शाहण्याच्या सायक्राटिस्टची चटका लावून जाणारी एक्झिट
"बाबुमोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह... उसे न आप बदल सकते हैं न मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बँधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं जानता।
मृत्यूचे वास्तव सांगणारा हा १९७१ साली प्रदर्शित 'आंनद ' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा डायलॉग. आपल्यापैकी प्रत्येकजणच कधीना कधी हे जग सोडून जाणारच आहे. मृत्यू येणार हे निश्चित आहे मात्र तो कधी येणार हे मात्र अनिश्चित आहे. हे दाखवून देतो. या अनिश्चितेचा फटका १५ मे रोजी सकाळी अनेकांना बसला. कारण होते अनेकांना मानसिक त्रासातून बाहेर काढत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यास शिकवणारे ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची कॅन्सरची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाल्याचे
मी त्यांचे आत्मचरित्र 'शहाण्यांच्या सायकॉस्टीक' हे वाचले आहे. जीवनातील कटू त्रासदायक अनुभवांना शांतपणे सामोरे कसे जायचे हे आपणास त्यातून समजते. आयुष्यातील अडचणीचा त्रासाचा बागुलबुवा ना उभा करता
किंबहुना समोरच्याला त्याबाबत शंका देखील येणार नाही असे वर्तन करत समोरच्याच्याच्या दुःखाच्या मानसिक आजाराच्या वेदनेच्या त्रासातून त्यास बाहेर कसे काढावे ज्यामुळे समोरच्याला देखील आपण अडचणीतून कसे बाहेर पडलो हे समजणार नाही याचे मृतिमंत उदाहरण म्हणजे डॉ आनंद नाडकर्णी होय असे आपण त्यांचे आतमचरित्र वाचून सहज म्हणू शकतो
डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे निमित्त ठरले हे कॅन्सरचे. मी लेखाच्या सुरुवातीला ज्या चित्रपटाचा उल्लेल्ख केला त्या आंनद मध्ये सुद्धा राजेश खन्नाला कॅन्सर झालेला असतो तो देखील आयुष्यातील कटू आठवणींना फक्त स्वतःपुरते ठेवत (आठवा चित्रपटातील रेकॉर्डच्या वेळच्या आणि अमिताभ बच्चन याच्या आनंद सुख तो तुम हमेशा बाटतो हो आज जर गम देखील बाट लो हा डायलॉग आणि स्मिता देव [ चित्रपटात डॉ कुलकर्णी यांची पत्नी ] आणि अमिताभ बच्चन यांचाआनंद का इस दुनिया मी कोई नाही हा डायलॉग ) लोकांना आनंद देत राहतो राजेश खन्ना यांनी रीळ लाईफ मध्ये उभा केलेला आनंद डॉ आनंद नाडकर्णी रियल लाईफ मध्ये जगले
डॉ आनंद नाडकर्णी यांनी अनेक उपक्रम सुरु केले.त्यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे "वेध ही व्याख्यानमाला. ठाणे शहरातून सुरु झालेला हा उपक्रम पुढे महाराष्ट्राच्या अन्य शहरात देखील विस्ताराला या उपक्रमाच्या नाशिक येथील कार्यक्रमाच्या नियोजनात मला सहभागी होण्याची संधी मला दोनदा मिळाली होती या वेळी त्याच्याशी ओझरतं बोलण्याचा प्रसंग आला. त्यावेळचा अनुभव खूपच मन प्रसन्न करणारा होता आज डॉ नाडकर्णी आपल्यात सदेह नसले तरी त्यांनी सुरु केलेल्याउपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या लेखनातून आणि युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून ते अजूनही आपणात आहेत कारण 'आनंद मरा नही आनंद मरते नही'



Comments
Post a Comment