एसटी महामंडळाची उलट गंगा!
सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे.
तर मित्रांनो आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीचे दरवाजे या बसेससाठी असावे ,असेही या ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. सध्या महिलांना देण्यात येणाऱ्या अर्ध्या तिकीटाची सवलत, तसेच 75वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत प्रवास यामुळे प्रवाशी संख्या वाढली असली तरी या वाढत्या प्रवाशी संख्येला समावून घेण्यासाठी ही योजना राबवणे चूकीचे आहे.गेल्या 16 वर्षात प्रवाश्यांना मोठ्या आसनाची सवय पुर्णत: सवय झाली.आहे.त्यावेळी या जून्या वळणाची बस व्यवस्था प्रवाश्यांचा कितपत अंगवळणी पडेल हा मोठा प्रश्न आहे.किंबहूना यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर या म्हणीनुसार ज्यांना सवलत आहे असा प्रवाशी वर्ग सोडूं अन्य प्रवाशी वर्ग एसटीला कायमचा रामराम ठोकू शकतो.
या खेरीज आता कालबाह्य झालेल्या एशियाड बसेस पुन्हा एकदा सुरु करण्याचे या ऑर्डरमध्ये सांगण्यात आले आहे. महामंडळाच्या आतापर्यतचा अनुभवानुसार या एशियाडचे भाडे सर्वसामन्य एसटी बसपेक्षा जास्तच असणार आहे.आपल्या महामंडळाने आधुनिकता पाहिजे असे धोरण ठरवत 2008 पासून आपल्या साध्या बसेसमध्ये बदल करत साध्या बसेसमध्ये पुशबँक सीट, प्रत्येक सीटला मोबाइल चार्जर या सोयी दिल्या आहेत. त्यामुळे एशियाड या बसेस आणि सर्वसाधरण बसेसमध्ये आज बाहेरील रंगसंगती सोडता काहीही बदल नाही.अश्यावेळी बाहेरची रंगसंगती वेगळी म्हणून अधिकचे भाडे कोणताही प्रवाशी देणार नाही.महामंडळाला या एशियाड बसेस पांढरा हत्तीच ठरणार,हे सुर्यप्रकाश्याइतके स्पष्ट आहे.
काही सुद्धा अडचण नसताना सर्व सुरळीत सुरु असताना विनाकरण काहीतरी निमित्त्य काढून तो प्रवास थांबवून पुन्हा प्रारंभीच्या ठिकाणी जाणे याला आपल्या मराठीत उलटी गंगा हा वाक्यप्रचार वापरण्यात येतो . आपल्या एसटी महामंडळाने हा वाक्यप्रचार सत्यात उतरवण्याचे ठरवल्याचे या ऑर्डर पत्रकातून दिसून येत आहे. जे पुर्णत: अयोग्य आहे.
ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे.
अवलिया प्रवाशी या युट्युब चॅनेलच्या रोहित धोंडे सरांचे या लेखासाठी मोलाचे सहकार्य मिळाले,त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार.
Comments
Post a Comment