सिंहावलोकन,२०२४ :भारत आणि जागतिक परिषदा
नविन वर्ष २०२५सुरु होण्यास आता अत्यंत मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना सरत्या वर्षात आपली काय कय मिळवले, काय काय गमावले याचा आढावा घेतल्यास नविन वर्षात या वर्षात केलेल्या चूका आपण टाळू शकतो जो न्याय वैयक्तिक स्तरावर लागू होतो तोच न्याय मोठ्या स्तरावर विचार केल्यास आपल्या भारत देशाला देखील लागू होतो.देशाचे जवाबदार नागरिक म्हणून आपणास या बाबी माहिती असणे आवश्यक आहे.चला तर जाणून घेवू भारताचा जागतिक परीषदांमधील सहभाग कोणत्या प्रकारचा राहिला.
या वर्षी भारत प्रामुख्याने वार्षिक भारत -रशिया समिट ,आशियान समिट, ब्रिक्स समिट शांघाय को ऑपरेशन समिट, क्वाड समिट ,इंडो आशियान समिट, इंडो जी.सी.सी समिट, यु.एन.जी.ए., कॉप २९ या प्रमुख परिषदांमध्ये सहभागी झाला.
या वर्षी जूलै महिन्यात २२वी भारत रशिया वार्षिक परीषद रशियाची राजधानी मास्कोला झाली.या परीषदेत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्यात विविध द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली.द्विपक्षीय मुद्यांमध्ये संरक्षण, व्यापार, सांस्कृतिक सबंध अजून दृढ करण्यासाठी काय करता येईल,या बाबींवर चर्च करण्यात आली.याच समिटमध्ये रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ सेट अँड्र्यू द अपोस्टल' मोदींना मोठ्या समारंभपर्वक प्रदान करण्यात आला.
याच जूलै महिन्यात आपले परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी क्वाड मिटींगसाठी जपानचा तर इंडो आशियान मिटींगसाठी व्हिएतनाम चा दौरा केला.क्वाड बैठकीमध्ये सदस्य देशांमध्ये असणारे सहकार्याचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात आला.पुर्वेकडील नाटो असी ओळख अषलेला क्वाड गट अमेरीकेचा पुढाकाराने चीनच्या इंडो पॅसिफिक क्षेत्रातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेला गट आहे,अमेरिकाखेरीज आपला भारत,आणि ऑस्ट्रेलिया,जपान हे सदस्य देश आहेत.
आशियान ही आग्नेय आशियातील ११ देशांची संघटना आहे.याच वर्षी पपुआ न्यु गिनी हा देश या संघटनेचा सदस्य झाला पपुआ न्यु गिनी हा देश सदस्य झाल्याने या संघटनेत सदस्य असलेल्या देशांची संख्या ११झाली.स्पर्धा परीक्षेत पपुआ न्युगिनीवर प्रश्न येवू शकतो तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.आशियान या संघटनेचा निरीक्षक देश म्हणून भारत ओळखला जातो. भारत या संघटनेचा पुर्ण सदस्य नाही .जूलै महिन्यात झालेल्या इंडो आशियान बैठकीत आशियान समुहाशी भारताचा व्यापार वाढण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली.
ब्रिक्स समिट ही ऑक्टोबर महिन्यात रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान या शहरात झाली.ब्रिक्स या संघटनेत या वर्षी अर्जेटिना हा देश येणार होता.त्यासाठी करावयाचा प्राशसनिक बाबी देखील पुर्ण झाल्या होत्या
मात्र दरम्यानचा काळात अर्जेटिनात सत्ताबदल झाला.नविन सरकारने आधीचा सरकारने घेतलेला ब्रिक्समध्ये समाविष्ठ होण्याचा निर्णय रद्द केला.ब्रिक्स या संघटनेचे भारत रशिया चीन ब्राझील हे संस्थापक देश आहे २०१०मध्ये त्यात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका देश समावेश झाला कालांतराने त्यात अनेक देश सामिल झाले.संघटनेचे नाव २०१०च्या वेळी सदस्य असलेल्या देशांच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून BRICS असे ठेवले आहे.ब्राझील,रशिया ,इंडीया चायना साउथ आफ्रिका या क्रमाने संघटनेचे अध्यक्षपद फिरते २०२५या वर्षी आपल्या भारताकडे अध्यक्षपद आहे तर २०२६ चे अध्यक्षपद चीनकडे आहे मागच्या २०२३ला इराण हा भारताचा मित्र देश या संघटनेत समाविष्ट झाला .पाकिस्तानला सुद्धा यात घ्यावे असे चीनचे म्हणणे आहे मात्र भारताच्या विरोधामुळे ते शक्य होत नाहीये
जगात प्रादेशिक विस्ताराचा (क्षेत्रफळाचा )विचार करता जगातील सर्वात मोठी आर्थिक संघटना असलेल्या एस.सी.ओ.या संक्षिप्तनावाने प्रसिद्ध असलेल्या शांघाय को ऑपरेशन या संघटनेचे वार्षिक अधिवेशन पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झाले.या अधिवेशनाला भारत उपस्थित राहणार का? हा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा होता त्यावेळी अखेर पाकिस्तानशी कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नाही फक्त परीषदेतील चर्चांमध्ये भारत उपस्थित राहिल या मुद्द्यांवर भारत उपस्थित राहिला सप्टेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे युनाटेड नेशन जनरल अस्बेंली चे अधिवेशन झाले.या वेळी तळागाळातील लोकांना विकासाचा समान संधी देण्याबाबत काय करता येईल?हा अधिवेशनाचा मुद्दा होता.पाकिस्तानने याही अधिवेशनात नेहमीप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. इराणचा आखाताचा किनारा ज्या देशांना लागून आहे अस्मा पश्चिम आशियातील देशांना आखाती देश म्हणतात.(संपुर्ण पश्चिमी आशियाला आखाती देश म्हणत नाहीत) या आखाती देशांनी व्यापारी हेतून स्थापन केलेली संघटना म्हणजे गल्फ कंट्री कोऑपरेशन होय.जी.सी.सी नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघटनेचे भारताशी संबंधित दुसरे अधिवेशन सौदी अरेबियाचे आर्थिक केंद्र जेद्दा येथे या वर्षी पार पडले.
एकंदरीत हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्तवाचे ठरले हेच नक्की
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र, विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *निवडणूका* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_17.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *सार्वजनिक वाहतूक* क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_91.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *भारताची खगोलशास्त्रातील प्रगती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_47.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *नैसर्गिक आपत्ती* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_26.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *क्रीडा* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_95.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील *आर्थिक घडामोडी* या क्षेत्रानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_11.html
मी सरत्या २०२४चा विविध क्षेत्र विषयानुसार आढावा घेत आहे.त्यातील भारताचे *आनंदाचे चिंतनाचे क्षण* या विषयानुसार घेतलेला आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_19.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताच्या जागतिक परीषदांमधील भुमिकांविषयी सांगणारा* हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_27.html
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभुमीवर *भारताचे शेजारील देश वगळता अन्य देशासी कसे राजनैतिक संबंध राहिले* हे सांगणारा हा लेख अवश्य वाचा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_84.html
नविन ग्रेनियर वर्ष सुरू होण्यास आता मोजकाच वेळ शिल्लक आहे. त्या अर्थाने आता हा वेळ सिंहावलोकनाचा आहे. चला तर मग जाणून घेऊया सरत्या वर्षात *भारत आणि भारताच्या शेजारील देश यांच्यातील राजनैतक संबंध* कसे होते.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_7.html
सरते ग्रेनियन वर्ष 2024संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.त्या पार्श्वभुमीवर *सरत्या वर्षात जागतिक स्तरावर काय घडामोडी घडल्या* ते जाणून घेण्यसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2024/12/blog-post_25.html
Comments
Post a Comment