महाराष्ट्रात एकत्रीतपणे होणाऱ्या निवडणूक या एक देश एक निवडणूकीची सुरवात ?

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी निवडणूक सुधारणा म्हणून ज्या गोष्टीकडे बघितले जाते, ती गोष्ट म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन ही प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका बघता जवळपास  सर्वच जिल्हा परिषदा  पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका जर मुदतपूर्व झाल्या नाहीत, तर पुढल्या पाच वर्षांनीच एकत्रितच होतील. त्यामुळे हाच मुद्दा अन्य राज्यात राबवत नरेंद्र मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन या आपल्या या आपल्या सुधारणा कार्यक्रमाला अप्रत्यरित्या सुरुवात केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

प्रत्यक्षात पाहता, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेनुसार होत आहेत, असे म्हणता येणार नाही.

 सोशल मीडिया होणाऱ्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा हा दुर्लक्षीला जातोय, किंबहुना असा काही मुद्दा आहे, हेच अनेकांना माहिती नसाववे, असे त्यांच्या एकूण बोलण्यावरून वाटते. तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर केंद्रित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा मुद्दा वन नेशन वन इलेक्शन संकल्पनेत फार सविस्तरपणे सांगण्यात आलेला नाही.

महाराष्ट्रात सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत त्या प्रामुख्याने न्यायालयीन आदेश,  प्रशासकीय कारणे आणि संबंधित संस्थांचा कार्यकाळ पूर्ण होणे या घटकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे  भविष्यकाळात या निवडणुका एकत्रितपणे घेतल्या  जातीलच असे आत्ताच ठामपणे सांगणे थोडे धाडसाचे ठरेल.महाराष्ट्रातील सध्याच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या ‘एक देश, एक निवडणूक’ या तत्त्वावर आधारित नसून, त्या स्वतंत्र घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेनुसारच पार पडत आहेत.

 मात्र कायद्यात काही प्रमाणात बदल करत याही निवडणुका पण नेशन वन इलेक्शन चा कार्यकक्षेत आणता येऊ शकतात. वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे सर्व निवडणुका एकाच वेळी  झाल्यास निवडणूक खर्चात किती बचत होऊ शकते?  तसेच ईव्हीएम ची संख्या किती लागू शकते?  याचा अंदाज येण्यासाठी सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्त्वाचा अभ्यास मुद्दा म्हणून बघता येऊ शकतात.

महाराष्ट्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे तसेच 2011 ला प्रसिद्ध झालेल्या लोकसंख्येच्या आकड्यांचा विचार करता भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्य निवडणुका एकत्रित घेण्यामुळे नक्की काय  फायदा होतो तोटा होतो हे बघण्यासाठी आणि हा मुद्दा खरंच देशात लागू करता येऊ शकतो का? हे बघण्यासाठी या या निवडणुकीतील अमलबजावणीतील अभ्यासाद्वारे निघणारे निष्कर्ष महत्त्वाचे ठरू शकतात त्या दृष्टीने या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. 

हे लेखन वाचवणारे जर महानगरपालिका क्षेत्रात असतील तर त्यांनी निवडणुकीमध्ये मतदान करणे आवश्यक आहे जर तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये येत असाल तर तिथे मतदान करा तुम्ही मतदान केल्यामुळे सरकारला वन नेशन वन इलेक्शन हे खरंच व्यवहारी आहे का हे तपासण्यासाठी उपयुक्त डाटा होऊ शकतो मग करणाऱ ना मतदान


Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

८० तासाला एक

खगोलातील अढळ तारा निखळला