सिंहावलोकन २०२3 भारत आणि जग (सार्क देश वगळून )

        


   
 सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन 
कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता   ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारत आणि जग (सार्क देश वगळून ) बघूया

      या वर्षी  खलिस्तान या विषयावरून कॅनडा या देशाबरोबर अगदी तुटेपर्यंत ताणले गेलेले राजनैतिक संबंध भारताने यशस्वीपणे आयोजित केलेले जी २० या गटाचे आयोजन या बाबी प्रमुख असल्या तरी या खेरीज अन्य गोष्टींनी हे वर्ष गाजवले२०२३ च्या प्रजासत्ताक दिनाला २०२३ वर्षी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सीसी यांनी हजेरी लावली भारताच्या प्रजासत्ताक दिनाला हजेरी लावणारे ते पहिलेच अरब प्रदेशातील नेते होते .   जानेवारीला शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याचा विचार करता फिन्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्रीश्रीमती  नानया माहुता आणि एल स्लावाडोर च्या परराष्ट्र मंत्री अलेक्झांड्रा हिल टिनोको,यांनी भारताचे दौरे केले  ते १३ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील  एल साल्वाडोर या देशाच्या  परराष्ट्रमंत्री श्रीमती अलेक्झांड्रा हिल टिनोको या भारत भेटीवरआल्या होत्या तसेच  गयाना या देशाचे उपराष्ट्रपती  डॉभरत जगदेव २० ते २५  फेब्रुवारी या दरम्यान  भारताच्या दौऱ्यासाठी आले होते 

या वर्षे फेब्रुवारी महिन्यात आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस (सुब्रह्मण्यम ) जयशंकर या ओशियाना भागातील देशांच्या दौऱ्यावर गेले   ते १० फेब्रुवारी या दरम्यान  फिजीचे  उपपंतप्रधान प्राबिमन प्रसाद यांनी भारताला दिलेल्या पहिल्या उच्चस्तरीयभेटीनंतर ही भेट झाली या भेटीनंतर वर आपले परराष्ट्रमंत्री तेथूनच ऑस्टेलियाचा दौऱ्यावर गेले  चेक रिपब्लिकन या मध्य युरोपातील भूवेष्टित देशाचे परराष्ट्र मंत्री जॅन लिपावस्की २६ फेब्रुवारी-ते   मार्च  दरम्यान भारताला अधिकृत दौऱ्यावर आले होते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात  ऑस्टेलियाचे 

पंतप्रधान  अँथनी अल्बानीज चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवाड्यत २० आणि २१ मार्च रोजी जपानचे पंतप्रधान किसिंदा फुमिओ भारताचा दौऱ्यावर आले होते  २० मार्च रोजी सौदी अरेबिया देशाची राजधानी असलेल्या रियाध या शहरात झालेली पहिली भारत आणि गल्फ कॅट्री कोऑपरेशन या संघटनेदरम्यान झालेली पहिली सिनियर ऑफिसर मिटिंग झाली या बैठकीत  भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व CPV&OIA चे सचिव डॉऔसफ सईदकरत होते तर GCC शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे  GCC सहाय्यक महासचिव डॉअब्दुल अझीझ बिन हमाद अल ओवैशाक,करत   होतेया बैठकीत GCC च्या सर्व 6 सदस्य देशांचा सहभाग होतासदर बैठक  आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सप्टेंबर 2022 मध्ये रियाध भेटीदरम्यान भारत-GCC सल्लामसलत यंत्रणेवर स्वाक्षरी केलेल्या MOU च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती.

 गयाना ,  पनामा , कोलंबिया आणि डॉमिनिकन रिपब्लिक  या देशांना  आपले परराष्ट्र मंत्री डॉएसजयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून एप्रिलच्या शेवटच्या आटवड्यात भेट दिली गयाना दौरा भारतासाठी  कौन्सिल ऑन फॉरेन अँड कम्युनिटी रिलेशन्स (COFCOR);या  15 सदस्यीय कॅरिबियन देशातील (CARICOM))  परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीची आणि सहभागी असलेल्या द्विपक्षीय बैठकांसाठी देखील एक संधी म्हणून अत्यंत महत्वाचा  ता पनामा देशाच्या दौऱ्यात आपले परराष्ट्र मंत्री भेटीदरम्यानभारत SICA परराष्ट्र मंत्रीस्तरीय बैठक देखील आयोजित केली जाईल ज्यामध्ये ते 8 देशांच्या सेंट्रल अमेरिकन इंटिग्रेशन सिस्टम (SICA) च्या प्रतिनिधींना भेटलेकंबोडिया  देशाचे राष्ट्रप्रमुख अर्थात  विद्यमान  कंबोडियाचे राजे  नोरोडोम सिहामोनी यांनी 29 मे  ते  31 मे या  कालावधीत भारताचा दौरा केला भूतानचे राजेमहामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुकभूतानच्या शाही सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ते १० नोव्हेंबर या    या कालावधीत भारताच्या  दौऱ्यावर आले परराष्ट्रमंत्री डॉएसजयशंकर यांच्या निमंत्रणावरून  ,आयोगस्तरीय बैठकीसाठी  मलेशियाचे परराष्ट्रमंत्री , डॉ.झाम्बरी अब्दुल कादिर   आणि  नोव्हेंबर या दोन दिवशी रोजी भारताला भेट दिली

 १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत भारत आणि अमेरिका या दोन देशात  + बैठक झाली या चर्चेत भारतातर्फे सरंक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस एसजयशंकर यांनी तर अमेरिकेतर्फे त्यांचे डिफेन्स सेक्रटरी लॉयड ऑस्टिन आणि फॉरेन सेक्रटरी  अँटोनी ब्लिंकन,यांनी प्रतिनिधित्व केले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात  + बैठक झाली ज्यात भारतातर्फे भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि 

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले तर ऑस्ट्रेलिया तर्फे त्यांचे सरंक्षणमंत्री जे ऑस्टरलियाचे उपपंतप्रधान देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी प्रतिनिधित्व केले डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार  जोनाथन फिनर यांनी भारताचा दौरा केला. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केनियाच्या पंतप्रधान आणि ओमानच्या राज्याने भारताला भेट दिली.

एकदंरीत हे वर्ष भारतासाठी अत्यंत वादळी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही 

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?