15 नाही 66 टक्के दरवाढ!
आपल्या महाराष्ट्र एसटीने आपल्या प्रवासी भाड्यात 15 टक्क्याची वाढ केल्याची माहिती तुम्हाला असेलच. ही दरवाढ जाहीर करताना, आपल्या महामंडळाने फक्त सर्वसाधारण तिकिटाचीच दरवाढ जाहीर केली होती, आणि एसटी महामंडळाकडून जे पास देण्यात येतात त्यांची दरवाढ नंतर जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. दरवाढ जाहीर केल्यानंतर 4 दिवसांनी अर्थात 29 जानेवारी रोजी महामंडळाने एक परिपत्रक जाहीर प्रसिद्ध करून पासची दरवाढ जाहीर केली..पासची दरवाढ बघताना, 'आवडेल तिथे प्रवास' या पासामध्ये तब्बल 66% ची दरवाढ करण्यात आलेली आहे असे दिसून आले. जे पूर्णतः अयोग्य आहे.पुर्वी प्रौढांसाठी 4दिवसांसाठीचा शिवशाहीचा पास 1520रुपयांमध्ये होता जो आता 2533 रुपयेला मिळेल. तसेच साध्या बसचा 4दिवसांच्या प्रौढाच्या पाससाठी 1170 च्या ऐवजी 1814 रूपये मोजावे लागतील 7दिवसाच्या प्रौढ साध्या बसचा प्रवास 2040च्या 3171 रुपयांना मिळेल तर 7 दिवसाचा शिवशाही पास 3030ऐवजी 4429रूपयांना मिळेल
एसटी महामंडळाकडून देण्यात आलेल्या या पासचा फायदा घेत, अनेक हौसी प्रवाशी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात फिरत असे.या प्रवाश्यांमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला मोठा फायदा होत असे.अनेक युट्युबर या पासचा फायदा घेत फिरत आणि आपल्या युट्युब चॅनेलवर त्याविषयीचे व्हिडीओ अपलोड करुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील समाजजीवनाचे दर्शन जगाला घडवत .अनेक कुटुंबे या पासचा फायदा घेत देवदर्शन करत असे.मी स्वत: या योजनेचा फायदा घेत सोलापूर जवळील अक्कलकोट, तूळजापूर, गांगापूर, पंढरपूर या देवस्थळांना भेटी दिल्या आहेत.मात्र यातील अनेक बाबी आता इतिहासजमा झाल्या आहेत कारण या पासचे अवास्तव वाढवण्यात आलेले मुल्य.
आवडेल तिथे प्रवास या योजनेत पासधारकाने किती वेळा बसमध्ये चढावे आणि उतरावे याला काहीही मर्यादा नाही .हा पासधारक आपल्या पासच्या मर्यादेत किमान 4 किंवा त्यापेक्षा जास्तवेळा बसमध्ये बसमध्ये चढतो हे जरी मान्य केले तरी 66% दरवाढ ही समर्थणीय ठरूच शकत नाही.यात प्रवाशी जास्त वेळा प्रवास करतो ,त्या प्रत्येकवेळी त्याचाकडून 15% जास्त भाडे मिळायला हवे हा मुद्दा योजनेच्या मुळ तत्वाशी विसंगत आहे.सर्वसाधरण भाडे जर 15% वाढत असेल तर या योजनेच्या पासचे मुल्य 30 % टक्केच वाढणे न्याय सुसंगत आहे.तसे न करता थेट 66% दरवाढ करणे चूकीचे आहे.या योजनेचा फायदा घेत पासधारक सर्वसाधरणत: नाशिक ते कोल्हापूर, कोल्हापूर ते नांदेड असा लांबचा प्रवास करतो त्यामुळे तो प्रत्येक दिवशी साधरणत: एकदाच बसमध्ये बसतो त्या प्रत्येक दिवशी स्वतंत्र्यपणे साधरण 15 % आकारणे चूकीचेच आहे.महामंडळाने ही अन्यायकारक भाडेवाढ रोखणेच आवश्यक आहे.एसटीचा पासधारकांचा विचार करता या 'आवडेल तिथे प्रवास'या योजनेतील पसधारकांची संख्या मोठी आहे.मात्र ही दरवाढ बघता नजिकच्या भविष्यकाळात त्यात मोठी घट होवू शकते जे महामंडळाला परवडणारे नाहीच.तरी आपल्या स्व रक्षणासाठी ही अवास्तव भाडेवाढ रोखणे हेच एसटी महामंडळाच्या हिताचे आहे.
Comments
Post a Comment