भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

 

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हशिण यांनी देश सोडला असून त्यांनी भारतमार्गे लंडनला प्रयाण केल्याचे आपणस एव्हाना माहिती झाले असेलचबंगलादेशमध्ये लष्कराच्या मदतीने काळजीवाहू सरकार स्थापन कऱण्यात आले असून पुढील सरकार सत्ता स्थापन करेपर्यंत हे काळजीवाहू सरकार सत्ता सांभाळेलअसे या संदर्भात विविध माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे . बांगलादेशमधील हा सत्ता बदल फक्त त्या देशासाठीच नव्हे तर आपल्या भारतासासाठी देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे 

भारतासाठीचे बदल आपण तीन प्रकारात विभाजित करू शकतोपहिल्या प्रकारात आपण ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यातईशान्य भारताचा उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढवण्यासंदर्भात सध्या  सुरु असणाऱ्या विविध उपाययोजना विचारत घेऊ शकतो . दुसऱ्या प्रकारात आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या व्यापार आणि अन्य तरतुदींचा विचार करू शकतो.तर तिसऱ्या प्रकारात बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा विचार करु शकतो‌

ईशान्य भारताचा विचार करता फक्त गेल्या दीड वर्षात देखील अनेक घडामोडी घडलेल्या दिसतात  मे २०२३ ला  बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हन्यू  ने  बांगलादेशची सुमारे ९० % आयात निर्यात होत असलेल्या चितगाव (बंगाली उच्चार चितोग्राम )  बंदराचा आणि बांगलादेश मधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे बंदर असलेल्या मोंगला बंदराचा भारताने कायमस्वरूपी वापर करण्याची  परवानगी दिली यामुळे ईशान्य भारतात भारताच्या अन्य भागातून काही सामान पाठवणे तसेच ईशान्य भारतातून भारताच्या अन्य प्रदेशात सामानांची पाठवणी करणे सोईस्कर झाले  बांगलादेशचा वापर  केल्यास पश्चिम बंगाल मधून त्रिपुरा मिझोराम आदी  राज्यात काही सामान पाठवायचे असल्यास सुमारे दीड हजार किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते हा मार्ग भारतीय सुरक्षेतीचा विचार करता संवेदनशील असलेल्या सिलिगुडी कॉरिडॉर मधून जातो याउलट बांगलादेशचा वापर केल्यास हे अंतर काही शे किलोमीटर इतके कमी होते  

 बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्यावर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1972 त्या वेळच्या दोन्ही सरकारने दोन्ही देशाच्या विशिष्ट बंदरावरून विशिषष्ट मार्गाने जलवाहतूक सूर करण्याविषयी प्राथमिक बोलणी झाली होती  मात्र त्यावर पुढे काही कार्यवाही झाली नाही सन 2010 बांगलादेशने त्यांचे चित्तगाव आणि मंगलो या  दोन बंदरासाठी   transit  agreement भारताबरोबर केले सन  2015 यासाठी MOU करण्यात आले यासाठीच करार 2018 केल्यावर काही बाबींची पूर्तता 2019 केल्यावर आता जुलै महिन्यात भारताकडून पहिल्यांदा यामार्गे ईशान्य भारतात माल पाठवण्यात आला 2020 च्या मे महिन्यात यामध्ये भारताकडून मूळ प्रस्तवात बदल करण्यात आला ज्यामुळे सध्या या मध्ये 10मार्ग आणि  11 बंदराचा समावेश करण्यात आला आहे . या पहिल्या मालवाहतुकीद्वारा  भारताच्या  कोलकाताच्या बंदरातून  बांगलादेशातील चित्तगाँव आणि मंगलो या बंदरात माल पाठवण्यात आला तिथून बांगलादेशातील अखूरा या शहरातून भारतातील आगारताला या शहारत तर तमाबाईल या बांगलादेश मधील गावामधून  भारतातील दावकी आणि सुतारमाला या भारतातील गावात शेईला या बांगलादेश मधील गावामधून आणि बांगलादेशमधील बिरबीरबझार या गावातून भारतातील श्रीमंतपूर या शहरात रेल्वे जलवाहतूक आणि रस्ते रस्ते मार्गे माल पोहोचवण्यात आला

आता बोलूया बांगलादेशच्या नद्यांतून होणाऱ्या मालवाहतुकीविषयी 

तर मे 2020 केलेल्या करारानुसार बांगलादेष्टील दौंडीकंडी या जिल्ह्यातून भारताच्या त्रिपुरा राज्यातील सोनमुरा या शहरापर्यंत गुमती या नदीमार्फत जलवाहतूक करता येणार आहे . तसेच ईशान्य भारताशी जलद संपर्क करता यावा म्हणून  हल्लिडाबरी (भारत ) ते छिल्लरी (बांगलादेश )शहाबाझार (भारत )  ते महिशासन (बांगलादेश ) आणि आगारतला  (भारत )ते अखुरा (बांगलादेश) या तीन रेल्वे लाईनचे काम सुरू होते ज्याला आता  ब्रेक लागणार आहे 

आता बोलूया दुसऱ्या मुद्यावर तर भारताचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा व्यापारी साथीदार बांगलादेश आहेपश्चिम बंगाल आणि अन्य सीमावर्ती भागातील अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणासाठी बांगलादेशात जात असतात.जागतिक राजकारणात अनेकदा  बांगलादेशकडून भारताचे समर्थन करणारी भूमिका घेतली जात होती .बांगला देशातील अनेक विकासकामात चीन स्वत:ची गुंतवणूक करण्यास मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. मात्र बांगलादेशातील सरकार भारत समर्थक असल्याने त्यास मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता. जो आता मोठ्या प्रमाणात कमी होईल.त्या खेरीज महिन्याभरापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारताच्या दौऱ्यावर आल्या असता दळणवळण,तंत्रज्ञान आणि व्यापार विषयक मोठाले करार करण्यात आले आहेत ज्यावर आता पूर्णतः पाणी फिरले आहे 

तिसऱ्या मुद्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशातील अल्पसंख्याक पुर्णत:संपला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही‌. बांगलादेशातील अल्पसंख्याक आधीच प्रचंड त्रास सहन करत होता‌.मात्र बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाला शेख हसिनांचा काहीतरी आधार होता‌.जो आता संपलाय‌.

बांगलादेशचे राजकारण पुर्णत: दोन महिलेच्या भोवती फिरते एक म्हणजे नुकत्याच बांगलादेशमधून पळून गेलेल्या आणि आता बांगलादेशच्या माजी पंतप्रधान झालेल्या शेख हसीना . तर दुसऱ्या म्हणजे बेगम खालिदा झिया . यातील शेख हसिना या भारत समर्थक समजल्या जातात.तर बेगम खालिदा झिया या पुर्णत:भारतविरोधी समजल्या जातात. आतापर्यत भारत आणि बांगलादेश यांच्यात मधूर संबंध होते कारण शेख हसिना सत्तेत होत्या‌. बेगम खालीदा ़झिया यांचा राजकारणाचा पायाच कट्टर भारतविरोध हा आहे‌. शेख हसिना यांनी बांगलादेश सोडल्याने बेगम खालीदा झिया यांना पुर्णत:मोकळे रान मिळाले आहे‌.विरोधात असताना. देखील बेगम खालीदा झिया यानी सातत्याने भारतविरोधी विधाने केली होती.ज्याला बांगलादेशात मोठा पाठिंबा देखील मिळाला होता. बांगलादेशमधील शेख हसिना सरकार भारत समर्थक असले तरी तेथील सर्वसामन्य जनमत खुप मोठ्या चिंताजनक टक्केवारीत भारतविरोधी असल्याचे या आधीच अनेकदा स्पष्ट झाले होते. आता शेख हसिना बाहेर गेल्यामूळे त्यांना मोकळे रानच मिळाले आहे‌

एकीकडे बांगलादेशात राजकीय संकट उभे ठाकले असताना बांगलादेशासारखाच भारताचा पुर्वेकडील शेजारी देश असलेल्या म्यानमारची स्थिती  worst आणि  worse यामध्ये  फिरत आहे worst मधून स्थिती  worseमध्ये आल्यास स्थिती सुधारली तर wors मधून स्थिती worst मध्ये गेल्यास स्थिती बिघडली असी म्हटल्यास वावगे ठरणार नाही असी तेथील स्थिती आहे‌‌.भारताच्या दक्षिणेकडील श्रीलंका आता कुठे स्वत:च्या आर्थिक पायावर उभा राहत आहे‌.तर पश्चिमेकडील पाकिस्तान अस्थिरतेच्या चक्रात अडकत आहे.आजमितीस भारताच्या डायरेक्ट शेजारी देशांचा विचार करता उत्तर दिशेकडे थोडीसी शांतता आहे.अन्य तीन बाजुकडील देशात मोठ्या प्रमाणात अस्थीरता आहे

जे भारतासाठी धोकादायक आहे‌

यासाठी माहिती गोळा करताना मला गावांची नावे इंग्रजीत मिळाली , त्याचे मराठीत लेखन करताना काही प्रमाणात मूळ उच्चारात बदल होऊ शकतो . मी यासाठी माहिती गोळा करण्यासाठी  द हिंदू आणि इंडीयन एक्सप्रेस या  वर्तमानपत्रांचा  आधार घेतला आहे )

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?