एसटीचा प्रवास कुणीकडे?
गेल्या सप्टेंबर महिन्यात 22 तारखेला एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यासाठी व्होल्वो बस खरेदी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही खरेदी प्रक्रिया सुरू झालेली असून याबाबत कंपनी निवडण्यात आलेली आहे हे प्रवाशांनाना 14 ऑक्टोबर रोजी व्होल्वो या कंपनीने स्वतःहून जाहीर केलेल्या प्रसिद्धकाद्वारे समजले आणि एकच खळबळ उडाली. व्होल्वो बस कंपनीद्वारे प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात आपली एसटी महामंडळ व्होल्वो बस कंपनीकडून अत्याधुनिक 9600 मॉडेलच्या एकूण 200 खरेदी करणार आहे. त्यापैकी 170 या सीटर प्रकारातील बसेस असून 30बसेस या स्लीपर अधिक सीटर असणार आहेत. खाजगी आणि सार्वजनिक परिवहन सेवेचा विचार करता, एकदम 200 बसेसचे कॉन्ट्रॅक्ट आत्तापर्यंत व्होल्वो कंपनीला आपल्या भारतात कोणीही दिलेले नाही. त्या अर्थाने हा आपल्या महामंडळाने एक पराक्रमच केलेला आहे असे म्हणता येईल. मात्र हा पराक्रम कोणत्या स्थितीत केलेला आहे? याला अत्यंत महत्त्व आहे. या प्रत्येक बसची अंदाजित रक्कम इंटरनेटवर शोधली असता, एक कोटी ती...