अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग 2)

सध्या आपले महाराष्ट्र सरकार सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहे, हे आपण कालच्या भागात बघितले. कालच्या भागाला वाचकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी मला वैयक्तिक व्हाट्सअप वर प्रतिक्रिया कळवल्या,आणि हा लेख लिहीत असताना देखील कळवत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांचे  मनापसून धन्यवाद. 
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया मला लिहण्यासाठी खुप बळ देतात. असो. कालच्याच लेखात मी मांडु इच्छिणारा मात्र विस्तार भयास्तव न मांडलेला मुद्दा मांडण्यासाठी मी हा लेखाचा दुसरा भाग लिहीत  आहे.
तर वाचक मित्र-मैत्रिणींनो, मी एसटी बसचा चाहता आहे. माझ्या फेसबुक अकाउंटवर मी 'माझे प्रवाश्याचे आवडते माध्यम भाग 1 आणि 2' या अल्बमद्वारे  सुमारे २,५०० (हो अडीच हजार ) एसटी बस आणि एसटी विषयक बातम्याचे फोटो अपलोड केले आहेत. एसटी बसच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया या ४जिल्ह्याचा अपवाद वगळता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे.‌तसेच महाराष्ट्राबाहेरील अहमदाबाद, बंगळूरू, इंदौर, पणजी या शहरांना देखील भेटी दिल्या आहेत. हे जेव्हा इतरांना समजते,तेव्हा हमखास मला एक प्रश्न विचारण्यात येतो  तो म्हणजे एसटी बसच्या थांब्यावर मिळणाऱ्या असुविधतेबाबत.आणि याबाबत काही निर्णय एसटीच्या अधिकृत फेसबुक पेजवर जाहीर केल्याने त्याबाबतचे माझे मत आणि काही प्रमाणात वस्तुस्थिती मांडण्यासाठी हा लेखाचा दुसरा भाग.
तर पदार्थाच्या दर्ज्याबाबत काही प्रमाणात प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतात. मी एसटीबसप्रेमी असलो तरी,वस्तूस्थिती नाकारण्यात काही अर्थ नाही. आता या मागचा कारणांचा वेध घेऊया.
मी एसटीबसमधुन अनेकदा प्रवास करत असल्याने प्रवाश्यादरम्यान कंडक्टर आणि डायव्हरांशी अनेकदा  बोलणे होते.त्यांवेळी आलेल्या अनुभवावर पुढील परिच्छेद आधारीत आहे्
आपल्या येथील अनेक बस स्टँडवर कंडक्टर आणि डायव्हर यांचा मुक्कामाची सोय ठिकठाक आहे. ड्युटी सुरू होताना घरुन आणलेले अन्न गरम करण्याची बहुतेक ठिकाणी नाही.बर बाहेर खावे तर 
मुंबई ,नाशिक,पुणे, छत्रपती संभाजीनगर या सारख्या शहरातील बसस्टँडचा अपवाद सोडता, बसस्टँडवर परिसरात अन्न मिळणे अवघड आहे, तसेच मिळणाऱ्या पगारात घरखर्च भागवायचा (तो देखील अनेकवेळा उशीरा आणि टप्याटप्याने मिळतो,हे अजूनच एक दुर्देव) की स्वत:चा खाण्यावर खर्च करायचा हा मोठा प्रश्न आहे.त्यामुळे घरुन आणलेले खाणेच क्रमप्राप्त आहे.घरून आणलेले अन्न ड्युटी संपल्यावर खायचे झाल्यास, त्यामध्ये सहज ९ते १०तास जातात. आता विचार करा,९ते १० तासापुर्वी तयार केलेले थंडगार अन्न खाणे कंडक्टर आणि डायव्हर यांना कसे वाटत असेल ? 
किंबहूना माझ्या अनुभवानुसार मला वाटते की, गरम अन्न मिळावे यासाठी काही प्रमाणात गरम अन्न देणाऱ्या हॉटेल चालकांनि कंडक्टर आणि डायव्हर यांनी मदत केली.आणि त्याबाबत स्वत:चा गरम अन्नाची सोय केली तर बघितली तर बिघडले कुठे?,कारण ती आपल्यासारखीच हाडामासाची रक्ताची माणसे आहेत. आपल्याला जसे थंडगार अन्न खायला आवडत नाही,तसे त्यांना देखील आवडणार नसणार ना? आता मुळात अन्नात काही कमतरता असलेले  हॉटेल चालकच धंदा वाढावा, म्हणून त्यांच्याशी संपर्क साधतात.यात त्यांची काय चूक. 
काही जण एसटी बसस्टँडवर असलेल्या कँटीनचा पर्याय यासाठी आहे,असे म्हणतील.मात्र मी लेखाच्या सुरुवातीला सांगितले तसे बस मुक्कामी उशीरा पोहोचल्यास ती बंद झालेली असतात. तसेच कँटीनचा ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील काही मतभेदांमुळे डायव्हर आणि कंडक्टर यांना देखील तिथे पैसे देउनच जेवावे लागते.
वाचक मित्र -मैत्रिणींनो ही झाली वस्तूस्थिती आता यावर उपाय करता येतील?माझ्यामते कंडक्टर आणि डायव्हर यांना कमी कष्टात आणि खर्चात त्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी अन्न गरम करण्याची सोय करुन देणे आवश्यक आहे. तसेच एसटी कॅन्टीन मध्ये रात्री उशिरापर्यंत खूप स्वस्तात अन्न देण्याची सोय करणे आवश्यक आहे.कारण आपण स्वत:देखील चांगले अन्न मिळावे,म्हणूनच तर कष्ट करतो ना 




Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

महाराष्ट्राने गमवला एक अष्टपैलू हिरा