रियल चक दे इंडिया..!

शाहरुख खान यांनी अभिनय केलेला 'चक दे इंडिया', हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा क्रीडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात भारतीय महिला हॉकी संघाने मिळवलेल्या एका काल्पनिक विजयाची कथा मांडण्यात आली आहे.सध्या बिहारमध्ये सुरु असलेल्या  महिला आशियाई हॉकी  चॅम्पियनशिप भारतीय महिला संघ मिळवत असलेल्या यशामुळे ती रिल कथा रियल झाली असे म्हणता येण्यासारखी स्थिती आहे.साखळी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होत असून हा मजकुर लिहण्यापर्यत खेळवण्यात आलेल्या ५सामन्यात भारताने सर्वच्या सर्व पाच सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या आणि फार मोठ्या फरकाने धुळ चारली आहे मलेशिया विरुद्ध ४-० दक्षिण कोरिया  ३-२ ,थायलंड १३-० ,चीन ३-०, तर जपान विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात३-०या फरकाने आपण सामने जिंकल्याने अंतीम फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे.
    आपल्याकडे सध्या निवडणुका सुरू असल्याने या गोष्टीला खूपच कमी जवळपास नाहीच म्हणता येईल अशी प्रसिध्दी देण्यात आली आहे. मात्र ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्तवाची आहे. एकेकाळी ज्या खेळाचे आपण अनभिषिक्त सम्राट होतो त्या खेळात पुरुष गटात नसेना मात्र महिलांच्या गटात आपण पुन्हा सम्राट होण्याच्या दृष्टीने आपण टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल.भारतीय पुरुष संघाची कामगिरी  पुर्वीपेक्षा वेगाने सुधारत असली तरी आपण पुर्वीपेक्षा खुपच मागे आहोत.गेल्या काही वर्षात पुरुष संघाने कोणतीही मोठी स्पर्धा सध्या महिला हॉकी टीम ज्या सहजतेने दणदणीत विजय मिळवत आहे,तितक्या विक्रमी फरकाने जिंकलेली नाही यातूनच या विजयाचे महत्त समजून येते‌  आशियाई हॉकी स्पर्धेत महिला संघ जे यश मिळवत आहे. त्याचे महत्व फक्त हॉकी खेळापुरते मर्यादित करता येणे अशक्य आहे.माझ्या मते ही गोष्ट सर्व भारतीय  महिला क्रिडा विश्वासाठी महत्तवाची आहे. 
आपल्याकडे महिला क्रीडा विश्वाची स्थिती अत्यंत दयणीय आहे‌.क्रिकेटच्या उदाहरणातून ही गोष्ट छान पद्धतीने समजून घेवू शकतो. महिला खेळत असलेल्या क्रिकेट संघाचा उल्लेख भारतीय महिला क्रिकेट संघ असा होतो‌ तर पुरुष खेळाडू खेळत असलेल्या संघाचा उल्लेख मात्र भारतीय पुरुष क्रिकेट संघ असा न होता.भारतीय क्रिकेट संघ असा होतो जणूकाही भारतीय क्रिकेट संघात मिश्र दुहेरी  टेनिसप्रमाणे पुरुष आणि महिला खेळाडू एकत्रीतपणे खेळतात आणि खास  महिलांसाठी वेगळा संघ देखील काढण्यात आला आहे .जी गोष्ट क्रिकेटची तीच गोष्ट सर्व महिला क्रीडा संघाची आहे. पुरुष संघाच्या तूलनेत महिला संघाला नेहमीच दुय्यम वागणूक मिळते, त्या पार्श्वभुमीवर आपला महिला हॉकी संघ मिळवत असलेले यश खूपच अभिमानाची कौतुकाची गरज आहे. हे आपण लक्षात घेयला हवे.

Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला