Posts

Showing posts from August, 2026

आयुष शेट्टी : भारतीय बॅडमिंट क्षेत्रातील नाव उगवता तारा

Image
१७ ऑगस्ट २०२६ हा दिवस भारतासाठी सुवर्णक्षणांनी नोंदवण्यात येईल कारण नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशप मध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात भारतीय गेल्या कित्येक वर्षापासून चमकदार कामगिरी करत होतेच त्यामध्ये ॲथलेटिक्स ची भर पडल्याची आपण या कॉमनवेलमध्ये बघितलेच आता यामध्ये बॅडमिंटनची सुद्धा भर पडलेली आहे हे आपण या बॅडमिंटन चॅम्पियनशॉपमध्ये बघता आहोतच. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असाल मोदीविरोधक असाल मोदीचे समर्थक असाल भारतीय खेळाडूंकडे ज्या पद्धतीने सध्या लक्ष देण्यात येत आहे हे नाकारू शकत नाही भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जी कामगिरी करत आहेत ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्याची ही झलक आपणास विविध स्पर्धांमध्ये भारतीयांनी घेतलेल्या पदकांमध्ये दिसत आहेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनशिपमध्ये पहिल्या दिवशी सर्वचभारतीय खेळाडूंनी आपले सामने खिशात घातलेले असले तरी यामध्ये उठून दिसला तो 21 वर्षीय आयुष शेट्टी गेल्या काहीही स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत असणाऱ्या आयुषची कामगिरी याही स्पर्धेत अत्यंत उठावदार होत आ...

एका पिढीचा कालखंड सरून देखील समस्या त्याच

Image
कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली  सकाळच्या दिवाळी अंकासाठी फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती .ज्याची मध्यवर्ती कल्पना स्वातंत्र्यदेवता भारतीयांना अरे बाबानो स्वातंत्र्य मिळून आता ५० वर्षे झाली आहेत आता तरी या समस्या कायमच्या सोडवा असे सांगत आहे ही  होती. 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ' असे शीर्षक असलेल्या या सुप्रसिद्ध कवितेला पहिल्यांदा प्रसिद्ध होऊन आता लवकरच ३० वर्षे अर्थात एका पिढीचा कालखंड पूर्ण होईल तर  ज्या घटनेचा संदर्भ घेत हि कविता लिहण्यात आली होती. त्याला ३० वे वर्ष येत्या शनिवारी जेव्हा आपण ८० व स्वातंत्र्यदिन साजरा करत असू तेव्हाच पूर्ण होईल  या ३० वर्षात आपण यात सांगितलेल्या कोणत्या उणिवांवर मात केली .कोणत्या समस्या तेव्हा होत्या त्याच स्थितीत आहेत .कोणत्या समस्या पूर्ण सुटल्या नसल्या तरी त्यात बऱ्यापैकी मात केली आहे तसेच कोणत्या समस्या गेल्या ३० वर्षत अजूनच चिघळला आहेत याचा आढावा घेतला तर समोर येणारे चित्र फार अनुकूल म्हणता येण्यासारखे नाही . असे दुःखाने म्हणावे लागतेय या कवितेत मराठी भाषे...