येत्या मंगळवार २६ तारखेपासून भारत आणि चीन यामध्ये एक युद्ध रंगणार आहे मात्र घाबरायचे काहीच कारण नाही . कारण हे युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर रंगणार नाहीये या युद्धात काहीही जीवित आणि आर्थिक हानी होणार नाहीये . हे युद्ध रंगेल सिंगापूर येथील पूर्णतः वातानुकूलित अश्या हॉल मध्ये . या युद्धात भारताकडून प्रतिनिनित्व करतील चेन्न्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश तर चीनकडून ग्रँडमास्टर डिंग लिरेन हे प्रतिनिधींच्या करतील हे युद्ध रंगेल बुद्धिबळाच्या ६४ स्केअरच्या पटावर. हत्ती, घोडा उंट वजीर या पारंपरिक सैन्याच्या आधारे हे युद्ध खेळले जाईल. या युद्धातील विजेता बुद्धिबळाचा विश्वजिजेता म्हणून ओळखला जाईल. बुद्धिबळ कॅन्डीडेट २०२४ स्पर्धा चेन्नईचे ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी जिंकल्यामुळे,हे युद्ध खेळवण्यात येईल .

बुद्धिबळाचे पारंपरिक पद्धतीचे अर्थात बुद्धिबळपटूच्या भाषेत क्लासीकल पद्धतीचे एकूण १४ डाव या युद्धात खेळवण्यात येतील २६ तारखेपासून दररोज एक सामना खेळवण्यात येईल ..३ सामने झाल्यावर एक दिवस विश्रांतीचा असेल . स्पर्धेतील शेवटचा क्लासीकल पद्धतीचा सामना १२ डिसेंबर रोजी खेळवण्यात येईल प्रत्येक खेळाडूला सामना जिंकल्यास १ गूण मिळेल जर सामना अनिर्णयीत राहिल्यास दोन्ही खेळाडूंना अर्धा गूण मिळेल ज्या खेळाडूचे सर्व प्रथम साडेसात गुण होतील तो होईल बुद्धिबळाचा विश्वविजेता . जर अखेरच्या १४ व्या डावापर्यंत दोन्ही खेळाडूंचे समसामान ७ गुण झाल्यास टायब्रेकचे सामने खेळववण्यता येतील ट्रायब्रेकरचे सामने जलद पद्धतीने खळवण्यात येतील आणि यातून अंतिम विजेता निवडण्यात येईल. बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत कोणत्याही दोन आशियाई खेळाडूंमध्ये हि स्पर्धा होण्याची ही पहिलीच वेळ आहे या स्पर्धत डी गुकेश यांनी विजेतेपद मिळवल्यास ते बुद्धिबळ विश्वविजेतेपद मिळवणारे दुसरेच भारतीय असतील या आधी हा पराक्रम भारताचे पहिलेच ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांनी केला होता ,
मित्रानो, सन १९४४ पासून दरवर्षी बुद्धिबळाचे आंतरराष्टीय स्तरावर नियमन करणाऱ्या "फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑफ दि इचेस" अर्थात 'फिडे' कडून विश्वविजेता होण्यसासाठी स्पर्धेचे अयोजन करण्यात येते. या वेळी विद्यमान विश्वविजेत्यास नवीन विश्वविजेता होण्यासाठी कोणता बुद्धिबळपटू आव्हान देणार ? हे
ठरवण्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते ज्यास कॅन्डीडेट स्पर्धा म्हणतात. जगातली अव्वल ८ खेळाडू ही स्पर्धा खेळतात . या कॅन्डीडेट स्पर्धेतील विजेता विद्यमान विश्वविजेत्यास आव्हान देतो.
तर २०२४ मधील कॅन्डीडेट स्पर्धा ३ एप्रिल ते २१ एप्रिल या दरम्यान कॅनडा देशातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चेन्नईचे भूमिपुत्र डी गुकेश यांनी या स्पर्धेत झालेल्या १४ सामन्यात फक्त एका डावात पराभव स्वीकारत ९ गुणांची कमाई करत, विजेतेपद मिळवल्याने, विद्यमान पुरुष बुद्धिबळ विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन याला ते आता आव्हान देत आहेत.
ग्रँडमास्टर डी गुकेश बुद्धिबळाच्या इतिहास बघितल्यास ही स्पर्धा जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू आहेत. ते आता फक्त १७ वर्षाचे आहेत. ते पुढील दोन दशके सहज बुद्धिबळ खेळू शकतात.या प्रदीर्घ कालावधीचा विचार करता ग्रँडमास्टर डी गुकेश हे बुद्धिबळ क्षेत्रात मोठी झेप घेऊन भारताची पताका अभिमानाने उंचावत ठेवतील, हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही.

अन्य मैदानी खेळात जशी खेळाडूला वयोमर्यादेची अट आहे तोच प्रकार बुद्धिबळात देखील आहे. अन्य मैदानी खेळात जर खेळाडूं ३२ ते ३४ या दरम्यान निवृत्ती स्वीकारत असेल, तर बुद्धिबळाच्या बाबतीत हि मर्यादा थोडी लांबत ३९ ते ४० वर्षाची होते, इतकाच काय तो फरक स्पर्धात्मक बुद्धिबळ खेळण्यासाठी ज्या क्षमतेचे बौद्धिक आणि शारीरिक कौशल्य लागते ते बघता वयाच्या ४० पार केल्यावर पूर्वीचाच क्षमता टिकवणे काहीसे अवघड होते असल्याने बुद्धिबळपटूला स्पर्धातम्क खेळातून माघार घ्यावी लागते . आता प्रसिद्ध असलेले ग्रँडमास्टर विदित गुजराथी, ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, हे बुद्धिबळ खेळाडू ३० ते ३५ या वयोगटातील आहेत, त्या अर्थाने त्यांचा खेळ उतरणीला लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची जागा घेणारे ग्रँडमास्टर डी गुकेश हे आपली चुणुक दाखवून देत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रँडमास्टर डी गुकेश यांच्या खेळाचे वैशिष्ट म्हणजे प्रतिस्पर्ध्याला विचार करायला भाग पडेल, अश्या खेळ्या करणे. या आधी त्यांनी बुध्दिबळाच्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यामुळे त्यांना फिडे सर्किट या बहुमानातील दुसरे स्थान मिळाले आहे.गेल्या काही स्पर्धेतील दि गुकेश यांच्या कामगिरी बघता त्यांना संभाव्य विश्वविजेता म्हणून जागतिक स्तरावर बघितले जात आहे थोड्या वेगळ्या भाषेत बोलायचे झाल्यास बुद्धिबळ विश्वविजेते पदाला कोण गवसणी घालणार याचे एक्झिट पोल डी गुकेश यांच्या पदरात जात आहे
डिंग लिरेन यांच्या बाबत बोलयताचे झाल्यास सन २०१८ आणि २०१९ मध्ये सलग १०० सामने जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे . ते ३२ वर्षाचे असून चीनचे नागरिक आहेत त्यांनी सन सन २०२२ साली २०२१ च्या बुद्धिबळ कॅन्डीडेट स्पर्धा विजेता इयान मेपोमाची याला पराभूत करत विश्वविजेते पदाला गवसणी घातली होती २०२२ साली त्यावेळचा बुद्धिबळ विश्वविजेता आताच सर्वाधिक फिडे गुणकांना खेळाडू मॅग्नस कार्लसन यांनी
विश्वविजेता स्पर्धा खेळण्यास नकार दिल्याने दिल्याने २०२१ चा कॅन्डीडेट स्पर्धा विजेता इयान मेपोमाची यांची आणि डिंग लिरेन यांच्यात विश्वविजता पदाची स्पर्धा खेळवण्यात आली होती . गेल्या काही स्पर्धंतील डिंग लिरेन यांच्या खेळ लौकिकास साजेसा होत नाहीये अर्थात ते विद्यमान विश्वविजेते असल्याने या स्पर्धत दबाव सहन करण्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे त्यामुळे या स्पर्धेतील विश्वविजेता म्हणून आपल्या भारताच्या डी गुकेश यांच्याकडे बघितले जात असले तरी पारडे फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये
यावर्षी कॅन्डीडेट स्पर्धा जिंकणारे ग्रँडमास्टर डी गुकेश हे ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारे दुसरेच भारतीय बुद्धिबळपटू आहेत .ग्रँडमास्टर विश्वनाथन यांनी २०१४ साली हि स्पर्धा जिंकली होतो त्यावेळी कॅण्डीडेटच नव्हे तर बुद्धिबळ विश्वविजेता पदाला देखील ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी गवसणी घातली होती. त्यानंतर विश्वनाथन आनंद यांच्याच शहरातील अर्थात चेन्नई मधील ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी हा मोठा पराक्रम केला . मात्र या साठी तब्बल १० वर्षाचा वेळ जावा लागला.
आपल्या भारतात दुदैवाने सी फॉर क्रिकेट असा अर्थ घेतला जातो अनेक क्रिकेटर्सला मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळतात. क्रिकेट हा अत्यंत मोजक्या देशात खेळाला जाणारा मुळातील विदेशी खेळ आहे. तर बुद्धिबळाचे नियमन करणाऱ्या फिडे चे जगातील १९ ० देश सदस्य आहेत. आणि हा खेळ पूर्णतः भारतीय आहे. हा
खेळ भारतीयांनी भारतात शोधला आहे.बँडमिंटन सारखा पुण्यात मात्र ब्रिटिशांनी शोधलेला नाही. एका अर्थाने क्रिकेट गुलामीचे प्रतीक आहे जे कोणत्याही सार्वभौम देशासाठी अपमानास्पद आहे मात्र बुद्धिबळासाठी ही बाब लागू होत नाही. त्यामुळे भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणूनच या कडे बघता येईल .
Comments
Post a Comment