महाराष्ट्राच्या एसटीने गमावलेली संधी

नुकतीच आपल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्यात आली सन 2021 पासून तिकीट दरात वाढ न केल्याचे कारण या निमित्तने देण्यात आले. एसटी महामंडळाचे उत्पन्नाचा मुख्य साधन असणाऱ्या तिकीटांचे दर आणि वाढलेले अन्य खर्च बघता  या समतोल साधण्यासाठी तिकिटाचे दर वाढवणे आवश्यकच होते असेही याबाबत सांगण्यात आले. मात्र या वाढलेल्या तिकीट दरांमुळे महाराष्ट्र एसटीने एक मोठी संधी मात्र गमावलेली आहे हे नाकारता येत नाही ती संधी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार करण्याची, आणि या  विस्तारातून आपला नफा अधिकाधिक वाढवण्याची .आपल्या शेजारील कर्नाटक राज्य हे त्यांच्या प्रादेशिक सीमांचा बाहेर मोठ्या प्रमाणात सेवा देत आपला नफा कमवते मात्र मात्र आपल्या महाराष्ट्र एस टी मध्ये 15 टक्के दरवाढ झाल्याने आपली ती संधी हूकलेली आहे हे सत्य स्वीकारायलाच हवे..
    आपल्या भारतातील सर्व एस टी महामंडळाची एक शिखर संस्था आहे ऑल ऑल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन नावाची या ट्रान्सपोर्ट युनियनच्या नियमानुसार आंतरराज्य एसटी बस वाहतुकीचे नियमन होते या नियमानुसार एखाद्या राज्याला दुसऱ्या राज्यात सेवा द्यायची झाल्यास दुसरे राज्य दोन विशिष्ट ठिकाणांमध्ये जो दर आकारते त्याच दराची आकारणी त्या संबंधित राज्याला करावे लागते.त्यापेक्षा कमी किंवा जास्त रक्कम आकारता येत नाही‌ उदाहरणार्थ जर गुजरात राज्य  त्यांच्या राज्यांतर्गत वाहतूकीमध्ये 200 किलोमीटरसाठी 170 175 रुपये आकरत असेल आणि महाराष्ट्र राज्य याच अंतरासाठी राज्यांतर्गत  250 रुपये आकरत असेल तरीही महाराष्ट्र एसटीला गुजरातमध्ये सेवा देतांना 200 किमीसाठी 170 ते 175 रुपयेच घ्यावे लागतील.‌तर गुजरात एसटीला  महाराष्ट्रात 250रुपयेच आकारावे लागतील ते 170ते 175रुपयात सेवा देण्यास सक्षम असले तरी सुद्धा .  महाराष्ट्र च्या एसटीचे आधीच अन्य राज्यापेक्षा जास्तच आहेत दरवाढ झाल्याने त्यात अजूनच मोठी भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्र इतर राज्यांच्य तुलनेत आंतरराज्य बस वाहतुकीत मोठ्या प्रमाणात मागे पडला आहे
        नाशिकहुन थेट कर्नाटक राज्यात जाणारी महाराष्ट्राची एकही बस नाही याउलट नाशिकहून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या कर्नाटक राज्याचा तीन बसेस आहेत. नासिकहुन कर्नाटक मध्ये जाण्याचा मार्गाचा विचार केला असता कोल्हापूरच्या पुढे 25 किलोमीटर पर्यंत महाराष्ट्रच आहे. असे असून सुद्धा नाशिकहून कर्नाटकला जाणारी महाराष्ट्राची एसटी नाहीये. रात्री साडेआठ ते साडेनऊ दरम्यान नाशिकहून अहमदाबादला जाणाऱ्या गुजरात एसटी महामंडळाच्या 4बसेस आहेत तर आपली एकच बस आहे.नाशिकचे उदाहरण मी प्रातिनिधीक स्वरूपात दिले आहे.नाशिकसारखीच परिस्थिती सर्व राज्यात आहे.अन्य राज्यातील एसटी महामंडळे आपल्या राज्यात बस चालवून नफा कमवत असताना नुकत्याच झालेल्या दरवाढीमुळे आपण त्यांना मोकळे आकाशच दिले आहे असे मला वाटतेयं
  गेल्या 4/5वर्षात तिकीटांची दरवाढ केलेली नाही. मात्र गेल्या काही वर्षातील प्राशसनिक खर्च वाढला आहे ही वस्तूस्थिती असली तरी, तिकीट दरवाढीचे अन्य उपाय योजणे आवश्यक होते.देशातील अन्य एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कितीतरी सवलती आपले महामंडळ देते‌ त्यामुळे अनावश्यक सवलती बंद करुन त्या सवलतीचा फायदा घेत प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून नियमीत प्रवाशी भाडे घेणे,तिकीटाबरोबर जाहिराती छापणे, एसटीबसवर जाहिराती छापणे या सारख्या उपाययोजना करुन,निधीची उपलब्धता करणे आवश्यक होते.ते न करता आधीच अन्य राज्यांचा एसटी बस भाड्याचा तूलनेत जास्त असणारे बसभाडे अजूनच वाढवून अन्य राज्यातील एसटी महामंडळांना रान मोकळेच सोडले आहे‌,जे अयोग्यच आहे.

Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला