शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध !

शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध ! शीर्षक वाचून गोंधळलात पडला का,? आधीच जगात दोन युद्ध सुरु आहेत.एक आहे गेल्या साडेतीन वर्षापासून सुरु असलेले रशिया -युक्रेन युद्ध आणि दुसरे म्हणजे इराण विरूद्ध अमेरिका इस्राइल हे युद्ध .या दोन्ही युद्धामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.आता पुन्हा नवीन  युद्ध होणार म्हणजे फक्त त्रास त्रास आणि त्रासच .असा विचार येत असेल तर जरा थांबा. या युद्धामुळे तूम्हाला त्रास होणार नाही तर आनंदच मिळणार आहे.बौद्धिक आनंदाचा अनुभव तूम्हाला या युद्धातून तूम्हाला घेता येणार आहे. 'गर्व से कहो हम भारतीय है' असे अभिमानाने म्हणत तिरंगा फिरवण्याची संधी तूम्हाला या युद्धामुळे मिळणार आहे.भारतीयांची बुद्धीची दखल जगाला आदराने घेण्याचा प्रसंग या युद्धामुळे  होवू शकतो.  
हे युद्ध शस्त्रांनी लढले जाणार नाही.तर बुद्धीने  लढले जाणार आहे. आता बुद्धीने लढले जाणारे युद्ध म्हटल्यावर तूम्हाला वाटले असेल ए.आय.चा वापर असेल,गेला बाजार एकमेकांचा महत्त्वाच्या प्रणालीत सायबर अटॅक करून त्या निकामी करणे असेल.किमानपक्षी रॉकेट उडवून दुसऱ्याचे उपग्रह निकामी करत प्रतीस्पर्ध्याला  नामोहरण करणे असेल तर सांगतो असे काहीही नसेल.ह नाही म्हणायला ए.आय.चा वापर असेल मात्र तो प्रत्यक्ष रणभुमीवर युद्ध क्षेत्रात नसेल तर युद्धाची रणनिति आखायला असेल .प्रत्यक्ष युद्धात दोन प्रग्लभ तीक्ष्ण बुद्धीच्या व्यक्ती
ए.सी हॉल मध्ये समोरासमोर बसतील आणि आपल्या बुद्धी चातुर्याने प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न करत विश्वविजेत्याचा खुर्चीवर विराजमान होण्यासाठी आपसात झुंजतील
तर माझ्या वाचक मित्र -मैत्रीणींनो मी बोलत आहे, बुद्विबळ या खेळाच्या क्लासिकल प्रकारातील विश्वविजेता लढतीविषयी. या वर्षीची ही लढत होणार आहे जिनीव्हा या शहरात २५ नोव्हेंबर ते १५डिसेंबर या कालावधीत. जिनीव्हा शहर शांततेविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांचे मुख्यालय आहे.जिनिव्हा हे शहर ज्या देशात आहे तो स्विझरलँड हा देश अनेक संघर्षात मध्यस्थाची भुमिका बजावतो. म्हणून म्हटले शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध !
विद्यमान विश्वविजेता आपल्या सर्वांचा लाडका ग्रँडमास्टर डी.गुकेश आणि उझबेकिस्तान या देशाचा ग्रँडमास्टर जवोखिर सिंदारोव यांच्यात ही लढत होईल.ग्रँडमास्टर डी.गुकेश आपले विद्यमान विश्वविजेतपद सांभळण्यासाठी खेळेल तर उझबेकिस्तान या देशाचा ग्रँडमास्टर जवोखिर सिंदारोव त्याचे सिंहासन हिसकावून नवा विश्वविजेता होण्यासाठी खेळेल.
भारतीय म्हणून ग्रँडमास्टर डी.गुकेशचा अभिमान आहेच.मात्र विश्वविजेतेपद मिळवल्यापासून आतापर्यतचा विचार केला तर गुकेशचा खेळ काहीसा खालावलायं.अनेक महत्त्वाचा स्पर्धांमध्ये त्याला आश्चर्यकारकरीत्या पराभव बघावा लागलाय. ज्याचा परीणाम त्याचा फिडे रेटिंगवर झाला आहे. तो विश्वविजेता पदाचा ताण घेऊन खेळतो. तर या उलट विरूद्ध बाजुच्या खेळाडुवर ताण नसतो. उलट विश्वविजेत्याशी खेळायला मिळणार म्हणून वेगळाच आनंद असतो. परीणामी जिंकायची संधी असून देखील खेळाच्या शेवटी ग्रँडमास्टर डी.गुकेशचा खेळ ढासळतो आणि गुकेश डाव हरतो, असे त्याविषयी सातत्याने बोलले जाते. काही जण जहरी टिका करताना त्यास अपघाताने दैव बलवत्तर म्हणून झालेला विश्वविजेता म्हणत त्याची खिल्ली उडवतात. याउलट त्याला आव्हान देणारा उझबेकिस्तान या देशाचा ग्रँडमास्टर जवोखिर सिंदारोव याचा खेळ बहरत आहे.त्याने अनेक डावात आश्चर्यकारक विजय मिळवले आहे.या सकारात्मक वातावरणाचा फायदा उझबेकिस्तान या देशाचा ग्रँडमास्टर जवोखिर सिंदारोव विश्वविजेता होतो की, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा नव्याने भरारी घेत आपल्या सर्वांचा आवडता लाडका ग्रँडमास्टर डी गुकेश आपले विश्वविजेतेपद टिकवतो हे आपणास उशीरात उशीरा १५डिसेंबरला समजेलच.तोपर्यत आपण गुकेशच्या यशासाठी प्रार्थना मात्र नक्कीच करु शकतो.

Comments

Popular posts from this blog

विनाशकाले...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?