रेल्वेच्या रो रो सेवेचा विस्तार करण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट

मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर एक ज्वलनशील टँकर उलटल्राने सुमारे ३६ तास वाहतूक बंद राहिली. या घटनेतून रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेचे महत्त्व पुन्हा अधोरेखीत झाले. काही विशिष्ट पदार्थ घेऊन जाणारे ट्रक रो रो सेवेच्या माध्यमातूनच पाठवाण्याची सक्ती करण्याची गरज आहे. सध्या रेल्वेची रोल ऑन रोल ऑफ (रो रो) ही सेवा प्रामुख्याने कोकण रेल्वेवर वापरली जाते.या सेवेचा विस्तार मुंबई- पुणे सारख्या ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.त्या ठिकाणी सुद्वा  करण्याची गरज आहे. हे आपणास या अपघाताने दाखवून दिले आहे.
भारतीय रेल्वे मालवाहतूकीसाठी सात वेगवेगळ्या प्रकारच्या वँगन वापरते.त्यातील
BRN या प्रकारच्या वँगनचा उपयोग विविध प्रकारचे ट्रक, रणगाडे वाहून नेण्यासाठी होतो. कोकणामध्ये जी रो रो नावाने परीचीत असणारी सेवा रेल्वेमार्फत देण्यात येते, त्यासाठी या प्रकारचे वँगन वापरले जातात. रो रो  हा शॉर्टफॉर्म आहे. याचे पूर्ण नाव रोल ऑन रोल ऑफ असे आहे. रोल ऑन रोल अर्थात रो रो या सेवेत  ट्रक, कार थेट रेल्वेच्या डब्यावर चढवले जातात. रेल्वे मार्फत इच्छित स्थळी पोहोचल्यावर हे ट्रक पुन्हा खाली उतरवले जातात आणि रेल्वेच्या माल धक्क्यावरुन  ते माल जिथे पोहोचवयाचा आहे त्या ठिकाणी पोहोचतात.
रेल्वेचा या रो रो सेवेमुळे मुंबई -गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.ज्याचा थेट परिणाम  मुंबई- गोवा महामार्गावरील अपघाताची संख्या कमी होण्यात झाला आहे.तसेच रेल्वेमुळे माल पाठवला जात असल्याने रस्त्यातील खड्ड्यांमुळे माल खराब होणे, उशीरा पोहोचणे हे सुद्धा प्रश्न कमी झाले आहेत त्याचप्रमाणे या ट्रकच्या वापरामुळे जळणारे डिझेल आणि त्यातून निर्माण होणारे वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
पुणे शहराचा विचार करता पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशी वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हडपसरला रेल्वे टर्मिनस उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.त्या प्रक्रियेत आपण छत्रपती शिवाजीनगर हे रेल्वे स्टेशन देखील जोडुया.त्यानंतर येणाऱ्या खडकी आणि दापोडी रेल्वे स्टेशनचा ठिकाणी आपण थेट ट्रक रेल्वे वॅगनच्या फलाटावर जाऊ शकतील असी सुविधा निर्माण करु शकतो.सध्या खडकी रेल्वे स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होतच आहे.त्यामुळे खडकीत फार मोठ्या बदलाची आवश्यकता नाही.दापोडीला मात्र त्या उभाराव्या लागतील
मात्र आता जसा अपघात झाला तसा अपघात झाल्यामुळे लोकांच्या कर्यशक्ती आणि पैश्याचे जे नुकसान झाले ते बघता हा खर्च त्रासदायक नाही.
१फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात मुंबई ते पुणे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.या मार्गावरील सध्याचे रुळ वेगवान गाड्या चालवायला सक्षम नाहीत.त्या साठी नव्याने रुळ उभारायला लागणार आहेत.त्यामुळे ते उभारताना डेडीकेडेट फ्रेड कॉरिडॉर साथीरखडा ट्रॅक उभारल्यास ही गोष्ट सहजतेने होईल.कितीही उत्तम रस्ता केला तरी तो रेल्वेवरील मालवाहतुकीची जागा घेऊ शकणार नाही‌. येणारा खर्च, आणि मालाची सुरक्षितता बघता रेल्वे नेहमीच फायदेशीर ठरु शकते हे लक्षात घेतल्यास आपणास हा मुद्दा सहजतेने समजू शकतो.
रेल्वेच्या रो रो सेवेचा विचार या अपघाताने झाला तरी या अपघाताचा काही फायदा झाला असे आपण सहजतेने म्हणू शकतो.वाईटात चांगले याचे या खेरीज दुसरे उदाहरण नसेलच.





Comments

Popular posts from this blog

एसटी महामंडळाची उलट गंगा!

८० तासाला एक

पुन्हा एकदा संतोष माने!