डॉ.माधवराव गाडगीळसर मला माफ करा
डॉक्टर माधराव गाडगीळ सर,
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ
यांशी सप्रेम नमस्कार, विनंती विशेष
सर, आम्हाला माफ करा. काही दिवसांपूर्वी आपल्या अंत्यविधीच्या दरम्यान पुणे शहरात आम्ही आपणाबाबत करंटेपणा दाखवला होताच. मात्र त्यातून शहाणे न होता आम्ही परत एकदा करंटेपणा दाखवत आपणाबाबत कृतघ्नपणा करत आहोत. त्याबद्दल आम्हाला माफ करा
सर, आपण आपल्या अभ्यासातून आणि पर्यावरणप्रेमातून आपण पश्चिम घाटाबाबत अत्यंत मार्गदर्शक सुचना केल्या.ज्यामध्ये सदर प्रदेशात कोणतेही विकासप्रकल्प नकोतच असी ठाम भुमिका घेतली. या प्रदेशात प्रकल्प उभारल्यास मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागेल अशी सूचना आपण त्यावेळेस केली होती.आपल्या पर्यावरण या क्षेत्रातील तज्ज्ञतेचा जगाने गौरव केलेला, असे असून देखील आम्ही तूमच्या सुचन्यांना वाटाण्याचा अक्षता लावल्या.युनाटेट नेशन्सने देखील तुमचा अभ्यासायला दूजोरा देत भारतातील दोन प्रदेशांना पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील घोषित केलेले आहे त्यातील एक आहे ईशान्य भारतातील वन्यक्षेत्र दुसरा आहे आपला पश्चिम घाट
सध्या महाराष्ट्रात वादाच्या केंद्रस्थानी असलेला टोरंट प्रकल्प हा याच पश्चिम घाट परिसरात आम्ही उभारत आहोत. पर्यावरणाचा विचार करता अत्यंत संवेदनशील असणाऱ्य या प्रदेशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत हा प्रकल्प साकार केला जातोय. जेवढी झाडे तोडली जाणार आहेत त्याच्या तिप्पट झाडे लावण्यात येणार आहेत असे याबाबत सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. मात्र जी झाडे आता तोंडण्यात येत आहेत ती पूर्ण वाढलेली आहेत. आत्ता लावण्यात आलेल्या झाडांची पूर्ण वाढ होण्यापर्यंत प्रचंड कालावधी निघून जाईल. तोपर्यंत या अति संवेदनशील प्रदेशाचे नुकसान मात्र नक्की. भीमाशंकर अभयारण्यापासून 20 किलोमीटर लांब हा प्रकल्प उभारण्यात येतोय असे देखील सरकारी पक्षांचे कथन आहे. मात्र डॉक्टर माधवराव गाडगीळ सर आपण जाणतातच राजकीय भूगोलाच्या मर्यादा या पर्यावरणीय भुगोलाला कधीच नसतात. राजकीय प्रदेश संपला म्हणजे त्या प्रदेशाची नैसर्गिक विविधता संपली असे कधीच म्हणता येत नाही, असे असून देखील तुमचा अभ्यासाला दुर्लक्षित करत आम्ही हा प्रकल्प उभारतोय म्हणून म्हणतोय आम्हाला माफ करा
विद्वानांचा सर्वत्र गौरव होतो या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित खूपच प्रसिद्ध आहे मात्र दुर्दैवाने आम्ही या सुभाषिताच्या अर्थाचा अनर्थ करत आमच्यातीलच एक असणाऱ्या आपल्या विद्वत्तेचा अपमान करत आम्ही पर्यावरणाची नुकसान करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करतोय. तुम्ही जो प्रदेश पर्यावरणासाठी संवेदनशील आहे असे सांगत त्या प्रदेशात विकास प्रकल्प नको अशा सांगत होतात तो प्रदेश सुद्धा आमचाच.
आज पासून तीन वर्षांपूर्वी अर्थात 2023 चा डिसेंबर महिन्याचा आसपास जागतिक हवामान परिषदेने बदलत्या हवामानात सर्वाधिक प्रभावित होणारा भाग म्हणून आपल्या भारताचा उल्लेख केलेला आपणास ज्ञात असेलच असे असून देखील आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील म्हणून जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात हा प्रकल्प उभारतोय. तसेच या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती करण्यासाठी आम्ही सौरऊर्जेची मदत घेतोय. एका प्रकारातून विद्युत निर्मिती करण्यासाठी दुसरा प्रकारातून निर्माण झालेल्या विजेची मदत घेण्याचा प्रकार जगात इतरत्र कोठेही नसेल. जलविद्युत निर्मितीसाठी जिथून आम्ही सौर ऊर्जा घेणार अहोत त्याच प्रकल्पाची क्षमता वाढवत जलविद्युत प्रकल्प रद्द करणे अधिक संयुक्तिक असताना आम्हीते टाळतोय. आम्ही याला ग्रीन एनर्जी असे संबोधत आहोत.
डॉक्टर माधराव गाडगीळ सर आपण पश्चिम घाट परिसरात ग्रीन प्रकल्प उभारण्यास अंशत: काही तत्त्वांचे काटकर पालन करत परवानगी दिली होती. मात्र यातील मार्गदर्शक तत्वांना सोयीस्कर बगल देत, ग्रीन प्रकल्पाला गाडगीळ समितीने मान्यता दिली होती असे सांगत प्रकल्प पुढे रेटण्यात येतोय त्याबद्दल आम्हाला माफ करा.सर आपण ज्या तत्वांद्वारे पश्चिम घाट परीसरात ग्रीन प्रकल्पांना मान्यता दिली होती त्यातील एक प्रमुख तत्व म्हणजे सदर प्रकल्पाला स्थानिक ग्राम सभेची मान्यता असणे याला शंभर टक्के महत्त्व देत केंद्र आणि राज्य सरकारकडून सदर प्रदेशात प्रकल्प लादणे याला आपण पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा अशी सूचना केली होती. ज्याला उघड उघड शंभर टक्के हरताळ फासत सदर प्रकल्प होतोय. आपण सदर ठिकाणी मोठी धरणे नकोत अशी देखील सूचना केली होती आता मोठी धरणे म्हणजे नक्की किती मोठी हा मुद्दा थोडा वादात येत असल्याने आणि प्रत्येकाची त्याविषयीची मते वेगळी असल्याने,मी त्यावर भाष्य करणार नाही. मात्र ग्रामसभेचा विरोध हा मुद्दा मात्र अत्यंत विचार करण्यासारखा आहे त्याला सदर प्रकल्पात काडीचीही किंमत देण्यात न आल्याने आम्हाला माफ करा.



Comments
Post a Comment