महाराष्ट्राने गमवला एक अष्टपैलू हिरा

माझी २८ जानेवारीची सकाळ उजाडली ती एका धक्कादायक बातमीने. सकाळी ऑफिसाठी तयार होत बसस्टॉपवर बसची वाट बघत असताना,एका जवळच्या मित्राचा फोन आला. मित्राने त्याने  ऐकलेल्या एका बातमीचा खरेपणा समजून घेण्यासाठी फोन केला होता. बातमी होती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची.  फोन केल्यावर बातमी खरी आहे का, हे बघण्यासाठी न्युज चॅनल चे युट्यूब चॅनेल बघितल्यावर दुर्देवाने ती खरी असल्याचे समजले आणि  मी राष्ट्रवादीचा समर्थक नसलो तरी वाईट वाटले 
 स्व पक्षातील असो किंवा विरोधक सर्वच जणांशी त्यांच्या दांणगा जनसंपर्क होता.‌जनतेसाठी ते कायम उपलब्ध असायचे. त्यांचा दिवस भल्या पहाटे सुरु होयचा.सरकारी अधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामन्य जनता यांच्याशी भेटायला ते पहाटे सहापासून  सुरूवात करायचे.  
अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून कारकिर्द अत्यंत धाडसी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेली म्हणून ओळखली जाईल. विक्रमी पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवले‌‌. संघटनात्मक कौशल्य, जलद विकासकामे आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे दादा 'ॲक्शन-ओरिएंटेड' (कृतीशील) नेते म्हणून आपल्याला ते कायम लक्षात राहतील. ज्यांनी विविध विकास प्रकल्पांना गती दिली 
अजित पवार यांच्या कारकिर्दीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास, धाडसी व जलद निर्णय अजित पवार हे वैशिष्ट सांगवेच लागेल विशेषतः पायाभूत सुविधा आणि विकासकामांमध्ये ते कडक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध होते. आधी सांगितले त्या प्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे सध्या पाचव्यांदा या पदावर होते. 
प्रशासकीय पकड: त्यांच्याकडे विषयांची सखोल समज आणि प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावण्याची हातोटी मोठी होती.
बंडखोरी व राजकीय सक्रियता: २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आणि २०२३ मध्ये शरद पवारांविरुद्ध बंड करत ते भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले, ज्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संघर्षमय पण 'पॉवर सेंटर'च्या आसपास राहिली 
विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यानंतरही, त्यांनी सत्तेत परतत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली.
अजित पवार यांची अर्थमंत्री म्हणून कारकीर्द देखील शिस्तप्रिय, आक्रमक आणि विकासकामांवर भर देणारी राहिली. त्यांनी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी (२०१९-२०२२) आणि महायुती सरकार (२०२३ पासून) मध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक प्रशासनावर मजबूत पकड ठेवली.
प्रशासकीय कामात शिस्त, वेळेचे पालन आणि कामाचा निपटारा करण्यावर त्यांचा भर असायचा.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.आर्थिक तुटीचे व्यवस्थापन आणि महसूल वाढवण्यासाठी व्यावहारिक उपायांवर भर म्हणून देखील आपणास ते लक्षात राहतील.
२०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी विविध क्षेत्रांसाठी तरतुदी केल्या होत्या. एकंदरीत, अजित पवारांची कारकीर्द कडक प्रशासक आणि विकासकामांना चालना देणारा अर्थमंत्री म्हणून ओळखली जाईल.
विधानसभा सदस्य  म्हणून अजित दादांनी १९९१ इ.स. १९९५  आणि  १९९९  पासून मृत्यूपर्यंत बारामती विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले.
त्यांनी मंत्रीमंडळात देखील आपली छाप सोडली. राज्यमंत्री  म्हणून कृषी, फलोत्पादन आणि उर्जा, जलसंधारण, ऊर्जा व नियोजन म्हणून त्यांनी काम बघितले. तर कॅबिनेट मंत्री म्हणून पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे ही महामंडळे), फलोत्पादन, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता,  पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा (कृष्णा खोरे व कोंकण पाटबंधारे ही महामंडळे वगळून), ऊर्जा मंत्रालये येथे त्यांनी काम बघितले
उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री म्हणून त्यांनी कायम जनतेचा विश्वास मिळवला 
 आपले काका शरद पवार यांच्या यांच्या नेतृत्वात राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या अजित दादानी पुढे आपले स्वतःचे स्थान निर्माण केले.महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा इतका कर्तव्यकठोर, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते नेतृत्व असणारा राजकारणी सापडणार नाही. अजितदादा पवार हे राजकारणाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीची नाळ जपणारे व्यक्तिमत्त्व होते. मतभेद असू शकतात, पण मैत्री, संवाद आणि माणूस म्हणून माणसाशी वागण्याची त्यांची पद्धत नेहमीच चर्चेचा विषय होत असल्याचे मला न्युजपेपरच्या वाचनातून समजत असे.
 समोरचा नेता कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा विषय काय आहे, हे महत्त्वाचे मानणारी त्यांची भूमिका नेहमीच ठाम राहिली. हो ला हो आणि नाही ला नाही म्हणण्याचे धाडस असलेले नेतृत्व म्हणून ते सरस ठरत असल्याचे जेव्हापासून मी न्युजपेपर वाचतोय,तेव्हापासून लक्षात येते आहे.
फक्त स्वतःच्या पक्षापुरते मर्यादित न राहता, विरोधकांनाही आदर वाटावा असे व्यक्तिमत्त्व घडवणे हीच त्यांची खरी ओळख आहे. राजकारणाच्या गदारोळातही मैत्री, संवाद आणि माणुसकी जपणारे अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक वेगळे, लक्षात राहणारे व्यक्तिमत्त्व ठरतील.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.

या लेखासाठी माझे स्वत: चे ज्ञान, आणि लोकांच्या प्रतिक्रिया यांची एकत्रित मदत घेतली आहे.

Comments

Popular posts from this blog

एसटी महामंडळाची उलट गंगा!

८० तासाला एक

पुन्हा एकदा संतोष माने!