Posts

Showing posts with the label संकल्पना आधारित विशेष दिन

चला, आत्महत्या या विषयवार मनमोकळा संवाद साधूया !

Image
आत्महत्या फक्त शब्द नाहीये . जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता , त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या होतात . त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात . आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो . हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा , समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो . हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्फे ,(The International Association for Suicide Prevent...

चला स्किझोफेनिया समजून घेउया आणि रुग्णाचा स्वीकार करूया

Image
वाचक मित्र - मैत्रिणींनो तुम्हाला जानेवारी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर , सुरेखा कुडची , प्रदीप पटवर्धन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि अजय फणसेकर दिग्दर्शित ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट किंवा मार्च २००४ साली प्रदर्शित अतुल कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी , देविका दफ्तरदार , तुषार दळवी यांची प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘ देवराई ’ हा चित्रपट आठवतो का ? मी हे विचारतोय कारण हे फक्त करमणूकप्रधान चित्रपट नव्हते , तर माहितीपटाच्या चौकटीत जाणारे ; मात्र त्याचवेळी माहितीपटाचा अवजडपणा दूर सारत मनोरंजन करणारे देखील होते . हे दोन्ही चित्रपट स्किझोफेनिया या गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजाराबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करणारे होते . ‘ रात्र आरंभ ’ हा चित्रपट मराठीतील पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर (Paranoid Schizophrenia) आधारित पहिला चित्रपट मानला जातो , तर ‘ देवराई ’ हा चित्रपट मानसिक आरोग्य विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे आणि मोठ्या प्रमाणात सखोलतेने...