Posts

Showing posts with the label नेपाळ

नेपाळची लोकशाही धोक्यात

Image
  नेपाळ, भारताखेरीज हिंदू बहुसंख्य असलेला भारताचा शेजारी. भुतानखेरीज भारतीयांना कायमस्वरुपी व्हिसा फ्री प्रवेश असणारा देश हा नेपाळ सध्या मात्र राजकीय आंदोलनात गटंगळ्या खातोय. तस बघायला गेलो तर नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. मात्र ही व्यवस्था मोडीत काढत देशात सौदी अरेबिया सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसी या प्रकारची राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत. मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत        2001 जून 3 रोजी नेपाळचा भावी राजा दिपेंद्र याने आवडत्या मुलीशी राजघराण्यातील व्यक्ती लग्न करु देत नाहीत, या रागातून राजपरीवाराच्या केलेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या पोकळीपासूनच नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.  त्या हत्याकांडानंतर राज...

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

Image
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी...

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

Image
     आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  ने...

भारत नेपाळ संबंधाची नवी पहाट

Image
  नेपाळ , भारताच्या २८ पैकी उत्तराखंड , उत्तरप्रदेश , बिहार , पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांबरोबर सीमा शेअर करणारा देश . उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशाबाबत काहीसा सिमववाद असणारा देश म्हणजे नेपाळ भारतीय संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असलेलाभारत आणि चीन या दोन बलाढ्य देशातील बफर स्टेट म्हणजे नेपाळ तर या नेपाळचे पंतप्रधान    पुष्पकमल दहल ' प्रचंड ' हे भारताचे   पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून   या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर    आले होते .  सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती . परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद , , अर्थमंत्री , डॉ . प्रकाश शरण महत , . ऊर्जा , जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री , शक्ती बहादूर बस्नेत , भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री ,. प्रकाश ज्वाला , उद्योग , वाणिज्य आणि पुरवठा मंत्री   रमेश रिजाल ,  हे या भेटीदर...