एसटीचे हे बदल आपणास माहिती आहे ना?

          गेले काही दिवस आपण सर्वजण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलो असताना, आपल्या एसटीमध्ये दोन घडामोडी घडल्या आणि एक अफवा पसरली. महामंडळाकडून 'शिवशाही' हा प्रकार बंद करण्यात आल्याचा अफवेबाबत महामंडळाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्याने, मी त्याविषयी बोलणार नाही .महामंडळाने आपल्या 
बसेसच्या ताफ्यात केलेला बदलाविषयी फारसे न बोलले गेल्याने, त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन  
               तर मित्रांनो, आताआतापर्यत महामंडळ,  अशोक लेलँड, टाटा किंवा आयशर या कंपनीकडुन फक्त चेसीस विकत घेत असे.त्यानंतर स्वत:च्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये त्यावर बस बांधणी करत असे.(एसटीच्या रत्नागिरी, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे स्व मालकीच्या कार्यशाळा आहेत) त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाचा अपव्यय होत असे.खासगी बसवाहतूकदार याच कंपन्यांकडून थेट तयार बस विकत घेत असताना, एसटी या प्रकारचे धोरण अमंलात आणत असल्यामुळे तीचे मोठे नुकसान देखील होत असे.हे नुकसान लक्षात आल्यामुळे, महामंडळाच्या व्यवस्थपकांनी काही महिन्यापुर्वी अशोक लेलँड कडुन २४०० तयार बसेस विकत घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली.आपण निवडणूकीचा धुराळा अनुभवत असताना, याबाबत प्रशासकीय बाबींची पुर्णता झाल्याने या बसेसचा पहिला टप्पा एसटीला नुकताच मिळाला आहे.पुणे येथील कार्यशाळेत या पहिल्या टप्याची चाचणीदेखील पुर्ण झाल्याने,हा टप्पा आता एसटीने नियमित वापरण्यास देखील सुरवात केली आहे. एसटीकडून या बसेस पुणे परिसरातील तिसरे मोठे आणि महत्तवाचे बसस्टँड असणाऱ्या,पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगर आगाराला देण्यात आल्या आहेत (पहिले अर्थात स्वारगेट आणि दुसरे छ.शिवाजीनगर )या बसेस वल्लभनगरकडून पुणे नाशिक मार्गावर चालवण्यात येत आहेत.चला तर जाणून घेवूया या बसेसविषयी 
            एसटीला देण्यात आलेले अशोक लेलँड कंपनीचे हे मॉडेल ऑयस्टर या प्रकारातील विशेष मॉडेल आहे. जे इतर खासगी बसवाहतूकदार , अन्य परिवहन सेवा, स्कूल बसमध्ये सरार्स आढळते .हे  मॉडेल दिसायला सुबक बांधणीचे आहे. मुळातील लाल रंग तसाच ठेवून त्यावर पांढऱ्या रंगाची छोटी छटा दिल्याने एसटीची या बसेस अन्य खासगी बसवाहतूकदारांसारखेच आकर्षक दिसतात.  समोरील ग्रील काळ्या रंगात न रंगवता लालच रंगात रंगवल्यामुळे बस आणखीन सुरेख झाली आहे आतमधील रंगसंगती ही पांढरी राखाडी अशी आहे. 
          बसमध्ये असलेले २ मोठे हेड लॅम्प तसेच, २ फॉग लॅम्प चालकाला रात्रीच्या प्रवासात नक्कीच मोठी मदत करतील.चालकाला आरश्यातून पाठीमागे पाहण्यासाठी वाहकाच्या बाजूचा मोठा आरसा आणि आरस्यातून बघणे सोइस्कर व्हावे,यासाठी  साह्यभुत ठरेल असा छोटा आरसा,तसेच चालकाच्या बाजुचा आरसा हा चालकाच्या जवळ म्हणजेच अगदी चालकाच्या दरवाज्याजवळच लावण्यात आलेला आहे. रिव्हर्स पार्किंग सेन्सर तसेच पाठीमागील बाजू पाहण्यासाठी पाठीमागे बाहेरील बाजूस वरच्या भागात कॅमेरा लावला आहे. या कॅमेराची स्क्रीन चालकाजवळ लावली आहे.
        बसच्या डाव्या बाजूस बॅटरी कक्ष, टायर(स्टेपनी) कक्ष, सामान कक्ष आणि पुन्हा पाठीमागे चाकानंतर सामान कक्ष असून, उजव्या बाजूस AD Blue कक्ष, डिझेल टाकी, पाठीमागील चाकाच्यानंतर सामान कक्ष अशी योजना केली गेली आहे.दरवाजा हा पुढील चाकाच्या पुढे आहे.त्यावर बसवलेला दरवाजा हा हवेच्या दाबावर आतमध्येच उघडझाप करणारा आहे.त्यामुळे वाहकाची दरवाजा उघडण्याचा त्रासातून सुटका झाली आहे.दरवाज्याचे नियंत्रण चालकाजवळ आहे.
इतर बी.एस ६आणि बी.एस.४ बसेसप्रमाणे वाहकाची सीट ही सिंगल नाही.तर आधीच्या बसप्रमाणे दोन सीट एकत्र अशीच आहे. 
        समान ठेवण्यासाठी बसच्या आतमध्ये छताला दोन्ही बाजूला मोठी जागा असून, मोठ्या बॅगा सहज बसू शकतात.  त्यामुळे प्रवाश्यात मोठे सामान घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यामुळे सहप्रवाश्यास होणारी अडचण सहज दुर होते‌ याशिवाय प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी बस ही एअर सपेन्शन करण्यात आली आहेत. आतमध्ये असणारी आसने ही पुशबॅक पद्धतीची आहेत .आसनांनावर खिडकीजवळ २ यू. एस.बी.मोबाईल चार्जर पोर्ट देवून प्रवाश्यांना आरामदायी प्रवासाची अनुभती देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे.
   खर्च कमी करणे, प्रवाश्यांना आरामदायी प्रवास करण्यासाठी साह्यभुत ठरतील अश्या सोयीसुविधा देण्यासह काळाची दिशा ओळखत पर्यावरणपुरक बससेवा देण्याबाबत देखील आपले एसटी महामंडळ काम करताना सध्या दिसत आहे.‌माध्यमांमध्ये फारशी चर्चेत न आलेली घडामोड त्या संदर्भातच आहे.
    तर मित्रांनो प्रदुषण कमी व्हावे, यासाठी महामंडळाकडुन लिक्विफाईड नॅचरल गॅस अर्थात एल.एन.जी. या इंधनावर कार्य करणाऱ्या पाच बसेस प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येत आहे. या बसेस वल्लभनगर बस आगारामार्फत चालवण्यात येत आहेत. या बसेसचा अनुभवावर पुढील बसेस टप्याटप्याने एल.एन.जी.वर चालवण्यात येणार आहे.सार्वजनिक परीवहनच्या बसेस एल.एन.जीवर चालवण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.या आधी देशभरातील सार्वजनिक परीवहनाच्या बसेस  याकॉंप्रेस नॅचरल गॅस अर्थात सी.एन.जी.वर चालवण्यात आलेल्या आहेत एल.एन.जी.वर नाही.हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 
   आपले महामंडळ प्रदुषण कमी करण्याचा हेतूने तीन टप्यात कार्य करत आहेत.त्यातील पहिला टप्पा इलेक्ट्रीक बसेसचा आहे.जो आपल्या एसटीकडून इ शिवनेरी आणि शिवाई या प्रकारच्या बसेस चालवून मोठ्या प्रमाणात पुर्ण करण्यात आला आहे.पुढील टप्पा सी.एन.जी.वर बसेस चालवण्याचा आहे.ज्या मार्गावर सी.एन.जी सहजतेने मिळू शकतो अस्या नाशिक ते पुणे, छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर या प्रकारच्या बसेस धावताना आपण बघतो आहेच. आता महामंडळाकडून या अखेरच्या टप्याची तयारी सुरु आहे.
  आपल्या महामंडळाच्या बाबत अनेकांचा अनुभव काहीसा वाईट आहे,याची मला पुर्ण जाणिव आहे.आपल्या भारतातीलच अन्य राज्यांच्या एसटी बसेसचा अनुभव सांगत ते करतात तर आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ का करु शकत नाही,असा त्यांचे म्हणणे असते.त्यांना मी सांगू इच्छितो की,त्या महामंडळाकडुंना कोणत्या स्थितीत सेवा देण्यात येते.आपल्या महाराष्ट्र महामंडळाकडून कोणत्या स्थितीत सेवा देण्यात येते याचा त्यांनी विचार करावा.तो केल्यास आपले महामंडळ किती बिकट स्थितीत उत्तम सेवा देत आहेत,हे समजेल. मी वर सांगितलेले बदल आपण याच चष्म्यातून बघितल्यास समजेल आपले एसटी महामंडळ किती उत्तम आहे ,ते..!

(या लेखासाठी 'अवलिया प्रवाशी' या फेसबुकपेज  आणि युट्युब चॅनलचे मोलाचे सहकार्य मिळाले, त्यांचे मन:पुर्वक धन्यवाद)

Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला