार्वजनिक व्यवस्था कोणत्या प्रकारे बदलली याचा विचार करूया   भारतात मोठ्या प्रमाणात स...

सिंहावलोकन २०२४ : भारताची खगोलशास्त्रातील प्रगती

Image
  ग्रेनीयर कॅलेंडरवर्ष, २०२४ संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हे दिवस नविन ग्रेनियर वर्ष २०२५मध्ये काय काय करायचे? याचे नियोजन करण्याचे .हे नियोजन करणे सोइस्कर व्हावे यासाठी मागील वर्षातील स्थांनी स्वतःचे उपग्रह प्रक्षेपण तळ उभारणे, खासगी अंतराळ संशोधन संस्थांनी थ्रीडी रॉकेट उभारणे . इसरोस सर्वात उत्तघटना माहिती असणे आवश्यक.चला तर जाणून घेवूया मागील वर्षी काय झाले.मी हा आढावा क्षेत्रनिहाय घेत आहे.या लेखात जाणून घेवूया भारताची   खगोलशास्रातील प्रगती.             भारताचा विचार करता या वर्षी इसरोने आणि भारताच्या खासगी क्षेत्राने प्रगतीचे अनेक नवे टप्पे गाठले . ज्यामध्ये खासगी अंतराळ संसंधोधन संस्थचे मोठे योगदान  सरकारी अंतराळ संस्था म्हणून गौरवण्यात येणे इसरॉयने अन्य देशांचे संशोधन प्रकल्पत अत्यंत महत्वाचे सहकार्य करणे अन्य देशांचे अनेक उपग्रह स्वतःच्या उपग्रह प्रक्षेपण यंत्रणेमार्फत प्रक्षेपित करत मोठ्या प्रमाणात परकीय चलन ,मिळवणे पुन्हा वापरता येईल अश्या उपग्रह प्रक्षेपक यानाची निंर्मिती  आदी गोष्टींचा समावेश कराव...

सिंहावलोकन २०२४ : नैसर्गिक आपत्ती

Image
           लवकरच नविन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष २०२५सुरु होईल. त्यावेळी सरत्या २०२४मध्ये आपणास काय अडचणी आल्या, काय आनंदाचे क्षण आपण अनुभवले  याचा धांडोळा घेतल्यास आपण नविन वर्षाचे स्वागत अधिक उत्तमपणे करु शकु ना ?हीच बाब हेरत मी सरत्या वर्षातील घटनांचा,प्रसंगाचा क्षेत्रनिहाय विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात आपण सरते वर्ष २०२४मध्ये कोणत्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागले.याचा आढावा घेवूया.नैसर्गिक आपापतीचा मानवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात पुर्नवसन करावे लागत असल्याने प्रशाकीय यंत्रणेवर देखील मोठा  ताण येतो त्यामुळे त्या महत्वाच्या ठरतात                       आपण नैसर्गिक आपत्तीचे भूगर्भात घडणाऱ्या घडामोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करून शकतो . भूगर्भात होणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी यांचा समावेश करता येईल तर हवामान बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आपण अवर्षण दुष्काळ, पूर बेम...

सिंहावलोकन २०२४ : क्रीडा

Image
                    लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२५चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना,सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र ,विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील  क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.  हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले                  या वर्षात भारतने १९ वर्षाखालील महिलांच्या गटात (मुलींच्या ) गटात, तसेच प्रौढ पुरुष गटात अश्या दोन गटात विश्वविजेतेतेपद आपल्या खिश्यात टाकले तर आशियाई शालेय  बुद्धिबळ स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक मिळवला बुद्धिबळपटूच्या विचारत करता अत्यंत गौरवाचा समजला  जाणारा २८०० आलो रेटिंगचा टप्पा ओलांडण्याच्या भीम पर...