Posts

Showing posts with the label भारताचे शेजारी

नेपाळची लोकशाही धोक्यात

Image
  नेपाळ, भारताखेरीज हिंदू बहुसंख्य असलेला भारताचा शेजारी. भुतानखेरीज भारतीयांना कायमस्वरुपी व्हिसा फ्री प्रवेश असणारा देश हा नेपाळ सध्या मात्र राजकीय आंदोलनात गटंगळ्या खातोय. तस बघायला गेलो तर नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. मात्र ही व्यवस्था मोडीत काढत देशात सौदी अरेबिया सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसी या प्रकारची राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत. मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत        2001 जून 3 रोजी नेपाळचा भावी राजा दिपेंद्र याने आवडत्या मुलीशी राजघराण्यातील व्यक्ती लग्न करु देत नाहीत, या रागातून राजपरीवाराच्या केलेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या पोकळीपासूनच नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.  त्या हत्याकांडानंतर राज...

सिंहावलोकन २०२४: भारत आणि भारताचे शेजारी देश

Image
                    ग्रेनीयर कॅलेंडर २०२५ सुरु होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे हा कालावधी नव्या वर्षाचे नियोजन करण्याच्या म्हणता येईल . नव्या वर्षाचे नियोजन अचूक  व्हावे यासाठी आपण सरत्या वर्षाच्या आरंभी कोठे होतो ?या सरत्या वर्षात आपली प्रगती कोठे झाली .?कोठे प्रगती झाली नाही  ? हे माहिती असणे आवश्यक आहे .हे सर्व कळण्याच्या उत्तम मार्ग म्हणजे सरत्या वर्षाचे अवलोकन करणे जी गोष्ट व्यक्तीला लागू होते तीच गोष्ट देशाला देखील लागू होते भारताचे जवाबदार नागरिक या नात्याने आपल्या भारताबाबत आपणास या गोष्टी आपणस माहिती असणे आवश्यक आहे जर आपणास या गोष्टी माहिती असल्यास आपण लोकप्रतिनिधींना त्याबाबत दबाव करू शकतो चला तर जाणून घेउया या सरत्या २०२४ वर्षात भारत आणि भारताच्या शेजारील देशाबरोबर संबंध कसे राहिले ?             या सरत्या वर्षात भारताच्या शेजारील बहुतेक सर्व देशात निवडणुका झाल्या .मार्च महिन्याच्या सुरवातीला बांगलादेशात निवडणुका झाल्या  बांगलादेशात सत्ताधिकारी अवामी लीग ...

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

Image
  बांगलादेशच्या   पंतप्रधान   शेख   हशिण   यांनी   देश   सोडला   असून   त्यांनी   भारतमार्गे   लंडनला   प्रयाण   केल्याचे   आपणस   एव्हाना   माहिती   झाले   असेलच .  बंगलादेशमध्ये   लष्कराच्या   मदतीने   काळजीवाहू   सरकार   स्थापन   कऱण्यात   आले   असून   पुढील   सरकार   सत्ता   स्थापन   करेपर्यंत   हे   काळजीवाहू   सरकार   सत्ता   सांभाळेलअसे   या   संदर्भात   विविध   माध्यमामध्ये   सांगण्यात   येत   आहे  .  बांगलादेशमधील   हा   सत्ता   बदल   फक्त   त्या   देशासाठीच   नव्हे   तर   आपल्या   भारतासासाठी   देखील   अत्यंत   महत्वाचा   ठरणार   आहे   .  भारतासाठीचे   बदल   आपण  तीन   प्रकारात   विभाजित   करू   शकतो .  पहिल्या ...

पाकिस्तान होईल का ब्रिक्स चा सदस्य ?

Image
चीन, भारताच्या जागतिक महासत्ता  होण्याच्या वाटेतील मोठा अडथळा  असणारा देश.  स्वतःला जागतिक महासत्ता होण्याचे असल्याने भारताला त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा भारताचा शेजारी देश म्हणजे चीन.सीमेबाबत वाद असला तरी चीनने भारताची महासत्ता होण्याची ताकद ओळखली आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहु शकत नाहीत, त्याप्रमाणे चीन स्वतःच्या  महासत्ता होण्याचा वाटेतील अडथळा अर्थात आपल्या भारताला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच मालिकेत चीनने एक नविन कार्ड नुकतेच खेळले आहे.ते म्हणजे जगात सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागणाऱ्या ,काही महिन्यांपूर्वी ज्या देशाचा पंतप्रधान जगात अक्षरशः कटोरा घेवून भगवान के नाम पर, अल्ला के नाम कुछ देदेरे बाबा भगवान अल्ला तूम्हारा भला करेगा असे म्हणत जगात फिरत होता.त्या पाकिस्तानला ज्या गटाचा एकत्रीत जिडीपी जगात जी 20, जी 7 या दोन गटानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे,त्या ब्रिक्स या गटाचे सदस्यत्व देण्याबाबतची आग्रही भुमिका मांडण्याचे .त्यासाठी तो रशियावर अप्रत्यक्ष दबाव देखील आणत आहे.एकेकाळी रशिया चीन राजनैति...

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

Image
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी...

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

Image
     आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  ने...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा श्रीलंका दौरा का महत्वाचा

Image
              श्रीलंका, आपल्या भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असणारा ,देश .  ज्या देशाने नुकतेच भारतीयांना आपल्या देशात व्हिसाशिवाय प्रवेश असल्याचे जाहीर केले तो देश म्हणजे श्रीलंका (मात्र श्रीलंकेच्या नागरिकांना हा मजकूर लिहण्यापर्यंत भारतात येण्याचे असल्यास व्हिसा आवश्यक आहे ) भारताबरोबर बिमस्टेक {ज्या देशांना बंगालचा उपसागराचा किनारा लागलेला आहे त्या देशाची आर्थिक संघटना म्हणजे बिमस्टेक होय ज्यामध्ये भारताच्या विशेष आग्रहामुळे नेपाळ आणि भूतान या भूवेष्टित देशांना [ ज्या देशांना कोणत्याही बाजूने समुद्रकिनारा नाही ज्या देशांच्या  सभोवताली फक्त जमीन आहे अश्या देशांना भूवेष्ठित (इंग्रजीत LAND LOCK ) म्हणतात ] देखील समाविष्ट करून घेण्यात आले आहे }सार्क,   हिंद महासागर रिम एसोसिएशन (आईओआरए)   आदी विविध संघटनबरोबरचा साथीदार म्हणजे श्रीलंका होय , तर या श्रीलंका या देशाचा  आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर रोजी अधिकृत दौरा केला      मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये आपले परराष्ट्र मंत्र...

भारताचे बांगलादेशाबरोबरचे संबंध अधिक दृढ

Image
           आपला भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याला कारणीभूत ठरले आहे दिनांक १ नोव्हेंबर रोजी भारताच्या मदतीने बांगलादेशात  सुरु झालेले दोन विकासप्रकल्प तसेच ईशान्य भारताशी उर्वरित भारताचा संबध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या बांगलादेशमधील अखूरा ते त्रिपुराची राजधानी अगरताळा या दरम्यान सुरु झालेली रेल्वेसेवा .  व्हिडीओ कन्फसरिंग द्वारे भारतीय प्रमाणवेनुसार सकाळी साडेदहा वाजता तर बांगलादेश प्रमाण वेळेनुसार सकाळी दहा वाजता हे उदघाटन पार पडले . भारताच्या शेजारी प्रथम या तत्वानुसार हि विकासकामे करण्यात येत होती या विकासकामांमुळे चीनच्या भारताच्या शेजारील देशांना आपल्या विळख्यात अडकवून भारताला आपल्या पंज्यात घेण्याच्या कृतीला काही प्रमाणात आळा बसेल         तर मित्रानो बांगलादेशची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प बांगलादेशातील खुणला डिव्हिजन मधील रामपाल या शहरात होणार आहे या प्रकल्पातून १३२० मेगावॉ...

भारत श्रीलंका मैत्री नव्या वळणावर !

Image
         भारत सध्या आपल्या सभोतावली असणाऱ्या शेजारील देशांशी असणारे राजनॆतिक संबंध अधिक धृढ करण्यावर भर देत आहे , हे आपणास विषयीच्या माध्यमामध्ये येणाऱ्या बातम्या बघितल्यास सहजतेने समजते शेजारील देशांशी असणारे नाते  अधिक मधुर करण्याच्या हेतूने त्यांच्याशी दळणवळणाच्या अधिकाधिक सोइ करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे . आजमितीस भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता ते खुणला, कोलकाता ते ढाका आणि न्यु जलपाईगुडी ते ढाका या तीन रेल्वेमार्गावर प्रवासी गाड्या चालवल्या जातात. अगरताळामार्फत बांगला देशातील रेल्वेमार्गाशी भारतीय रेल्वे जोडण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. याखेरीज कोलकाता ते ढाका दरम्यान खासगी आणि सरकारी बससेवाही दोन्ही कडून सुरू आहेत. नेपाळ लाही भारतीय रेल्वेशी जोडण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे.अजमितीस गोरखपूर आणि नवी दिल्ली येथून नेपाळची राजधानी काठमांडू  येथे बससेवा सुरु आहे. आंग्रे आशिया त्यातही म्यानमारशी रस्ते मार्गाने वेगवान संपर्क साधण्याचे कामही सध्या सुरु आहे. याच मालिकेत आता श्रीलंकेचाही समावेश झाला आहे.शनिवार 14ऑक्टोबरला तामिळनाडू च्या ना...

भारत बांगलादेश मैत्री नव्या वळणावर

Image
  बांगलादेश , भारताबरोबर जगातील कोणत्याही दोन देशांतील सिमारेषेचा   किलोमीटर संदर्भात विचार करता दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लांब सीमारेषा असणारा देश . भारताच्या मदतीने स्वतंत्र मिळालेला देश बांगलादेश . तर या बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अद्बुल मोमेन यांनी भारताकडे   बांगलादेश आणि भारताची सीमा , भारत नेपाळ किंवा भारत भुतान प्रमाणे खुली करण्याची मागणी केल्याने , भारत बांगलादेश सबंध पुन्हा एकदा चर्चेत आले . भारत सरकारने नेपाळ आणि भुटानच्या सरकारशी केलेल्या करारानुसार त्या देशातील नागरिक भारतात आणि भारतीय नागरिक त्यांच्या देशात व्हिसाशिवाय सहजतेने जावू शकतात . तिच सवलत भारताने आता बांग्लादेशाला देखील लागू करावी , असा या मागणीचा अर्थ आहे . भारताने असी सवलत   बांग्लादेशाला दिल्यास बांगलादेश देखील भारतीयांना ही सवलत लागू करेल , असे या मागणीच्या वेळी बांगलादेशाकडून सांगण्यात आले आहे ‌.     सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असली , तरी नजीकच्या भविष्...