Posts

Showing posts with the label नैसर्गिक आपत्ती

'मना त्वाची पूर्वसंचित रे केले,

Image
'जनीं सर्वसूखीं असा कोण आहे ।  विचारें मना तूंचि शोधुनि पाहे ॥  मना त्वाची पूर्वसंचित रे केले !  तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'!  समर्थ रामदास स्वामी यांच्या सुप्रसिद्ध अश्या मनाच्या श्लोकातील ११ व्या  क्रमांकाचा श्लोक . या जगात पूर्णपणे सुखी असा कोणीही नाही, हे तू स्वतःच मनाला विचार करून शोधून पाहिले पाहिले पाहिजे. हे मना, तू स्वतःच पूर्वजन्मी जशी कर्मे केली आहेत, त्यानुसारच तुला फळे व सुख-दुःख भोगावी लागत आहेत अशा या श्लोकाचा अर्थ .सध्याच्या दुष्काळ सदृश्य स्थितीचा विचार करता श्लोकाचा खालचा अर्धा भाग विशेष महत्ताचा आहे.  मना त्वाची पूर्वसंचित रे केले! तया सारिखे भोगणे प्राप्त झाले'! गेल्या काही वर्षात आपण सामूहिकरित्या दाखवलेली  बेफिकीरीची शिक्षा आपण सध्या पाणी टंचाईच्या माध्यमातून अनुभवत आहोत    गेल्या ४ ते ५ वर्षात जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या अनेक घटना घडल्या,  काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आले. काही ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी थंडीची लाट आली. उष्णतेने गेल्या कित्येक वर्षाचे उच्चांक मोडले .आपला भारत त्यातही महाराष्ट्र...

नेमीची येते अवकाळी

Image
मी हा मजकूर लिहीत असताना पुणे शहर परिसरात अवकाळी पावसामूळे नागरिक धास्तावले आहेत. २ एप्रिल रोजी दुपार आणि सायंकाळच्या दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे पुणे परिसरात एका मराठी वाक्यप्रचाराची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झालेली आहे तो म्हणजे ' नेमीची  येते अवकाळी'.  नेमेची येतो पावसाळा या मराठी वाक्यप्रचारात  पावसाळी  या शब्दाचा जागी अवकाळी हा शब्द बदल करत  ही चर्चा रंगली आहे . तसे बघायला गेले तर पुणेकरांनी केलेला बदल योग्यच हे ना ? मागील गेल्या ४ ते ५  वर्षाचा आढावा घेतला तर, या वर्षात मार्च  ते मे महिन्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेला आढळेल, आणि हे चक्र असेच सुरु राहणार असल्याचे अनेक हवामान तज्ज्ञ सांगत आहेच. तुम्ही जर या पावसाचे फोटो व्हिडीओ फेसबुक सारख्या सोशल मीडियावर अपलोड केले असतील, तर पुढच्या वेळी तुम्ही  फेसबुक मेमरी बघताना बाहेर पाऊस पडत असेलच असे हे तज्ज्ञ सांगत आहेत.  मात्र असे असले तरी  देखील या समस्येवर आपल्याकडे ठोस उपाययोजना करण्याबाबत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असल्याचे चित्र मला तरी दिसत आहे. आपणांस जर काही ठोस ...

सिंहावलोकन २०२५ : नैसर्गिक अपत्ती

Image
  लवकरच नविन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष २०२६सुरु होईल. त्यावेळी सरत्या २०२५मध्ये आपणास काय अडचणी आल्या , काय आनंदाचे क्षण आपण अनुभवले   याचा धांडोळा घेतल्यास आपण नविन वर्षाचे स्वागत अधिक उत्तमपणे करु शकु ना ? हीच बाब हेरत मी सरत्या वर्षातील घटनांचा , प्रसंगाचा क्षेत्रनिहाय विषयनिहाय आढावा घेत आहे.या लेखात आपण सरते वर्ष २०२५ मध्ये कोणत्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागले.याचा आढावा घेवूया.नैसर्गिक आपापतीचा मानवावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात पुर्नवसन करावे लागत असल्याने प्रशाकीय यंत्रणेवर देखील मोठा   ताण येतो त्यामुळे त्या महत्वाच्या ठरतात                         आपण नैसर्गिक आपत्तीचे भूगर्भात घडणाऱ्या घडामोडीमुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाच्या बदलामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण करून शकतो . भूगर्भात होणाऱ्या आपत्तीमध्ये भूकंप , ज्वालामुखी यांचा समावेश करता येईल तर हवामान बदलामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आपण अवर्षण दुष्काळ , पूर बेमोसमी पाऊस , या सारख...

आतातरी हवामानबदल हा मुद्दा चर्चेत येणार का?

Image
  सध्या उत्तर महाराष्ट्र बेमोसमी पावसाचा तडाखा सहन करतोय . या तडाख्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . यथावकाश या नुकसानीचे पंचनामे होऊन    शेतकऱ्याना   योग्य तो मोबदला देखील मिळेल . मात्र गेल्या काही वर्षातील मार्च महिन्यातील घडामोडी बघता हा पाऊस काही नवीन घडामोडी राहिला नाहीये हा लेख वाचणारे सुद्धा सध्या पडणाऱ्या पावसाचा व्हिडीओ किंवा यावरील एखादे व्यंगचित्र फेसबुकवर अपलोड करून पुढील २०२४ या वर्षी फेसबुक मेमरी द्वारे त्यांचा अनुभव घेऊ शकतात किंवा मागील काही वर्षात ज्यांनी याविषयी फेसबुकवर काहीतरी अपलोड केले आहे ते याचा अनुभव घेतच असतील     मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या समस्येचा आपण अनुभव घेत असून देखील आपल्याकडून या समस्येला तोंड देण्यासाठी काही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचे चित्र समोर येत नाहीये दरवर्षी शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र जगभरात ज्या प्रमाणे सरकारे हवामानबदला य...

आपण तयार आहोत का ?

Image
  युरोप आणि आशिया खंडाच्या सीमेवर वसलेल्या तुर्कीये ( जुने नाव तुर्कस्तान ) या देशाची पहाट   ६ फेब्रुवारी रोजी महाविध्वंसकारी भूकंपाच्या उद्रेकाने उजाडली . हा लेख लिहण्यापर्यंत या ठिकाणी १५०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे . तुम्ही हा लेख वाचेपर्यंत याची संख्य मोठ्या प्रमाणत वाढलेली असू शकते . तुर्कीये   ( जुने नाव तुर्कस्तान ) या देशावर ओढवलेले संकट महाभयानक आहे , त्यात जीवास मुकलेल्या व्यक्तींना सर्वप्रथम विनम्र आदरांजली   जगात काही भूकंपाची केंद्रे आहेत तुर्कस्तान हा देश अश्या भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील भागात मोडतो त्या ठिकाणी याच्या गोदर देखील मोठ्या रिक्टर स्केलचे भूकंप जाणवले आहेत / या महाविनाशकारी भूकंपामुळे काही प्रश्नाला जन्म मिळाला आहे . त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन            तर तुर्कस्तान सारखाच भूकंपासाठी संवेदनशील भाग म्हणजे आपला उत्तर भारत होय . भूगर्भ शास्त्रज्ञांनी उत्तर भारतात मोठा भू...