Posts

Showing posts with the label बदलता भारत

त्यांचा अनुभवातून आपण शिकणार ना ?

Image
मी आपणाशी हा संवाद साधताना (17सप्टेंबर ) उझबेकिस्तान देशातील समरकंद या शहरात 46 व्या बुद्धिबळ ओलंपियाडची सुरुवात झाली आहे.  तर जपानमध्ये आशियाई खेळाची सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. स्पर्धांच्या आयोजनाचा विषयीचा ज्या बातम्या या स्पर्धेच्या आधी आल्या. त्या कोणत्याही जागतिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशासाठी खूप काही शिकवून देणाऱ्या होत्या. खेळाडूंना राहण्यासाठी योग्य सुविधा नसणे हा मुद्दा दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. बुद्धिबळ ओलंपियाड चा विचार करता नाशिकचे भूषण ग्रँडमास्टर विदित गुजराती यांनी केलेले ट्विट आपणास खूप काही शिकवून जाते. समरकंद येथे होणाऱ्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये आयोजकांकडून भारतीय संघाला खूप उशिरा राहण्याची सोय करून देण्यात आली. आणि ही फक्त भारताचीच तक्रार नव्हती अन्य देशातील खेळाडूंनी सुद्धा समरकंद येथील राहण्याच्या सोयीबाबत ना पसंती दर्शवली आहे जपानमध्ये सुद्धा खेळाडूंना राहण्यासाठी हॉटेल रूम नाही तर जहाजे आणि अन्य तंबूमध्ये राहण्याची सोय केल्याच्या बातम्या येत आहेत.  हॉटेलमधील रूम्स देखील खूप छोट्या आणि असूविधांनी परिपूर्ण...

दक्षिण आशियाचे राजकारण बदलवणारे वर्ष २०२४

Image
                 नविन वर्ष सुरु होण्यास अजून पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक असला तरी येणारे नवीन वर्ष २०२४ फक्त भारतासाठीच नव्हे तर समस्त दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.याबतच्या  घटना घडण्यास सुरवात झाल्याने त्यांची  माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आपल्या भारतासह भुटान,बांगलादेश, पाकिस्तान या देशात त्यांच्या संसदेच्या निवडणूका तर श्रीलंकेत त्यांच्या राष्ट्रपतींची निवडणूक या२०२४ मध्ये होणार आहे.या निवडणूकांमध्ये त्या त्या देशांतील समस्त राजकीय जीवन बदलण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे वर्ष २०२४ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.  त्यातील भुटान या देशातील निवडणूका या भारत आणि दक्षिण आशियावर फारस्या परिणाम करणाऱ्या नसल्याने आणि भारतातील निवडणूकांबाबत अजूनही फारसी वातावरणनिर्मिती न झाल्याने त्या दोन निवडणूका काहीस्या बाजूला ठेवूया .या निवडणूकांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशातील निवडणूका भारतासाठी किंबहुना समस्त दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यावर प्रथम बोलूया         ...

रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.

Image
  सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास , सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते . मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या , त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन .         तर मित्रांनो , आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्   कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे . ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे . जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे . या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते . यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते . ३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतच...

भारताचा दक्षिण अमेरिका खंडात वाढता डंका

Image
  आपल्या भारताच्या जगभरात डंका सातत्याने वाढत आहे . जगभरातील कोणतेही क्षेत्र भारताच्या प्रभावापासून दूर राहिलेले नाहीये . पृथ्वीगोलाचा विचार करता भारताच्या पूर्णतः विरुद्ध असलेला दक्षिण अमेरिका खंड देखील त्यापासून सुटलेला नाहीये याच भागातील   गयाना ,  पनामा , कोलंबिया आणि डॉमिनिकन रिपब्लिक   या देशांना   आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ . एस . जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून एप्रिलच्या शेवटच्या आटवड्यात   अधिकृत भेट देणार आहेत . या देशांना त्यांची ही पहिलीच भेट असेल .   गयानामध्ये ,   21 ते 23   एप्रिल   या दरम्यान    परराष्ट्र व्यवहार मंत्री अनेक मंत्र्यांशी संवाद साधणार आहे . ते त्यांचे समकक्ष यांच्यासमवेत संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सह - अध्यक्ष असतील . श्री ह्यू हिल्टन टॉड हे दोन्ही देशांमधील सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील .    हा    गयाना दौरा भारतासाठी   कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR);...

जी २० आणि भारत

Image
  भारत या वर्षी जी २०चे अध्यक्षपद भूषवत आहे हे एव्हाना सगळ्यांना माहिती असेलच . या अध्यक्षपदाच्या कालावधीत विविध   स्तरावरील अधिकारी मंत्रीगण यांच्या देशभरातील वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या विविध परिषद देखील आता आपणास अंगवळणी पडल्या असतील . या विविध शहारत होणाऱ्या परिषदांमुळे भारताताची जगात एका वेगळी ओळख होत असल्याने आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसलो तरीही एक जवाबदार नागरिक म्हणून आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे ( स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीने एकवेळ स्वतःचे नाव विसरले तरी चालेल मात्र जी २० च्या परिषदेला विसरायला नको स्पर्धा परीक्षेत शहर आणि त्यांच्या विषय आणि आणि कोणत्या शहरात कधी परिषद झालीयावर पूर्व परीक्षेत हमखास प्रश्न येऊ शकतो   )  चला तर मग जाणून घेउया ७ एप्रिल पर्यंतच्या जी २०च्या परिषदा कोणकोणत्या शहरात झाल्या .       भारताला या परिषदेचे अध्यक्षपद मिळाले , १ डिसेंबर २०२२ ला . ते मिळाल्यानंतर अवघ्या ...