असा झाला बुद्धिबळ विश्वविजेतेपदाचा प्रवास
चेन्नईचे भूमिपुत्र ग्रँडमास्टर डी गुकेश हे चीनचा नागरिक ग्रँडमास्टर माजी विश्वविजेता डिंग वीरेन यास जागतिक बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धा २०२४ च्या १४ व्य फेरीत नाट्यमयरित्या हरवून नवे बुद्धिबळ विश्वविजेते झाल्याचे एव्हाना आपणास समजले असेलच मात्र हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता , आणि गेल्या तीन आठवड्यापूर्वीच सुरु झालेला नव्हता .तर त्यासाठी किमान २ वर्षाची अथक तपश्चर्या होती
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा लौकिक अर्थाने २५ नोव्हेंबर २०२४ ला सुरु झाली असली तरी ती जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल ही स्पर्धा मागच्या वर्षी २०२३ ला सुरु झाली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल २०२३ साली बुद्धिबळाची जागतिक स्तरावर नियमन करणारी संस्था फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस अर्थात फिडे या संस्थेकडून खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने ग्रँडमास्टर डी गुकेश या स्पर्धामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यामुळे ते बुद्धिबळ
विश्वविजेत्याला कोण आव्हान देणार हे ठरवणारी कॅन्डीडेट स्पर्धा खेळण्यास पात्र ठरलेकॅन्डीडेट स्पर्धा जगातील अव्वल अश्या ८ खेळाडूंमध्ये होते या ८ खेळाडूंची निवड विविध निकषांद्वारे होते .एक म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे. भारताचे १८ वर्षीय प्रज्ञानंद गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरले होते त्यामुळे यंदाच्या ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरणारे भारताचे ते पहिलेबुद्धिबळपटू होते. त्यानंतर विदित गुजराथी आणि प्रज्ञानंदची बहीण आर. वैशालीने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. या दोघांनी ग्रँड स्वीस स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया साधली होती. या स्पर्धेतील पुरुष व महिला विभागांमधील अव्वल दोन खेळाडू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले. तसेच २०२३च्या ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेत (फिडे सर्किट) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बुद्धिबळपटूलाही ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळते. ‘फिडे सर्किट’मध्ये
फॅबियानो करुआनाने सर्वोत्तम कामगिरी केली, तर गुकेश दुसऱ्या स्थानी राहिले. मात्र, करुआना यांनी विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत ‘कॅन्डिडेट्स’मधील आपली जागा आधीच निश्चित केली होती. त्यामुळे ‘फिडे सर्किट’मध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेल्या गुकेशल यांनाही कॅन्डिडेट्स’मध्ये प्रवेश मिळाला. २०२४ मधील कॅन्डीडेट स्पर्धा ३ एप्रिल ते २१ एप्रिल या दरम्यान कॅनडा देशातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चेन्नईचे भूमिपुत्र डी गुकेश यांनी या स्पर्धेत झालेल्या १४ सामन्यात फक्त एका डावात पराभव स्वीकारत ९ गुणांची कमाई करत, विजेतेपद मिळवले आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आपली दावेदारी निश्चित केलीग्रँडमास्टर दि गुकेश यांच्या बाबत बोलायचे झाल्यास प्रतिस्पर्ध्याला विचार करावयास भाग पडेल अश्या चाली रचणे हे ग्रँडमास्टर डी गुकेश यांच्या खेळाचे वैशिष्ट डी , गुकेश पांढऱ्याकडून खेळताना सर्वाधिक वेळा रेती ओपनिंग या पद्धतीचा तर त्याचा खालोखाल क्वीन पॉन गेम या पद्धतीचा सर्वाधिक वापर केला असल्याचे त्यांचा गेम बघून लक्षात येते काळ्या बाजूचा विचार करता ग्रँडमास्टर दि गुकेश अनुक्रमे सिसीलीयन आणि क्वीन ग्यांबिट डिक्लाइन या पद्धतीचा वापर करताना दिसतात
दि गुकेश यांनी पांढरे मोहरे घेऊन खेळताना मिळवलेल्या यशाचा विचार करता त्यांनी सर्वाधिक वेळा वजीराच्या बाजूकडे असणाऱ्या उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून (सी ४ ) सर्वात जास्त डाव आपल्या खिश्यात घातले आहेतआता वळूया जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लढतीकडे या लढती २५ नोव्हेंबर २०२४ ते १२ डिसेंबर या दरम्यान सिंगापूर येथील सेंटोरा बेटावरील एक सप्त तारांकित बेटावर झाल्या पहिल्या लढतीत डी.गुकेश यांनी सुरवात पांढरे मोहरे घेवून केली.दोन्ही खेळाडुंनी सुरवात राजा समोरील आणि वजीरासमोरील प्यादे चालवून केली.सुरवातीला काहीसा संथ वाटणारा डाव पुढे रंगत गेला त्यामुळे २०१०नंतर पहिल्यांदाच, बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत पहिल्याच डावात कोणीतरी जिंकले.दुसऱ्या डावात डी.गुकेश यांची काळी मोहरी होती.पहिल्या फेरीत जिंकल्यामुळे डींग लिरेन यांचा आत्मविश्वास वाढला होता.मात्र त्याचा ताण न घेता काळ्या मोहरे घेवून खेळताना त्यांनी डिंग यांना बरोबरीत डाव सोडवण्यास भाग पडले. २३ चालीपर्यंत रंगलेल्या या सामन्यात एकाच खेळीची तीनदा पुनरावृत्ती झाल्याने डाव बरोबरीत सुटला या डावाची सुरवात दोन्ही खेळांडुंनी राजासमोरील प्यादे दोन घरे चालवून केली. तिसऱ्या लढतीत आश्चर्यकारकरित्या डिंग लिरेन वेळेत खेळी न करु न शकल्याने हारले. या स्पर्धेत सुरवातीच्या २तासात प्रत्येक खेळाडूला ४० खेळी करणे
बंधनकारक आहे.मात्र या डवात डिंग हे फक्त ३७ चालीच करू शकले.त्यावेळी सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेश यांच्याकडे १६मिनीटे शिल्लक होती.प्रतीस्पर्ध्याची वेळ संपल्याने समोरच्याला चेकमेट न करता डी.गुकेश जिंकले.डी गुकेश किंवा डिंग लिरेन ज्या स्तरावर बुद्धिबळ खेळतात तिथे या प्रकारे खेळाडू हरणे आश्चचर्यकारक समजले जाते. यावेळी गुकेश पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळत होते. तिन सामने झाल्यावर एक दिवसाचा विश्राम होता. एक दिवसाची विश्रांती घेवून झालेल्या या डावात डी गुकेश यांनी पांढरे मोहरे घेवून खेळताना राज्याचा बाजूकडील घोडा राजा शेजारील उंटाच्या उभ्या रेषेत आणून केली त्यास काळे मोहरे घेवून खेळताना डिंग यांनी वजीरासमोरील प्यादे दोन घरे चालवून उत्तर दिले. यावेळी ४२चाली झाल्या. डावाच्या अखेरीस दोन्ही खेळाडुंकडे एक हत्ती आणि ३प्यादी इतकेच सैन्य शिल्लक होते.अखेरीस दोन्ही खेळाडुंनी सहमतीने बरोबरी मान्य केली.पाचव्या फेरीचा सामना फ्रेंच डिफेन्स एक्सेज व्हेरीयशन पद्धतीने खेळवण्यात आला .४२ चालीपर्यंत रंगलेल्या या डावात दोघांनी डावाची सुरवात राजासमोरील प्यादे चालवून केली.पांढरे मोहरे घेवून खेळत असलेल्या सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेश यांनी प्यादे दोन घर तर डींग यांनी घर एक चालवले .डावाच्या अखेरीस डी. गुकेश यांच्याकडे काळ्या घरात फिरु शकणारा उंट आणि ५प्यादी तर डिंग लिरेन यांच्याकडे पांढऱ्या रंगात फिरु शकेल असा उंट आणि चार प्यादी होती.सहाव्या आणि सातव्या फेरीत अनुक्रमे डींग लिरेन आणि डी.गुकेश पांढऱ्या मोहऱ्या घेवून खेळले.दोन्ही डाव रंगतदार अवस्थेत पोहोचले होते मात्र दोन्ही डावात बरोबरी झाली. दोन्ही वेळेस पांढरी मोहरे घेवून खेळणाऱ्या खेळाडुंनी वजीरासमोरचे प्यादे दोन घरे चालवूनकेली. सहाव्या डी गुकेश यांनी तर सातव्या फेरीत डींग लिरेन यांनी काळे मोहरे घेवून खेळताना अनुक्रमे राजा समोरील प्यादे खणि राज्याचा बाजूकडील घोडे चालवून आपल्या खेळाची सुरवात केली. तर पांढरी मोहरी घेऊन खेळताना खेळाडुंनी वजीरासमोरील प्यादे आणि राजाच्या बाजूकडील घोडा उंटासमोर आणून केली आठव्या आणि नवव्या फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले.या दोन्ही सामन्यात कोणीतरी जिंकून आघाडी घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असताना दोन्ही डाव त्याच्या आधी खेळवण्यात आलेल्या अन्य डावप्रमाणे बरोबरीत सुटले. आठव्या फेरीत पांढरी मोहरे घेवून खेळताना डिंग लिरेन यांनी ही तर काळ्या मोहरे घेवून खेळताना डी.गुकेश यांनी अनुक्रमे वजीराच्या बाजूकडील उंटासमोरील प्यादे दोन घरे
चालवून आणि राजा समोरील प्यादे दोन घरे चालवून डावाची सुरवात केली.नवव्या डावात पांढरे मोहरे घेवून खेळताना सुपर ग्रँडमास्टर डी. गुकेश यांनी वजीरासमोरील प्यादे दोन घरे चालवून,तर डिंग लिरेन यांनी राज्याच्या बाजूकडील घोडा राज्याच्या शेजारील उंटासमोर आणून केली.नवव्या फेरीतील डव सुद्धा बरोबरीत सुटला दहाव्या फेरीत डिंग वीरेन यांनी पांढरे मोहरे घेऊन खेळताना वजिरासामोरील प्यादे चालवून खेळाची सुरवात केली त्याला डीगुकेश यांनी राजाच्या बाजूकडील घोडा उंटाच्या समोरील प्याद्याचासमोर आणून केली हाही डाव अनिर्णित राहिला अकरावा सामन्यात गुकेश याबानी पांढरी घेऊन खेळताना राज्याच्या बाजूकडील घोडा राज्याच्या शेजारील उंटाच्या समोरच्या प्याद्याच्या समोरच्या घरात आणून केली त्यास डिंग यांनी वजीर समोरील ओयदे दोन घर चालवून उत्तर दिले हा सामना दि गुकेश यांनी जिंकला या स्पर्धेत तिसऱ्या सामन्यानातनंतर पहिल्यादाच सामन्याचा निकाल लागला होता बाराव्या सामन्यात अकराव्या सामन्यात लागलेल्या निकालाचा काहीही परिणाम न होऊ देता शांतपणे खेळत डिंग यांनी हा सामना खिश्यात घातला. बाराव्या सामन्यात डिंग यांनी वजिराच्या बाजूकडील उंटासमोरील प्यादे दोन घरे चालवून केली त्यास गुकेश यांनी राज्यासमोरील प्यादे दोन घरे चालवून उत्तर दिले तेरावा सामना देखील अनिर्णयीत राहिला आणि अखेरच्या आपणस माहिती आहेच आहेच भारत तब्बल १० वर्षांनंतर विश्वेविजेता ठरला





Comments
Post a Comment