Posts

Showing posts with the label सामाजिक

एका पिढीचा कालखंड सरून देखील समस्या त्याच

Image
कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली  सकाळच्या दिवाळी अंकासाठी फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती .ज्याची मध्यवर्ती कल्पना स्वातंत्र्यदेवता भारतीयांना अरे बाबानो स्वातंत्र्य मिळून आता ५० वर्षे झाली आहेत आता तरी या समस्या कायमच्या सोडवा असे सांगत आहे ही  होती. 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ' असे शीर्षक असलेल्या या सुप्रसिद्ध कवितेला पहिल्यांदा प्रसिद्ध होऊन आता लवकरच ३० वर्षे अर्थात एका पिढीचा कालखंड पूर्ण होईल तर  ज्या घटनेचा संदर्भ घेत हि कविता लिहण्यात आली होती. त्याला ३० वे वर्ष येत्या शनिवारी जेव्हा आपण ८० व स्वातंत्र्यदिन साजरा करत असू तेव्हाच पूर्ण होईल  या ३० वर्षात आपण यात सांगितलेल्या कोणत्या उणिवांवर मात केली .कोणत्या समस्या तेव्हा होत्या त्याच स्थितीत आहेत .कोणत्या समस्या पूर्ण सुटल्या नसल्या तरी त्यात बऱ्यापैकी मात केली आहे तसेच कोणत्या समस्या गेल्या ३० वर्षत अजूनच चिघळला आहेत याचा आढावा घेतला तर समोर येणारे चित्र फार अनुकूल म्हणता येण्यासारखे नाही . असे दुःखाने म्हणावे लागतेय या कवितेत मराठी भाषे...

एका उत्तम व्यवस्थेवर विनाकारण उडालेले शिंतोडे

Image
       गेला आठवडाभर टीव्हीवर कोणत्या बातम्या दाखवल्या जात आहेत ? याचा आढावा घेतल्यास आपणास सर्वाधिक वेळ पूजा खेडकर यांच्याविषयीच्या बातम्यांनी व्यापलेला दिसतो . या बातम्या देताना काही माध्यमांनी विशेषतः इंग्रजी माध्यमांनी काहीही चूक नसताना , त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला मध्ये खेचले सहजतेने लक्षात येते . मराठी वृत्तवाहिन्यांच्या युट्युब चॅनेलवरील प्रतिक्रिया वाचल्यातर नंतर   सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपणास   बघावयास मिळतात . अमेरिकेत अशी कायम स्वरूपाची   नोकरीची हमी देणारी प्रशासकीय यंत्रणा नाही   मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षे होऊन देखील आपण ब्रिटिशकालीन प्रशासनव्यवस्था का अमलात आणत आहोत अशा त्रागा करणारा एक चर्चेचा कार्यक्रम एका सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीवर तितकाच किंबहुना कणभर जास्तच प्रसिद्ध असलेल्या वृत्तनिवेदकाने केलेला   मी बघितला केंद्रीय लोकसेवा अयोग्य सुद्धा भ्रष्ट झाला आहे सखोल चौकशी केल्यास हिच्यासारखे अजून ५६ अधिकारी सापडतील आय ए एस अधिकारी होणे आता फक्त पैसेवाल्या लोकांचेच काम आहे ज्या हाती पैसा ...

*पूजा खेडकर प्रकरणाने जन्म दिलेले काही प्रश्न*

Image
  लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या , प्रशासनाच्या पोलादी चौकटीत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या समस्त भारतात गाजत आहे . पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडेकर यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती आहे . पंतप्रधान कार्यालयाने एक सदस्यीय आयोग नेमला आहे . आयोगाच्या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास   सेवेतून बडतर्फ करण्यासह ,  नॉन क्रिमीलेयर नसताना नॉन क्रिमीलेयर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवल्यामुळे , खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश केल्यामुळे होणारी कार्यवाही म्हणजेच   दोन वर्ष कारावास तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून सेवेत प्रवेश केल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्षम कारावासाची क्षिक्षा होऊ शकते . आता त्यांना   क्षिक्षा होइल तेव्हा होईल , किंवा त्या निर्दोष ठरतील . आता यातील काय होते ?, ते येणार काळच ठरवेल , त्याबाबत आताच काही भाष्य करणे धाडसाचे ठरेल . असो .    मात्र पुजा खेड...

दर 44 मिनीटांनी एक!

Image
        दर 44 मिनीटांनी एक हा दर आहे 2022मधील विद्यार्थी आत्महत्येचा .4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालातून ही आकडेवारी जगासमोर आली.या अहवालानुसार 2022साली 12,000 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. दर दिवशी 33 तर दर 44मिनीटांनी एक आत्महत्या इतका हा दर भयावह आहे. आपल्याकडे एक टी 20 क्रिकेट मॅच ही साडेतीन तास चालते. या हिशोबाने बोलायचे झाल्यास एका मॅच दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असते.      काही वर्षांपूर्वी आलेल्या थ्री इडियटस् या चित्रपटाद्वारे या गंभीर विषयाला हात घातला गेला होता. त्यावेळी त्यावर काही प्रमाणात चर्चा देखील झाली होती.मात्र कालांतराने सर्व काही थंड झाले‌.त्यावेळी हा गंभीर प्रश्न  सोडविण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना या सोईस्करपणे गुंडाळण्यात आल्या. ज्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख चढताच राहीला. विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न मात्र करण्यात आले.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा ,टेलीफोन हेल्पलाईन सेवा आदि ...

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

Image
आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.            मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय संपले समजून अखेरचा उपाय म...