सिंहावलोकन २०२३ भारतीय क्रीडाविश्व

 सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने  कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात  भारतीय क्रीडाविश्वातील घडामोडी बघूया
या वर्षी क्रीडा क्षेत्राचा करता ठळकपणे बोलायचे झाल्यास क्रिकेट खेळाची एकदिवसीय विश्वचषक पुरुष स्पर्धेचे भारतात झालेले आयोजन आणि चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक पदके मिळवण्याची घटना झालेली असली तरी भारतीय क्रीडाक्षेत्रात एव्हढ्याच घटना घडल्या असे समजणे चुकीचे ठरेल क्रिकेटशिवाय बुद्धिबळ या खेळात भारतीयांनी खूप अभिनंदनास्पद कामगिरी केली
वर्षाची सुरवातच बुद्धिबळ क्षेत्रांतून आलेल्या सुवार्तेने झाली २ जानेवारीस कौस्तुभ चटर्जी हे भारताचे ७८ वे ग्रँडमास्टर झाल्याची घोषणा बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणाऱ्या संघटनेकडून अर्थात फिडे कडून करण्यात आले हा मजकूर लिहण्यापर्यंत (१८ डिसेंबर ) भारतने या वर्षात ७ बुद्धिबळपटूंना ग्रँडमास्टर होताना बघितले . जगभरचा विचार करता बुद्धिबळाच्या इतिहासात पहिल्यांदा सख्खे बहू बहीण ग्रँडमास्टर होताना देखील या वर्षात भारताने बघितले ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि ग्रँडमास्टर आर वैशाली ते ते दोन बुद्धिबळपटू हे दोन्ही बुद्धिबळपटू तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करतात . याच वर्षी बुद्धिबळातील क्रमांक दोनची महत्वाची स्पर्धा म्हणता येईल अश्या कॅन्डीडेट स्पर्धेससाठी

ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर  आर प्रज्ञानंद हे पात्र ठरले भारताच्या क्रीडा इतिहासातील हि महत्त्वाची घटना आहे  ग्रँडमास्टर प्रज्ञानंद  यांनी फिडे वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवले आणि कँडिडेटसाठी आपले स्थान पक्के केले तसेच त्यांची मोठी बहीण आर वैशाली यांनी यादेखील महिला गटात महत्त्वाच्या स्पर्धा जिंकत कॅन्डीडेटसाठी आपली जागा निश्चित केली नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी फिडे ग्रँड स्वीस स्पर्धेत अभिनंदनास्पद कामगिरी करत कॅन्डीडेटसाठी आपले स्थान पक्के केले या खेरीज सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी २१ फेब्रुवारी रोजी पाचवेळा विश्वविजेता असणाऱ्या आणि वर्तमान स्थितीत सर्वाधिक फिडे गुणांकन असलेल्या मॅग्नस कार्लसन यास पराभवाचा धक्का दिला
      या खेरीज लेखाच्या सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे चीनमध्ये झालेल्याएशियन गेम मध्ये सर्वसाधारण प्रकारात खेळवला गेलेल्या स्पर्धेत १०७ पदके मिळवली तर दिव्यांगांच्या प्रकारात सर्वसाधारण खेळाडूंच्या पदकतालिकेपेक्षा १ सुवर्ण आणि १० कास्य पदक मुकलेत एकूण पदकतालिकेत सर्वसाधारण खेळाडूंपेक्षा ४ पदके जास्त मिळवली दिव्यांगांच्या स्पर्धेत भारताला २९ सुवर्ण ३१ रौप्य आणि तब्बल ५१ कांस्य
पदके मिळवली तर क्रिकेटच्या संदर्भात बोलायचे झाल्यास पुरुष एकदिवसीय विषेचषकात अंतिम सामन्यापर्यंत अपराजित राहून अखेरच्या अंतिम सामान्यतः भारताला ऑस्टेलिया कडून पराभव बघावा लागला या स्पर्धेत क्रिकेटचा खेळाडू असलेल्या विराट कोहली कडून एकदिवशीय क्रिकेटमध्ये पुरुष गटात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम झालाएकंदरीत हे वर्ष क्रीडाविश्वाचा विचार करता भारतासाठी लकी ठरले असेच म्हणावे लागेल

सार्क देश वगळून भारत आणि जग या विषयात सरत्या वर्षात काय घडले हे समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://ajinkyatartecurrentaffairs.blogspot.com/2023/12/3.html


Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?