इथेही 56
विद्यमान सत्ताधिकारी वर्गाकडून या पुर्वी अनेकदा 56इंच छाती आहे आमची, असे सांगितले जात असल्याचे वाचकांना आठवत असेलच .स्व अभिमान सांगण्यासाठी वापरण्यात येणारा 56 हा आकडा सत्ताधारी वर्गाला खुपच प्रिय असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. कारण त्यांच्याकडून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार 56 टक्केच देण्यात आला आहे. मुळातच तूटपुंजा असणारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी केल्याने त्यांचा समोर जीवन मरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एसटी महामंडळाच्या या दुखण्यावर काय उपचार करायचे ? हे माहिती आहे पण राजकीय इच्छा शक्तीच्या अभावी योग्य ते उपाय होत नाहीये.सध्या एसटी महामंडळाला अतिशय मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. वरवरची मलमपट्टी स्वरूपात आर्थिक मदत देवून वेळ मारली जाते ती पुन्हा एकदा मदत देण्याची स्थिती येण्यापर्यत.हे चक्र भेदणे हे संकट दुर करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत अस्या कित्येक सवलती आपल्या महामंडळाकडून देण्यात येतात ,समाजसेवेच्या नावाखाली,जसे या सवलती देण्याचा ठेका महाराष्ट्र एसटी महामंडळानेच घेतलाय. सरकारकडून या सवलतीच्या निधीची पुर्तता होत असली त्यात मोठा कालावधी जातो.आज या सवलतीमुळे महामंडळाला न मिळणाऱ्या निधीसह अतिरीक्त निधीची गरज एसटी महामंडळाला देणे अत्यावश्यक आहे मात्र सवलतीची रक्कम देण्यातच सत्ताधिकारी धन्य मानत आहेत,त्यामुळे एसटीचे दुखणे बरे होताना दिसत नाहीये.
निधीच्या पुरेस्या तरतूदीसह इतर राज्यातील एसटी महामंडळाकडून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाला असणाऱ्या धोक्याबाबत आवश्यक ती पाउले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे. इतर राज्यातील एसटी बसेस आपल्या महामंडळाच्या बस स्थानकात आपल्या बस शेजारी त्यांची बस उभी करुन आपला नफा पळवतात. पुर्वी ज्या प्रमाणे एखाद्या आजाराचा रुग्ण दाखवा अमुक इतके रूपये मिळवा अस्या जहिराती असत.त्या धर्तीवर ज्या तालूक्यात इतर राज्याची बस येत नाही तो तालूका दाखवा आणि अमुक इतके रूपये मिळवा असी जाहिरात करण्याची वेळ आली आहे.
श्रीमंतांना प्रवाश्याची इतर साधने असली तरी, राज्यातील गोरगरीब जनतेला मात्र एसटीचाच आधार आहे. राज्यातील खेडोपाडीचे अनेक पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी एसटीकडून मोफत तसेच कमी दरात प्रवास करता येत असल्यानेच शाळेत पाठवत आहे.जर एसटीची चाके थांबली तर यांच्या शिक्षणाची चाके सुद्धा थांबतील ,हे वेगळे सांगायला नकोच.त्यामुळे एसटी टिकणे आवश्यक आहे. आणि एसटी महामंडळ टिकण्यासाठी सध्या देण्यात येते त्यापेक्षा जास्त मदतीची गरज आहे,आता ती खरच देण्यात येते का, हे बघणे आवश्यकच आहे. नाहीतर आहेच ये रे माझ्या मागल्या..
Comments
Post a Comment