'विवेक भीमनवार' सर हे कराचं !

 


मा.
विवेक भीमनवार सर
स. न.वि. वि.
 सर सर्वप्रथम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.. !!.  आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला खऱ्या अर्थाने लोकसेवा या शब्दला सार्थ ठरवणारे  करावे यासाठी एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार म्हणून माझ्याकडून आपल्याला सदिच्छा !!

सर, गेल्या एक ते दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार अधिक उत्तम कार्यक्षम व्हावा यासाठी आपल्या आधीच्या अध्यक्षांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग आणि अन्य  लोकसेवा आयोगाचा अभ्यास दौरा केला होता. त्यांनी केलेल्या शिफारशी शक्य तेव्हढ्या लवकरात लवकर अंमलात येऊन अक्षरशः पोटाला चिमटा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू अधिकाऱ्यांचा कष्टाचा अंत व्हावा ही आमची माफक अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल असे म्हणायला हरकत नसावी. 

सर  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार वेगाने केंद्रीय  लोकसेवा आयोगाचा धर्तीवर होत आहे .मुख्य परीक्षेची पद्धत पूर्वीप्रमाणे दीर्घोत्तरी होत आहे. ही बाबा कौतुकास पात्रच आहे यात शंका नाही. मात्र आपल्या  मराठीतीतील एक ऊत्तम कवी असलेल्या  मंगेश पाडगावकर यांच्या ' देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे'  या सुप्रसिद्ध कवितेत सांगितल्याप्रमाणे अभ्यास  केंद्रीय लोकसेवा आयोगाचा धर्तीवर करताना त्यांच्या वेळापत्रकाचा देखील आदर्श घ्यावा असे मला वाटते . केंद्रीय लोकसेवा आयोग पुढील वर्षी

कोणत्या परीक्षा कधी घेणार आहे याचे वेळापत्रक आधीच्याच वर्षी जाहीर करतो. तुम्ही अगदी तसेच करा असे माझे आपणास म्हणायचे नाही. पण आपण परीक्षेचा रिझल्ट योग्य वेळेत लावा . विद्यापीठ अनुदान  आयोगाचा नियमानुसार आपल्या भारतातील प्रत्येक विद्यापीठाला त्यांनी घेतलेल्या कोणत्याही परीक्षेचा रिझल्ट हा ४५ दिवसात जाहीर करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पूर्व परीक्षेचा निकाल ४५ दिवस सोडा ९० दिवस झाले तरी लागत नाही.  सर  तुम्हला पटत का हे ? 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने वर्षभर चालणाऱ्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा बाबतीत याबाबत एक अक्षर देखील कधीही ऐकू येत नाही. जर काही कारणाने तुम्ही वेळेत रिझल्ट जाहीर करू शकत नसाल तर किमान या सारखी उपाययोजना अस्तित्वात आणण्याचे काही प्रयत्न तरी नक्कीच करा. 

सर तुम्ही पदभार स्वीकारत असतानाच लातूरला एका भावी अधिकाऱ्याने स्पर्धा परीक्षेच्या मार्फत पोस्ट मिळणे दूरच .परीक्षेचा रिझल्टचं जाहीर होत असल्याने आलेल्या वैफल्यातून आत्महत्या केली.या आधीही याच कारणामुळे अनेक भावी अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे , आज १८फेब्रुवारी २०२६ रोजी आपण पदभार स्वीकारत असताना झालेली ही  आत्महत्या अखेरची ठरावी अशी देखील आमची अपेक्षा आहे , 

आपल्या भारताच्या  राज्यघटनेत सुरवातीपासून राज्य लोकसेवा आयोगाचा उल्लेख आहे त्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या एका महत्वाच्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या  अध्यक्षपदाचा कारभार आपण हाती घेत

आहेत. त्यावेळी इतर राज्यतील लोकसेवा आयोगाचा कारभार सुद्धा मोठ्या प्रमाणात ढासळला आहे अश्या वेळी महाराष्ट्राने देशाला ज्याप्रमाणे वेळोवेळी आदर्श काय असतो याचा धडा घालून दिला. तसा तो याही वेळी आपल्या कारकिर्दीत मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करत सध्यापुरते  थांबतो 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करून सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची उभारणी करण्यात आपला वाट असावा यासाठी प्रयत्नशील एक उमेदवार 



Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

फक्त अनावश्यक सवलती आवरा !