Posts

Showing posts with the label महाराष्ट्र

एमपीएससी अध्यक्षांविरोधातील आंदोलन एक अत्यंत गंभीर बाब

Image
आपल्या भारताचा आणि त्यातील राज्याच्या कारभार हाकताना अनेक सरकारी संस्थांची मदत सरकारला होत असते.यातील काही संस्थांच्या उल्लेल्ख थेटपणे भारताच्या संविधानात करण्यात आलेला आहे. तर काही संस्था विविध कारणाने नंतर निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सध्या विशेष महत्वाचा ठरणारा नीती आयोग किंवा नीती आयोगाने ज्याची जागा  घेतली तो नियोजन आयोग ही संविधानात थेट उल्लेख नसलेल्या मात्र देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असणाऱ्या संस्था म्हणून आपण सहजतेने म्हणू शकतो . या सारख्या संस्थची यादी करायची  झाल्यास ही संख्या  बरीच मोठी निघेल मात्र लेखाचा उद्देश या संस्थची यादी करणे नसल्याने तूर्तास इतकेच असो  या संस्थांच्या कामकाजाबाबत जनतेत असंतोष पसरणे धोक्याचे आहे जर संस्थेचा थेट उल्लेख जर संविधानात असेल तर मग विचारायलाच नको  आपल्या महाराष्ट्रात सध्या विशेष चर्चेत असणारा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अश्याच संविधानात थेट उल्लेख असेलेल्या संस्थेपकी एक महत्वाची संस्था.  भारतीय संविधानाच्या सहाव्या भागात कलम ३१४ ते ३२५ नुसार देशभरात विविध राज्यात त्या त्या  राज्याचा विचार करता उपजिल्हाधिकारी प...

असल्या भावी अधिकाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचे भविष्य नकोच!

Image
काही दिवसापुर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२७ पासूनच्या पुर्व परिक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरच्या मदतीने घेण्यात येणार असल्याचे जाहिर केल्यापासून परीक्षा पुर्वीप्रमाणेच घेण्यात याव्यात,यासाठी राज्यभरात भावी अधिकारी (?) आंदोलन करत आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांना कॉम्प्युटर वापरण्याचा पुरेसा सराव नाही, नेटच्या कनेटिव्हीटीची समस्या आहे.या सारख्या तांत्रीक अडचणीसह यू.पी.एस.सी जर ऑफलाईन परीक्षा घेते मग एम.पी.एस.सी ला ऑनलाईन परीक्षा घेण्याची गरज काय या अतिशय भंपक हास्यास्पद कारणासह परीक्षा विविध सत्रात घेतल्यामुळे जे वेगवेगळे पेपर होतील,त्या सर्व क्वेश्चनपेपरमधील डिफिक्लटी लेव्हल (काठीण्य पातळी) एकाच समान पातळीवर कशी ठेवणार? या सारखी बाष्कळ कारणे पुढे करत आहेत. माझा या सर्व भावी अधिकाऱ्यांना (?) एक प्रश्न आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रवेश करणार आहात,त्या क्षेत्रातील आव्हानाची तुम्हाला काही माहिती आहे का? तूम्ही ज्या क्षेत्राचे अधिकारी असाल (झाले तर) त्या क्षेत्रातील लाखो लोकांची जवाबदारी तूमच्या खांद्यावर असेल. तुम्ही ज्या प्रदेशाची जवाबदारी घेणार आहात. त्यात देव न करो पण एखादी दुर्घ...

आत्महत्येच्या विळख्यात तरुणाई .. !

Image
कोणत्याही देशाचे भवितव्य तेथील तरुणाई ठरवत असते. तरुणाईच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर कोणत्याही देशाच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरत असते., आणि याच मुद्ययावर आपल्या भारताचे टेंशन वाढवणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झालीये . ही आकडेवारी 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ती झटकून टाकता येणे अशक्य  .कारण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे येणारी माहिती हि देशभरातील पोलीस स्टेशनमधून थेट येत असते .देशभरातील विविध पोलीस सटेशनमध्ये वेगवेगळ्या क्लालाखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची एकत्रित नोंद म्हणजे ही आकडेवारी या आकडेवारीत विविध गुन्हयात देशभरात किती प्रकरणे दाखल झाली याची ,माहिती असते .जसे रस्ते अपघात इतक्या , दरोड्याच्या तितक्या , देशभरात दखल झाल्या या प्रमाणे  तर वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून नुकतीच  सन २०२४ मध्ये देशभरात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी कोणत्या वयोगटातली किती आत्महत्या होत्या ?आत्महत्या करणाऱ्यां व्यक्तींचे व्यवसाय काय होते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे . यातील आकडे हृदय पिळटवून टाकणारे...

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग 2)

Image
सध्या आपले महाराष्ट्र सरकार सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आहे, हे आपण कालच्या भागात बघितले. कालच्या भागाला वाचकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी मला वैयक्तिक व्हाट्सअप वर प्रतिक्रिया कळवल्या,आणि हा लेख लिहीत असताना देखील कळवत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम त्या सर्वांचे  मनापसून धन्यवाद.  आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया मला लिहण्यासाठी खुप बळ देतात. असो. कालच्याच लेखात मी मांडु इच्छिणारा मात्र विस्तार भयास्तव न मांडलेला मुद्दा मांडण्यासाठी मी हा लेखाचा दुसरा भाग लिहीत  आहे. तर वाचक मित्र-मैत्रिणींनो, मी एसटी बसचा चाहता आहे. माझ्या फेसबुक अकाउंटवर मी 'माझे प्रवाश्याचे आवडते माध्यम भाग 1 आणि 2' या अल्बमद्वारे  सुमारे २,५०० (हो अडीच हजार ) एसटी बस आणि एसटी विषयक बातम्याचे फोटो अपलोड केले आहेत. एसटी बसच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया या ४जिल्ह्याचा अपवाद वगळता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे.‌तसेच महाराष्ट्राबाहेरील अहमदाबाद, बंगळूरू, इंदौर, पणजी या शहरांना देखील भेटी दिल्या आहेत. हे जेव्हा ...

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

Image
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

Image
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

Image
मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री  महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेसी  साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही‌.झोपायला जे...

'विवेक भीमनवार' सर हे कराचं !

Image
  मा. विवेक भीमनवार सर स. न.वि. वि.  सर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.. !!.  आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला खऱ्या अर्थाने लोकसेवा या शब्दला सार्थ ठरवणारे  करावे यासाठी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार म्हणून माझ्याकडून आपल्याला सदिच्छा !! सर, गेल्या एक ते दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अधिक उत्तम कार्यक्षम व्हावा यासाठी आपल्या आधीच्या अध्यक्षांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग आणि अन्य  लोकसेवा आयोगाचा अभ्यास दौरा केला होता. त्यांनी केलेल्या शिफारशी शक्य तेव्हढ्या लवकरात लवकर अंमलात येऊन अक्षरशः पोटाला चिमटा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू अधिकाऱ्यांचा कष्टाचा अंत व्हावा ही आमची माफक अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असे म्हणायला हरकत नसावी.  सर  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार वेगाने केंद्रीय  लोकसेवा आयोगाचा धर्तीवर होत आहे .मुख्य परीक्षेची पद्धत पूर्वीप्रमाणे दीर्घोत्तरी होत आहे. ही बाबा कौतुकास पात्रच आहे यात शंका नाही. मात्र आपल्या ...

महाराष्ट्रात एकत्रीतपणे होणाऱ्या निवडणूक या एक देश एक निवडणूकीची सुरवात ?

Image
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी निवडणूक सुधारणा म्हणून ज्या गोष्टीकडे बघितले जाते, ती गोष्ट म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन ही प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका बघता जवळपास  सर्वच जिल्हा परिषदा  पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका जर मुदतपूर्व झाल्या नाहीत, तर पुढल्या पाच वर्षांनीच एकत्रितच होतील. त्यामुळे हाच मुद्दा अन्य राज्यात राबवत नरेंद्र मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन या आपल्या या आपल्या सुधारणा कार्यक्रमाला अप्रत्यरित्या सुरुवात केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्यक्षात पाहता, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेनुसार होत आहेत, असे म्हणता येणार नाही.  सोशल मीडिया होणाऱ्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा हा दुर्लक्षीला जातोय, किंबहुना असा काही मुद्दा आहे, हेच अनेकां...

15 नाही 66 टक्के दरवाढ!

Image
       आपल्या महाराष्ट्र एसटीने आपल्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्याची वाढ केल्याची माहिती तुम्हाला असेलच. ही दरवाढ जाहीर करताना, आपल्या महामंडळाने फक्त सर्वसाधारण तिकिटाचीच दरवाढ जाहीर केली होती, आणि एसटी महामंडळाकडून जे पास देण्यात येतात त्यांची दरवाढ नंतर जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. दरवाढ जाहीर केल्यानंतर 4 दिवसांनी अर्थात 29 जानेवारी रोजी महामंडळाने एक परिपत्रक जाहीर प्रसिद्ध करून पासची दरवाढ जाहीर केली..पासची दरवाढ  बघताना, 'आवडेल तिथे प्रवास' या पासामध्ये तब्बल 66% ची दरवाढ करण्यात आलेली आहे असे दिसून आले. जे पूर्णतः अयोग्य आहे.पुर्वी प्रौढांसाठी 4दिवसांसाठीचा शिवशाहीचा पास 1520रुपयांमध्ये होता जो आता 2533 रुपयेला मिळेल. तसेच साध्या बसचा 4दिवसांच्या प्रौढाच्या पाससाठी 1170 च्या ऐवजी 1814 रूपये मोजावे लागतील 7दिवसाच्या प्रौढ साध्या बसचा प्रवास 2040च्या 3171 रुपयांना मिळेल तर 7 दिवसाचा शिवशाही पास 3030ऐवजी 4429रूपयांना मिळेल        एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या या पासचा फायदा घेत, अनेक हौसी प्रवाशी महाराष्ट्राचा कान...

महाराष्ट्राच्या एसटीने गमावलेली संधी

Image
नुकतीच आपल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 टक्के वाढ करण्यात आली सन 2021 पासून तिकीट दरात वाढ न केल्याचे कारण या निमित्तने देण्यात आले. एसटी महामंडळाचे उत्पन्नाचा मुख्य साधन असणाऱ्या तिकीटांचे दर आणि वाढलेले अन्य खर्च बघता  या समतोल साधण्यासाठी तिकिटाचे दर वाढवणे आवश्यकच होते असेही याबाबत सांगण्यात आले. मात्र या वाढलेल्या तिकीट दरांमुळे महाराष्ट्र एसटीने एक मोठी संधी मात्र गमावलेली आहे हे नाकारता येत नाही ती संधी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार करण्याची, आणि या  विस्तारातून आपला नफा अधिकाधिक वाढवण्याची .आपल्या शेजारील कर्नाटक राज्य हे त्यांच्या प्रादेशिक सीमांचा बाहेर मोठ्या प्रमाणात सेवा देत आपला नफा कमवते मात्र मात्र आपल्या महाराष्ट्र एस टी मध्ये 15 टक्के दरवाढ झाल्याने आपली ती संधी हूकलेली आहे हे सत्य स्वीकारायलाच हवे..     आपल्या भारतातील सर्व एस टी महामंडळाची एक शिखर संस्था आहे ऑल ऑल स्टेट रोड ट्रान्सपोर्ट युनियन नावाची या ट्रान्सपोर्ट युनियनच्या नियमानुसार आंतरराज्य एसटी बस वाहतुकीचे नियमन होते या नियमानुसार एखाद्या राज्याला...

एसटीचे हे बदल आपणास माहिती आहे ना?

Image
          गेले काही दिवस आपण सर्वजण महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलो असताना, आपल्या एसटीमध्ये दोन घडामोडी घडल्या आणि एक अफवा पसरली. महामंडळाकडून 'शिवशाही' हा प्रकार बंद करण्यात आल्याचा अफवेबाबत महामंडळाकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आल्याने, मी त्याविषयी बोलणार नाही .महामंडळाने आपल्या  बसेसच्या ताफ्यात केलेला बदलाविषयी फारसे न बोलले गेल्याने, त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन                  तर मित्रांनो, आताआतापर्यत महामंडळ,  अशोक लेलँड, टाटा किंवा आयशर या कंपनीकडुन फक्त चेसीस विकत घेत असे.त्यानंतर स्वत:च्या मालकीच्या वर्कशॉपमध्ये त्यावर बस बांधणी करत असे.(एसटीच्या रत्नागिरी, पुणे, संभाजीनगर, नागपूर येथे स्व मालकीच्या कार्यशाळा आहेत) त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसाचा अपव्यय होत असे.खासगी बसवाहतूकदार याच कंपन्यांकडून थेट तयार बस विकत घेत असताना, एसटी या प्रकारचे धोरण अमंलात आणत असल्यामुळे तीचे मोठे नुकसान देखील होत असे.हे नुकसान लक्षात आल्यामुळे, महामंडळाच्या व्यवस्थपकांनी क...

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

Image
आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.            मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय संपले समजून अखेरचा उपाय म...

नवे आव्हान पेलण्यासाठी सक्षम होते आहे आपली यस्टी!

Image
  मी महाराष्ट्र एसटीमध्ये कार्यरत नसलो तरी , एसटीचा चाहता मात्र आहे . एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेत , महाराष्ट्रातील नागपूर   या प्रशासकीय विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि कर्नाटकचा काही भागात फिरलो आहे . माझ्या या आवडीमुळे मी काही एसटीप्रेमी लोकांच्या व्हाँटसप आणि फेसबुक गृपमध्ये आहे . या गृपवर सध्या   आपल्या महाराष्ट्र एसटीच्या पुण्याचे   उपनगर असलेल्या दापोडीत   असणाऱ्या   वर्कशॉपमध्ये   BS 6 मानकांच्या TATA 12 मीटर चेसिसवर बांधलेल्या पहिल्या वहिल्या संपूर्ण स्लिपर 2 बाय 1 नाँन एसी गाड्यांचे फ़ोटो यायला लागलेत . एसटीचे हे पाउल मला अत्यंत महत्त्वाचे वाटते . याबद्दल लेट पण थेट या न्यायाने एसटी प्रशासन कौतूकास पात्र आहे .    या आधी आपल्या महाराष्ट्र एसटीत खाली बसण्याची सोय आणि वरती झोपण्याची सोय असलेली नाँन एसी खिडक्यांमधून हवा जाण्यायेण्याची सोय असलेली स्लिपर + सिटर ही बससेवा होती . ( लाल आणि पांढरा ...