भारतीय बुद्धिबळ क्षेत्राची वर्षाखेर गोड!
बुद्धिबळ प्रौढ पुरुष गटात क्लासिकल (पारंपारीक) पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वात कमी वयातविश्वविजेतेपद मिळवण्याचा भीम पराक्रम ग्रँड मास्टर डी.गुकेश यांनी करून काहीच दिवस होत नाही. तोच भारतीय बुद्धिबळप्रेमींना आनंद देणारी अजून एक बातमी २९डिसेंबर रोजी येवून धडकल्याने, भारतीयांनाअक्षरश:आकाश ठेंगणे झाले.भारतीय प्रमाणवेळेनुसार २७ते २९ डिसेंबर या दरम्यान रात्री साडेबारा ते पहाटे चार या वेळात न्युयॉर्क येथे खेळवण्यात (न्युयॉर्कच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार २६ते २८डिसेंबर दुपारी अडीच वाजता )आलेल्या जागतिक प्रौढ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा महिला गटात भारताची क्रमांक एकची खेळाडू ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांनी विजेतेपद मिळवत रॅपिडचे विश्वविजेतेपद पटकावल्याची,हीच ही बातमी.
तूम्हाला हे वाचून प्रश्न पडला असेल हे काय? गुकेश तर आताच विश्वविजेता झाला आता हे काय ? नविन.तर सांगतो जागतिक स्तरावर बुद्धिबळ स्पर्धा गटात खेळवण्यात येतात या गटाचे वयानुसार ३गट पडतात .12 वर्षाखालील खेळाडू ज्या गटात खेळतात त्यास सब ज्युनियर गट म्हणतात. खेळाडु 12 वर्षापेक्षा मोठा मात्र 19 वर्षापेक्षा लहान आहे असल्यास तो ज्युनिअर गटात खेळतो तर 19 वर्षापेक्षा मोठा झाल्यावर तो प्रौढ गटात खेळतो. क्रिकेट ज्या प्रकारे टेस्ट, वनडे आणि टी ट्वेंटी या प्रकारात खेळवण्यात येते त्याच प्रकारे बुद्धिबळ हे क्लासिकल रॅपिड आणि बिट्स खेळवण्यात येते याशिवाय महिला आणि पुरुष असे दोन गट असतातच.
आता बुद्धिबळाचे प्रकार सविस्तर बघूया मित्रांनो आपली बुद्धिबळ विषयी सर्वसाधारण कल्पना जी असते जसे की तासनतास मॅच सुरू आहे त्यास क्लासिकल असे म्हणतात. जागतिक स्तरावर क्लासिकल मॅच सर्वसाधारणतः किमान दोन तास चालते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झाल्यास आपण त्यास टेस्ट मॅच असे म्हणू शकतो. यानंतरचा प्रकार येतो तो म्हणजे रॅपिड. ही मॅच अर्धा तासात संपते. क्रिकेटचा संदर्भ देऊन बोलायचं झाल्यास त्यास आपण वनडे असे म्हणू शकतो त्यानंतरचा तिसरा प्रकार येतो तो म्हणजे बिल्टस.हा प्रकार.जो पाच ते दहा मिनिटात संपतो आपण त्यास बुद्धिबळातील टी 20 असे म्हणू शकतो .
आता ही वेळ कशी मोजतात तर सांगतो बुद्धिबळ खेळात एक वैशिष्ठपुर्ण घड्याळ वापरण्यात येते.ज्यात दोन स्टॉप एकत्रितपणे काम करणारे एक घड्याळ असते. खेळाडू त्याचे खेळणे झाल्यावर आपल्या स्टॉप वरचे बटन दाबतो. त्यानंतर त्याचे स्टॉप वॉच बंद होते आणि दुसऱ्याचे सुरू होते दुसरा खेळाडूचे खेळणे झाल्यावर तो खेळाडू त्याचे स्टॉप वॉच दाबतो आणि परत पहिल्याचे सुरू सुरू होते. या पद्धतीने ज्याची वेळ पहिल्यांदा संपते तो खेळाडू हरतो
बुद्धिबळाच्या या तिन्ही प्रकारात आणि वयोगटानुसार तसेच महिला आणि पुरुष या प्रकारे बुद्धिबळाचा स्पर्धा होत असतात.या प्रत्येक गटाचा विश्वविजेता वेगवेगळा असतो.त्यामुळे ग्रँडमास्टर डी गुकेश इंटरनॅशनल दिव्या देशमुख आणि ग्रँडमास्टर कोनेरु हपी हे तीन भारतीय एकाच वेळी विश्वविजेते होवू शकतातअसो. आजमितीस प्रौढ पुरुष क्लासिकल गटात ग्रँडमास्टर डी.गुकेश. ज्युनियर महिला रॅपिड गटात इंटर नॅशनल दिव्या देशमुख,तर प्रौढ महिला रॅपिड गटात ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हे विश्वविजेते आहेत.
ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांनी मिळवलेले यश अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे .हे त्यांचे प्रौढ महिला रॅपिड गटातील दुसरे विश्वविजेतेपद आहे या आधी त्यांनी हाच पराक्रम २०१९साली केला होता ज्याची पुनरावृत्ती त्यांनी 5वर्षांनी केले आहे.या दरम्यानचा पाच वर्षात दोनदा त्यांचे विश्वविजेतेपद थोडक्यात हुकले.
ग्रँडमास्टर कोनेरु हंपी यांचे विश्वविजेतेपद अजून एका गोष्टीसाठी महत्त्वाचे ठरते ते म्हणजे त्यांचे वय. अन्य मैदानी खेळासारखे बुद्धीबळात देखील निवृत्तीचे एक वय आहे.मैदानी खेळात खेळाडूला शाररीक असामर्थ्यामुळे ३५च्या आसपास खेळातून संन्यास घ्यावा लागत असेल तर बुद्धिबळात ती वयोमर्यादा दोन ते तीन वर्ष वाढते इतकेच जागतिक स्तरावर स्पर्धात्मक खेळण्यासाठी ज्या प्रकारचे बौद्धिक आणि शाररिक सामर्थ्य हवे असते त्याचा अभावामुळे ३८च्या आसपास खेळाडूला माघार घ्यावीच लागते.( बुद्धिबळ हा खेळ जरी बौद्धिक मानण्यात येत असला तरी निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते या वाक्यप्रचारानुसार सलग बसून एकाग्र होण्यासाठी बुद्धिबळात सुद्धा शारीरिक क्षमता लागतातच. [आपण कोणतेही दुखणे नसताना ज्या सहजतेने विचार करू शकतो. त्या त्या सहजतेने आपणास एखाद्या दुखणे असल्यास करू शकत नाही याचा अनुभव घेत असतोच])
ग्रँडमास्टर कोनेरु हंपी या आता ३७ वर्षाच्या आहेत. म्हणजेच त्या आता निवृत्तीचा टप्प्यावर आहेत. निवृत्तीचा टप्प्यात असताना मिळवलेले हे यश त्यामुळे अधिकच महत्त्वाचे ठरते
त्यांनी या टप्प्यात मिळवलेल्या या यशामुळे बुद्धिबळात सध्या महत्त्वाचे समजले जाणाऱ्या ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद, ग्रँडमास्टर अर्जुन इरेगसी, ग्रँडमास्टर आर वैशाली यांच्यासारख्या बुद्धिबळपटूंचा उत्साह वाढण्यासह त्यांची जागा घेण्यास नवीन खेळाडूंना सुद्धा स्फूर्ती मिळेल हे नक्की

Comments
Post a Comment