Posts

Showing posts with the label व्यक्तिरेखांवर आधारित

आयुष शेट्टी : भारतीय बॅडमिंट क्षेत्रातील नाव उगवता तारा

Image
१७ ऑगस्ट २०२६ हा दिवस भारतासाठी सुवर्णक्षणांनी नोंदवण्यात येईल कारण नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशप मध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात भारतीय गेल्या कित्येक वर्षापासून चमकदार कामगिरी करत होतेच त्यामध्ये ॲथलेटिक्स ची भर पडल्याची आपण या कॉमनवेलमध्ये बघितलेच आता यामध्ये बॅडमिंटनची सुद्धा भर पडलेली आहे हे आपण या बॅडमिंटन चॅम्पियनशॉपमध्ये बघता आहोतच. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असाल मोदीविरोधक असाल मोदीचे समर्थक असाल भारतीय खेळाडूंकडे ज्या पद्धतीने सध्या लक्ष देण्यात येत आहे हे नाकारू शकत नाही भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जी कामगिरी करत आहेत ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्याची ही झलक आपणास विविध स्पर्धांमध्ये भारतीयांनी घेतलेल्या पदकांमध्ये दिसत आहेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनशिपमध्ये पहिल्या दिवशी सर्वचभारतीय खेळाडूंनी आपले सामने खिशात घातलेले असले तरी यामध्ये उठून दिसला तो 21 वर्षीय आयुष शेट्टी गेल्या काहीही स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत असणाऱ्या आयुषची कामगिरी याही स्पर्धेत अत्यंत उठावदार होत आ...

शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध !

Image
शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध ! शीर्षक वाचून गोंधळलात पडला का,? आधीच जगात दोन युद्ध सुरु आहेत.एक आहे गेल्या साडेतीन वर्षापासून सुरु असलेले रशिया -युक्रेन युद्ध आणि दुसरे म्हणजे इराण विरूद्ध अमेरिका इस्राइल हे युद्ध .या दोन्ही युद्धामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.आता पुन्हा नवीन  युद्ध होणार म्हणजे फक्त त्रास त्रास आणि त्रासच .असा विचार येत असेल तर जरा थांबा. या युद्धामुळे तूम्हाला त्रास होणार नाही तर आनंदच मिळणार आहे.बौद्धिक आनंदाचा अनुभव तूम्हाला या युद्धातून तूम्हाला घेता येणार आहे. 'गर्व से कहो हम भारतीय है' असे अभिमानाने म्हणत तिरंगा फिरवण्याची संधी तूम्हाला या युद्धामुळे मिळणार आहे.भारतीयांची बुद्धीची दखल जगाला आदराने घेण्याचा प्रसंग या युद्धामुळे  होवू शकतो.   हे युद्ध शस्त्रांनी लढले जाणार नाही.तर बुद्धीने  लढले जाणार आहे. आता बुद्धीने लढले जाणारे युद्ध म्हटल्यावर तूम्हाला वाटले असेल ए.आय.चा वापर असेल,गेला बाजार एकमेकांचा महत्त्वाच्या प्रणालीत सायबर अटॅक करून त्या निकामी करणे असेल.किमानपक्षी रॉकेट उडवून दुसऱ्याचे उपग्र...

शाहण्याच्या सायक्राटिस्टची चटका लावून जाणारी एक्झिट

Image
 "बाबुमोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह... उसे न आप बदल सकते हैं न मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बँधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं जानता।  मृत्यूचे वास्तव सांगणारा हा १९७१ साली प्रदर्शित 'आंनद ' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा डायलॉग.  आपल्यापैकी प्रत्येकजणच कधीना कधी हे जग सोडून जाणारच आहे. मृत्यू येणार हे निश्चित आहे मात्र तो कधी येणार हे मात्र अनिश्चित आहे. हे दाखवून देतो.  या अनिश्चितेचा फटका १५ मे रोजी सकाळी अनेकांना बसला. कारण होते अनेकांना मानसिक त्रासातून बाहेर काढत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यास शिकवणारे ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची कॅन्सरची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाल्याचे  मी त्यांचे आत्मचरित्र 'शहाण्यांच्या सायकॉस्टीक' हे वाचले आहे. जीवनातील कटू त्रासदायक अनुभवांना शांतपणे सामोरे कसे जायचे हे आपणास त्यातून समजते.  आयुष्यातील अडचणीचा त्रासाचा बागुलबुवा ना उभा करता किंबहुना समोरच्याला त्याबाबत शंका देखील ये...

आता फक्त ५ बाकी!

Image
सध्या भारतीय बुद्धिबळ विश्वाला अत्यंत सोन्याचे दिवस आले आहेत ,असे म्हंटलेतर अतिशयोक्ती होणार नाही किंबहुना भारतीय बुद्धिबळविश्व आता अत्यंत सोनेरी क्षण अनुभवत वेगाने जगाच्या अनभिषक्त सम्राटपदावर विराजमान होण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे असे म्हंटले तरच तो भारतीय बुद्धिबळ विश्वचा योग्य शब्दात केलेला गौरव ठरेल अशी आजची स्थिती आहे . महिलांच्या विश्वचषकावर भारतीय महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने नाव कोरल्यावर, अगदी थोड्याच दिवसात बुद्धिबळ विश्वातील दुसरी महत्वाची स्पर्धा असलेल्या कॅन्डीडेट स्पर्धेवर ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली हिने नाव कोरले .सायप्रस या देशात झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवूनग्रँडमास्टर भारतात येत नाही तोच अजून एका आनंदाच्या बातमीने  भारतीय बुद्धिबळ विश्वाला  आनंदाला पारावरच राहिला नाही /ती होती भारताला अजून एक ग्रँडमास्टर मिळाल्याची .       अरोण्यक  घोष भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २००३ मध्ये जन्मलेले  अरोण्यक सध्या २२ वर्षांचे  आहे. 'बँकॉक चेस क्लब ओपन २०२६' स्पर्धेत त्यांनी आपला  अंतिम 'GM नॉर्म' (ग्रँडमास...

महाराष्ट्राने गमवला एक अष्टपैलू हिरा

Image
माझी २८ जानेवारीची सकाळ उजाडली ती एका धक्कादायक बातमीने. सकाळी ऑफिसाठी तयार होत बसस्टॉपवर बसची वाट बघत असताना,एका जवळच्या मित्राचा फोन आला. मित्राने त्याने  ऐकलेल्या एका बातमीचा खरेपणा समजून घेण्यासाठी फोन केला होता. बातमी होती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची.  फोन केल्यावर बातमी खरी आहे का, हे बघण्यासाठी न्युज चॅनल चे युट्यूब चॅनेल बघितल्यावर दुर्देवाने ती खरी असल्याचे समजले आणि  मी राष्ट्रवादीचा समर्थक नसलो तरी वाईट वाटले   स्व पक्षातील असो किंवा विरोधक सर्वच जणांशी त्यांच्या दांणगा जनसंपर्क होता.‌जनतेसाठी ते कायम उपलब्ध असायचे. त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरु होयचा.सरकारी अधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामन्य जनता यांच्याशी भेटायला ते पहाटे सहापासून  सुरूवात करायचे.   अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून कारकिर्द अत्यंत धाडसी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेली म्हणून ओळखली जाईल. विक्रमी पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवले‌‌. संघटनात्मक कौशल्य, जलद विकासकामे आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे दादा 'ॲक्शन-ओ...

खगोलातील अढळ तारा निखळला

Image
खगोलशास्त्रप्रेमींची मंगळवार 20 मेची सकाळ उजाडली,ती एका दुर्देवी बातमीने.  डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाच्या बातमीने        खगोलशास्त्रप्रेमींना त्यातही मराठी जनांना आपल्यातीलच कोणीतरी भावना दाटून आली.    जगविख्यात शास्त्रज्ञ असून देखील आलेल्या पत्रांना आवर्जून उत्तर देणारे व्यक्तीमत्व म्हणून डॉ. नारळीकर विख्यात होते.डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. पालकांच्या या ज्ञानाचा प्रभाव बालपणी डॉ जयंत नारळीकरांवर पडला.नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार ...

पंडित नेहरू थोरच

Image
  नुकतेच पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समाजकार्य असणाऱ्या एक ज्येष्ठ छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी एक विधान केले ज्या विधानामुळे महाराष्ट्र्रात मोठ्या प्रमाणत वादंग उठला . त्या विधानामुळे भारताच्या आतापर्यतच्या वाटचालीत पंडित नेहरूंचे योगदान नक्की किती ? या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली त्याविषयीची वस्तुस्थिती सांगण्यासाठी हे लेखन पंडित नेहरू थोरच     तर मित्रानो , पंडित नेहरूंच्या कार्यकाळात पंडित नेहरूंच्या काही चुका झाल्या हे मान्य केले तरी त्यांचे योगदान पूर्णतः नाकरण्यासारखे नाही . दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात ९० देश वसाहतवादातून स्वतंत्र झाले या देशांनी लोकशाहीची वेगवेगळी स्वरूपे स्वीकारली . काही देशांनी अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली तर भारतासारख्या काही देशांनी इंग्लडच्या धर्तीवर लोकशाहीची पद्धत जिला वेस्ट मिनिस्टर पद्धत म्हणतात ती स्वीकारली आज त्यानंतर सुमारे ७० ते ७५ वर्षांनी त्या त्या देशातील...