Posts

Showing posts with the label क्रीडा

त्यांचा अनुभवातून आपण शिकणार ना ?

Image
मी आपणाशी हा संवाद साधताना (17सप्टेंबर ) उझबेकिस्तान देशातील समरकंद या शहरात 46 व्या बुद्धिबळ ओलंपियाडची सुरुवात झाली आहे.  तर जपानमध्ये आशियाई खेळाची सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. स्पर्धांच्या आयोजनाचा विषयीचा ज्या बातम्या या स्पर्धेच्या आधी आल्या. त्या कोणत्याही जागतिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशासाठी खूप काही शिकवून देणाऱ्या होत्या. खेळाडूंना राहण्यासाठी योग्य सुविधा नसणे हा मुद्दा दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. बुद्धिबळ ओलंपियाड चा विचार करता नाशिकचे भूषण ग्रँडमास्टर विदित गुजराती यांनी केलेले ट्विट आपणास खूप काही शिकवून जाते. समरकंद येथे होणाऱ्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये आयोजकांकडून भारतीय संघाला खूप उशिरा राहण्याची सोय करून देण्यात आली. आणि ही फक्त भारताचीच तक्रार नव्हती अन्य देशातील खेळाडूंनी सुद्धा समरकंद येथील राहण्याच्या सोयीबाबत ना पसंती दर्शवली आहे जपानमध्ये सुद्धा खेळाडूंना राहण्यासाठी हॉटेल रूम नाही तर जहाजे आणि अन्य तंबूमध्ये राहण्याची सोय केल्याच्या बातम्या येत आहेत.  हॉटेलमधील रूम्स देखील खूप छोट्या आणि असूविधांनी परिपूर्ण...

आयुष शेट्टी : भारतीय बॅडमिंट क्षेत्रातील नाव उगवता तारा

Image
१७ ऑगस्ट २०२६ हा दिवस भारतासाठी सुवर्णक्षणांनी नोंदवण्यात येईल कारण नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशप मध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात भारतीय गेल्या कित्येक वर्षापासून चमकदार कामगिरी करत होतेच त्यामध्ये ॲथलेटिक्स ची भर पडल्याची आपण या कॉमनवेलमध्ये बघितलेच आता यामध्ये बॅडमिंटनची सुद्धा भर पडलेली आहे हे आपण या बॅडमिंटन चॅम्पियनशॉपमध्ये बघता आहोतच. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असाल मोदीविरोधक असाल मोदीचे समर्थक असाल भारतीय खेळाडूंकडे ज्या पद्धतीने सध्या लक्ष देण्यात येत आहे हे नाकारू शकत नाही भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जी कामगिरी करत आहेत ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्याची ही झलक आपणास विविध स्पर्धांमध्ये भारतीयांनी घेतलेल्या पदकांमध्ये दिसत आहेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनशिपमध्ये पहिल्या दिवशी सर्वचभारतीय खेळाडूंनी आपले सामने खिशात घातलेले असले तरी यामध्ये उठून दिसला तो 21 वर्षीय आयुष शेट्टी गेल्या काहीही स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत असणाऱ्या आयुषची कामगिरी याही स्पर्धेत अत्यंत उठावदार होत आ...

शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध !

Image
शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध ! शीर्षक वाचून गोंधळलात पडला का,? आधीच जगात दोन युद्ध सुरु आहेत.एक आहे गेल्या साडेतीन वर्षापासून सुरु असलेले रशिया -युक्रेन युद्ध आणि दुसरे म्हणजे इराण विरूद्ध अमेरिका इस्राइल हे युद्ध .या दोन्ही युद्धामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.आता पुन्हा नवीन  युद्ध होणार म्हणजे फक्त त्रास त्रास आणि त्रासच .असा विचार येत असेल तर जरा थांबा. या युद्धामुळे तूम्हाला त्रास होणार नाही तर आनंदच मिळणार आहे.बौद्धिक आनंदाचा अनुभव तूम्हाला या युद्धातून तूम्हाला घेता येणार आहे. 'गर्व से कहो हम भारतीय है' असे अभिमानाने म्हणत तिरंगा फिरवण्याची संधी तूम्हाला या युद्धामुळे मिळणार आहे.भारतीयांची बुद्धीची दखल जगाला आदराने घेण्याचा प्रसंग या युद्धामुळे  होवू शकतो.   हे युद्ध शस्त्रांनी लढले जाणार नाही.तर बुद्धीने  लढले जाणार आहे. आता बुद्धीने लढले जाणारे युद्ध म्हटल्यावर तूम्हाला वाटले असेल ए.आय.चा वापर असेल,गेला बाजार एकमेकांचा महत्त्वाच्या प्रणालीत सायबर अटॅक करून त्या निकामी करणे असेल.किमानपक्षी रॉकेट उडवून दुसऱ्याचे उपग्र...

आता फक्त ५ बाकी!

Image
सध्या भारतीय बुद्धिबळ विश्वाला अत्यंत सोन्याचे दिवस आले आहेत ,असे म्हंटलेतर अतिशयोक्ती होणार नाही किंबहुना भारतीय बुद्धिबळविश्व आता अत्यंत सोनेरी क्षण अनुभवत वेगाने जगाच्या अनभिषक्त सम्राटपदावर विराजमान होण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे असे म्हंटले तरच तो भारतीय बुद्धिबळ विश्वचा योग्य शब्दात केलेला गौरव ठरेल अशी आजची स्थिती आहे . महिलांच्या विश्वचषकावर भारतीय महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने नाव कोरल्यावर, अगदी थोड्याच दिवसात बुद्धिबळ विश्वातील दुसरी महत्वाची स्पर्धा असलेल्या कॅन्डीडेट स्पर्धेवर ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली हिने नाव कोरले .सायप्रस या देशात झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवूनग्रँडमास्टर भारतात येत नाही तोच अजून एका आनंदाच्या बातमीने  भारतीय बुद्धिबळ विश्वाला  आनंदाला पारावरच राहिला नाही /ती होती भारताला अजून एक ग्रँडमास्टर मिळाल्याची .       अरोण्यक  घोष भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २००३ मध्ये जन्मलेले  अरोण्यक सध्या २२ वर्षांचे  आहे. 'बँकॉक चेस क्लब ओपन २०२६' स्पर्धेत त्यांनी आपला  अंतिम 'GM नॉर्म' (ग्रँडमास...

सिंहावलोकन २०२५: भारतासाठी गौरवास्पद, चिंतनाचे क्षण

Image
  1990 पासुन पुढील ५ते ६ वर्षे ज्या २१ व्या शतकाचे गुणगाण केले जात होते‌. त्या २१ व्या वर्षाचे एक चतूर्थांसवे वर्ष म्हणुन ज्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्षाचा आपण उल्लेख करु शकतो त्या २०२५ आपण लवकरच संपणार आहे.त्या अर्थाने हा सिंहावलोकनाचा काळ आहे.मागे बघून काय काय झाले याचा आढावा घेण्याचा हा कालखंड. आपल्या मानवी आयुष्याचा विचार करता कोणत्याही सिंहावलोकनासाठी   वर्ष हा कलावधी उत्तम आहे.चला तर बघुया थोड्याच दिवसात सरणाऱ्या ग्रेनीयर कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये काय काय घडामोडी घडल्या.मी हा आढावा विषयनिहाय घेणार आहे.या लेखात मी बोलणार आहे.सरत्या वर्षातील आपल्या भारताचे आनंदाचा , चिंतनाच्या दु ; खाच्या घटनांविषयी.  २०२५ हे वर्ष भारताच्या विकासप्रवासातील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करणारे ठरले. आर्थिक आघाडीवर भारताने सातत्यपूर्ण वाढ नोंदवली. अंदाजे ७ टक्क्यांच्या आसपास राहिलेल्या GDP वाढीमुळे भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये अग्रस्थानी राहिला. एकूण GDP आकार ४ ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. उत्पादन क्षेत्रातील ‘मेक इ...

सिंहावलोकन २०२५ : क्रीडा क्षेत्र

Image
    लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२६चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना , सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र , विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील   क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.   हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले   २०२5 हे वर्ष भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी व्यावसायिकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि पायाभूत विकास यांचा संगम दर्शवणारे ठरले. ऑलिम्पिक सायकलच्या तयारीच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारांनी प्रशिक्षण, विज्ञानाधिष्ठित कोचिंग आणि खेळाडूंच्या कल्याणावर भर दिला. क्रीडा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘खेलो इंडिया’ अंतर्गत वार्षिक गुंतवणूक सातत्याने वाढत असून, देशभरात १,००० हून अधिक प्रशिक्षण केंद्रे सक्रिय झाली. अॅथलेटिक्स, नेमबाजी...

भारत बुद्धिबळातील महासत्ताच !

Image
         भारत बुद्धिबळातील महासत्ताच  ! होय,  भारत बुद्धिबळातील महासत्ता आहे,  आणि मी आंधळा देशप्रेमी म्हणून म्हणत नाहीये.  बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या फिडे या  संघटनेतर्फे एप्रिल २०२५ मधील टॉप १०० खेळाडूंची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्याच्या आधारे  मी हे  विधान करतोय .       तर मित्रानो  फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या  फेडरेशन इंटरनॅशलनल डी इचेस या बुद्धिबळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन करणाऱ्या संस्थेमार्फत एप्रिल २०२५ च्या टॉप १००  पुरुष खेळाडूंच्या यादीतील पहिल्या १५ मध्ये ५  खेळाडू भारतीय आहेत. फिडेकडून खेळाडूंचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्या खेळाच्या प्रदर्शनावर आधारित काही गुण दिले जातात ज्याला इलो रेटिंग म्हणतात या इलो रेटिंगच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे .  या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विद्यमान विश्वविजेते ग्रँडमास्टर डी गुकेश,   चवथ्या क्रमांकावर ग्रँडमास्टर अर्जुन इरेगसी सातव्या क्रमांकावर ग्रँडमास्टर...

भारतीय बुद्धिबळ क्षेत्राची वर्षाखेर गोड!

Image
 बुद्धिबळ प्रौढ पुरुष गटात क्लासिकल (पारंपारीक) पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वात कमी वयात विश्वविजेतेपद मिळवण्याचा भीम पराक्रम ग्रँड मास्टर डी.गुकेश यांनी करून काहीच दिवस होत नाही. तोच भारतीय बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारी अजून एक बातमी २९डिसेंबर रोजी येवून धडकल्याने, भारतीयांनाअक्षरश:आकाश‌ ठेंगणे झाले.‌भारतीय प्रमाणवेळेनुसार २७ते २९ डिसेंबर या दरम्यान रात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळात न्युयॉर्क येथे खेळवण्यात (न्युयॉर्कच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार २६ते २८डिसेंबर दुपारी अडीच वाजता )आलेल्या जागतिक  प्रौढ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा महिला गटात भारताची क्रमांक एकची खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांनी विजेतेपद मिळवत रॅपिडचे विश्वविजेतेपद पटकावल्याची,हीच ही बातमी.   तूम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल हे काय? गुकेश तर आताच विश्वविजेता झाला आता हे काय ? नविन.तर सांगतो जागतिक स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा गटात खेळवण्यात येतात या गटाचे वयानुसार ३गट पडतात .12 वर्षाखालील खेळाडू ज्या गटात खेळतात त्यास सब ज्युनियर गट म्हणतात. खेळाडु 12 वर्षापेक्षा मोठा मात्र 19 वर्षापेक्षा लहान आह...

सिंहावलोकन २०२४ : क्रीडा

Image
                    लवकरच जग सध्या सुरु असलेल्या ग्रेनीयन कॅलेंडरला निरोप दूवून नविन ग्रेनीयन वर्ष २०२५चे मोठ्या जल्लोषात स्वागत करेल.हे करत असताना,सरत्या वर्षात झालेल्या घटनांचा मागोवा घेतल्यास पुढल्या वर्षाचे स्वागत करताना येणारा उत्साह उत्तमच.हेच लक्षात घेवून मी क्षेत्र ,विषयनिहाय सरत्या वर्षाचे आढावा घेणारे लेख लिहित आहे. त्याच मालिकेतील  क्रीडा विश्वाचा आढावा घेणारा हा लेख.  हे सरते वर्ष क्रीडा क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या ठरले . भारताच्या अनेक खेळडूनी या वर्षात अत्यंत महत्वाचा टप्पा सर केला बुद्धिबळाचा विचार करता हे वर्ष खूपच आनंदाचे ठरले                  या वर्षात भारतने १९ वर्षाखालील महिलांच्या गटात (मुलींच्या ) गटात, तसेच प्रौढ पुरुष गटात अश्या दोन गटात विश्वविजेतेतेपद आपल्या खिश्यात टाकले तर आशियाई शालेय  बुद्धिबळ स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक मिळवला बुद्धिबळपटूच्या विचारत करता अत्यंत गौरवाचा समजला  जाणारा २८०० आलो रेटिंगचा टप्पा ओलांडण्याच्या भीम पर...

भारताची बुद्धिबळातील यशाची चढती कमान

Image
     सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेशने विश्वविजेतेपदाला गवसणी घालून समस्त भारतीयांना आनंदाची अनुभती देवून आठवड्याचा कालावधी पुर्ण होतो ना होतो, तोच भारताने बुद्धिबळाच्या बाबत अजून एक यश मिळवले आहे‌.भारताचे हे यश आहे, 'आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'                   बँकॉक येथे १डिसेंबर ते ११डिसेंबर या दरम्यान झालेल्या,  आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'  भारताने १८सांघिक आणि १५ वैयक्तिक पदके मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.सांघिकरीत्या मिळवलेल्या १८पदकांमध्ये ३ सुवर्ण, १०रौप्य आणि ५ कांस्य पदके आहेत तर वैयक्तिकरीत्या मिळवलेल्या १५पदकांमध्ये ४सुवर्ण २रौप्य आणि ९ कांस्य पदके मिळवली आहेत. दिवी बिजेशने क्लासिकल आणि ब्लिट्झ या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी करत दुहेरी सुवर्ण पदक  जिंकले.तिने स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वच्या सर्व सामने जिंकले. तीने रॅपिड अंडर-9 मुलींच्या गटात कांस्य पदक सुद्धा मिळवले. नरेंद्र अग्रवालने ब्लिट्झ अंडर-11 ओपनमध्ये  सुवर्ण आणि रॅपिडमध्ये कांस्यपदक जिंक...

असा झाला बुद्धिबळ विश्वविजेतेपदाचा प्रवास

Image
    चेन्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश हे चीनचा नागरिक ग्रँडमास्टर माजी विश्वविजेता डिंग वीरेन यास जागतिक बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धा २०२४ च्या १४ व्य फेरीत नाट्यमयरित्या    हरवून नवे बुद्धिबळ विश्वविजेते झाल्याचे एव्हाना आपणास समजले असेलच मात्र हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता , आणि गेल्या तीन आठवड्यापूर्वीच सुरु झालेला नव्हता .तर त्यासाठी किमान २ वर्षाची अथक तपश्चर्या होती    जागतिक बुद्धिबळ स्पर्धा लौकिक अर्थाने २५ नोव्हेंबर २०२४ ला सुरु झाली असली तरी ती जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल ही स्पर्धा मागच्या वर्षी २०२३ ला सुरु झाली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल २०२३ साली बुद्धिबळाची जागतिक स्तरावर नियमन करणारी संस्था फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस अर्थात फिडे या संस्थेकडून खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने ग्रँडमास्टर डी गुकेश या स्पर्धामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे ते बुद्धिबळ विश्वविजेत्याला कोण आव्हान देणार हे ठरवणारी    कॅन्डीडेट स्पर्धा खेळण्यास पात्र ठरले  कॅन्डीडेट स्पर्धा ...

बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेची चढती कमान

Image
सिंगापुर येथील सेंटोसा आयलंड येथे बुद्धीबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा सुरु आहे. तिथे चीनचा नागरिक वर्तमान बुद्धिबळ विश्वविजेता डिंग लिरेन  आणि २०२४चा कँडीडेट स्पर्धा विजेता आपल्या सर्वांचा आवडता लाडका सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांच्यांत  अटीतटीची लढाई सुरु आहे. हे तूम्हाला एव्हाना माहिती झाले असेलच.भारताचे पहिले ग्रँडमास्टर असणारे भारतीय बुद्धिबळातील भिष्माचार्य म्हणून ओळख असलेले विश्वनाथन आनंद हे या आधी ही स्पर्धा खेळले होते.त्यानंतर सुमारे १२वर्षांनी कोणता तरी भारतीय ही बुद्धिबळातील ही अत्यंत मानाची स्पर्धा खेळतोय.जे आपल्या समस्त भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.अमेरिका आणि रशियाचे बुद्धिबळावर असलेले वर्चस्व मोडीत काढत नार्वे, चीन आणि आपले भारतीय  खेळाडू यात उत्तम कामगिरी करत आहेत आणि त्यात भारतीय खेळाडूंचा मोठा वाटा आहे,ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे‌                   हा लेख लिहण्यापर्यत स्पर्धेतील ९ सामने झाले आहेत, ज्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता, अन्य सर्व सामने बरोबरीत ...

रंगणार भारत आणि चीनचे युद्ध ६४ घराच्या पटावरं

Image
              येत्या मंगळवार २६ तारखेपासून भारत आणि चीन यामध्ये एक युद्ध रंगणार आहे मात्र घाबरायचे काहीच कारण नाही . कारण हे युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर रंगणार नाहीये या युद्धात काहीही जीवित आणि आर्थिक हानी होणार नाहीये .  हे युद्ध रंगेल सिंगापूर येथील  पूर्णतः वातानुकूलित अश्या हॉल मध्ये . या युद्धात भारताकडून प्रतिनिनित्व करतील चेन्न्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश तर चीनकडून ग्रँडमास्टर डिंग लिरेन हे प्रतिनिधींच्या करतील हे युद्ध रंगेल बुद्धिबळाच्या ६४ स्केअरच्या पटावर. हत्ती, घोडा उंट वजीर या पारंपरिक सैन्याच्या आधारे हे युद्ध खेळले जाईल. या युद्धातील विजेता बुद्धिबळाचा विश्वजिजेता म्हणून ओळखला जाईल. बुद्धिबळ कॅन्डीडेट २०२४ स्पर्धा चेन्नईचे ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी जिंकल्यामुळे,हे युद्ध खेळवण्यात येईल .               बुद्धिबळाचे पारंपरिक पद्धतीचे अर्थात बुद्धिबळपटूच्या भाषेत क्लासीकल पद्धतीचे एकूण १४ डाव या युद्धात खेळवण्यात येतील २६ तारखेपासून दररोज एक सामना खेळवण्यात येईल ..३ सामने झाल्यावर एक द...

रियल चक दे इंडिया..!

Image
शाहरुख खान यांनी अभिनय केलेला 'चक दे इंडिया', हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा क्रीडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या एका काल्पनिक विजयाची कथा मांडण्यात आली आहे.सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या  महिला आशियाई हॉकी  चॅम्पियनशिप भारतीय महिला संघ मिळवत असलेल्या यशामुळे ती रिल कथा रियल झाली असे म्हणता येण्यासारखी स्थिती आहे.साखळी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून हा मजकुर लिहण्यापर्यत खेळवण्यात आलेल्या ५सामन्यात भारताने सर्वच्या सर्व पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या आणि फार मोठ्या फरकाने धुळ चारली आहे मलेशिया विरुद्ध ४-० दक्षिण कोरिया  ३-२ ,थायलंड १३-० ,चीन ३-०, तर जपान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात३-०या फरकाने आपण सामने जिंकल्याने अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे.     आपल्याकडे सध्या निवडणुका सुरू असल्याने या गोष्टीला खूपच कमी जवळपास नाहीच म्हणता येईल अशी प्रसिध्दी देण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्तवाची आहे. एकेकाळी ज्या खेळा...

नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे

Image
                                              जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिग...