Posts

Showing posts from October, 2026

एसटी महामंडळाचे उशिरा का होईना पण पडलेले अत्यंत कौतुकास्पद पाऊल

Image
सध्या आपल्या एसटी महामंडळाकडून निर्णयाच्या अक्षरश: धडाका लावण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्याच्या विचार करता एका आठवड्यात किमान चार निर्णय तरी एसटी महामंडळाने घेतलेले असतात. काही निर्णय हे कौतुक करण्यासारखे असतात तर काही निर्णय टीका करण्यासारखे असतात याच मालिकेत 29 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाने अत्यंत अत्यंत  कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. खरं तर हा निर्णय या आधीच घेणे आवश्यक होते मात्र शेवट गोड तर सर्वच गोड या मराठी म्हणी नुसार हा निर्णय उशिरा का पण घेतला याबद्दल महामंडळाचे करावे तेवढे कौतुक कमीच. या निर्णयामुळे उशीरा का होईना पण एक खूप खूप चांगला निर्णय घेतल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा जाहीर नागरी सत्कार करण्याबाबत यावा असे एक एसटी बस प्रेमी  म्हणून माझी इच्छा आहे. तर वाचक मित्र-मैत्रिणींनो तो निर्णय आहे मी ज्या पासचा फायदा घेत आपल्या महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली  हे चार जिल्हे सोडून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तसेच अहमदाबाद, पणजी, बेळगाव, इंदोर शहरात फिरलो आहे तो पास अर्थात 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा पास ऑ...