ढिसाळ नियोजनाचा परिणाम
शनिवार 24 ऑक्टोबर रोजी वर्तमानपत्रात एक बातमी झळकली, आणि हजारो एसटीबसप्रेमींच्या मनाची कालवाकालव झाली
बातमी होती एसटी महामंडळाला गेल्या महिन्यात दिवसाला पाच कोटी तोटा होत असल्याची. बातमीत सांगण्यात आले होते की महिलांना एन एम सी सी कार्ड सक्तीचे केल्यामुळे महिलांची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे परिणामी एसटी महामंडळाला दिवसाला पाच कोटी तोटा होत आहे.
मी एसटी महामंडळातल्या बसचा नियमित प्रवासी आहे. एसटी महामंडळाच्या आवडीचे प्रवास या योजनेचा फायदा घेत आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यांचा अपवाद वगळता आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात तसेच राज्या बाहेर सुरत आमदाबाद वापी इंदोर पणजी बेंगळुरु, बेळगाव आदी ठिकाणी फिरलो आहे. महामंडळाच्या प्रवाशांचे जे सोशल मीडियावर विविध ग्रुप असतात त्याच्या देखील मी सदस्य आहे. या ग्रुप द्वारे मी जरी एसटी महामंडळाच्या कर्मचारी नसलो तरी एसटी बसेस विषयीच्या सर्व बातम्या घडामोडी मला समजतात. महामंडळाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मी नियमित पणे फॉलो करतो तसेच महामंडळाविषयी येणाऱ्या सर्व बातम्या मी काळजीपूर्वक वाचतो आणि ऐकत असतो. त्या सर्वानुसार सांगतो आहे महामंडळास तोटा होण्याचे मुख्य कारण म्हणजे एन एम सी कार्डची सक्ती नाही तर एन एम सी सी कार्डच्या नियोजनातील ढिसाळपणाच कारणीभूत आहे.
सुमारे सहा महिन्यापूर्वी या कार्डची सुरुवात झाली त्यावेळेस मला आठवतेय नाशिकच्या पंचवटीच्या डेपोच्या हवाल्याने लोकमतमध्ये मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती की एन एम सी कार्ड काढायला सहा महिने वेळ आहे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. त्यावेळेस न केली गर्दी आता होती आहे आणि ही गर्दी मात्र प्रशासनाला आवरणे अत्यंत कठीण गेले. त्याचवेळी व्यवस्थित नियोजन करून या गरजेचे नियमन केले गेले असते तर सहा महिन्यात जवळपास सर्वच जनतेला एन एम सी कार्ड मिळाले असते. मात्र त्यावेळी सहा महिने वेळ आहे नागरिकांनी गर्दी करू नये असे सांगितले. मी पंचवटी डेपोचे उदाहरण एक प्राथमिक स्वरूपात दिले आहे पण महाराष्ट्राचा सर्वच डेपोत कमी अधिक प्रमाणात ही स्थिती असल्याची दाट शक्यता आहे.
जशी जशी सक्ती करण्याची मुदत जवळ येत गेली तशी काढण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.एकाच वेळी असंख्य नागरिकांनी कार्ड साठी गर्दी केल्याने कार्डचा तुटवडा होणे हे स्वभाविकच आणि ते झाले पण देखील. कार्ड कसे वापरावे कसे रिचार्ज करावे याविषयीचे व्हिडिओ देखील महामंडळाच्या सोशल मीडियावर बऱ्याच उशिरा आले ते खूप आधीपासून येणे आणि सातत्याने येणे आवश्यक होते. याबाबत वर्तमानपत्रात देखील माहिती देण्यात येणे आवश्यक होते मात्र याबाबत देखील काही प्रमाणात अनास्था महामंडळाकडून दाखवण्यात आली असे मी जेवढे वर्तमानपत्रे वाचली आहेत तेवढे वाचून मला वाटते.
आपल्या राज्यात महिलांची संख्या जवळपास 50% आहे म्हणजेच निम्म्या जनतेवर थेट परिणाम करणारा हा घटक होता. आज महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजीत ही 15 कोटी सांगितले जाते म्हणजेच सुमारे साडेसात कोटी जनतेवर थेट प्रणाम करणारी ही योजना होती अर्थात या साडेसात कोटी पैकी सर्वच महिला या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत नाहीत हे मान्य केले तरी किमान पाच कोटी जनता यातून नक्कीच प्रवास करणार होती आता पाच कोटी ही खूपच मोठे संख्या आहेत युरोपातील अनेक देशांची लोकसंख्या पाच कोटी असते तसेच आपल्याकडे
नोकरदार महिलांचा अपवाद करता फार मोठ्या प्रमाणात महिलावर्ग अशा आहे की जो जेमतेम व्यवहार करू शकतो त्याला हे कार्ड वापरणे थोडेसे दडपण वाटले सह शक्य आहे त्यासाठी प्रशिक्षण वर्गाची थोडीशी गरज होती. ते देखील आयोजित केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर दिसल्या नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराबाबत जो उत्साह दिसला त्याच्या एक टक्का सुद्धा उत्साह या कार्यक्रमात नव्हता. मला आठवतंय मी जेव्हा रेल्वेचे प्रवासी तिकीट करण्यासाठी कार्ड वापरायचो त्यावेळेस मला सुद्धा अनेकदा अडचणींना सामोरे जवे लागले होते. कार योग्य ठिकाणी न ठेवल्यामुळे रीड न होणे अथवा मशीन वर तिकीट कसे काढायचे याबाबत जरासे गोंधळणे याचा अनुभव मी देखील घेतला आहे पिंडी ते ब्रम्हांडी या म्हणीनुसार मी सांगू शकतो की कोणतीही नवीन गोष्ट वापरताना गोंधळ होणे सहजशक्य आहे त्यासाठी प्रशिक्षण आवश्यकच असते मात्र इथे तिथेच त्याची बोंब होती. नाही म्हणायला काही वाहकांचे प्रस्थान झाले मात्र हे कार्ड व्यवस्थित रीड होण्यासाठी योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक होते हे कार्ड कसे ठेवावे हे कार्ड तेल अथवा त्यासारख्या पदार्थांपासून कसे वाचवावे किंवा कार्ड तुटले, मुडपले तर काही अडचण येऊ शकतात का याबाबत जनजागृती करणे आवश्यक होते मी याबाबत ज्या बातम्या वाचल्या त्यामध्ये याविषयी कुठेही उल्लेख नव्हता. लोकांना कार्ड दिले तरी ते कसे हाताळवे हे माहिती नसल्याने सुरुवातीला किंवा आत्तासुद्धा अनेक अडचणी येत आहेत.
खाजगी लोकांना काम देताना त्यांना कमिशन किती मिळेल याबाबत पुरेशी सुसूत्र नसल्याने, एसटी महामंडळाच्या ऑफिसमधून आणि खाजगी नंतर कडून कार्ड रिचार्ज केल्यावर मिळणाऱ्या टॉप-अप मध्ये फरक होता हा फरक बराच मोठा असल्याने नागरिकांनी अधिक फायदा मिळण्यासाठी एसटी महामंडळाच्या ऑफिसवर गर्दी केली त्यामुळे देखील गोंधळ बराच वाढला.
तसेच वाहकांनी देखील कार्डद्वारे तिकीट न निघाल्यावर पूर्ण टिकीट घेणे अथवा प्रवासात मध्ये उतरवून देणे असे प्रकार केल्याने या कार्ड ते अनास्थाच लोकांच्या मनात निर्माण झाली. माझ्या मते ज्या पद्धतीने वाहकाकडे सुटे पैसे नसल्यास किंवा एखादी बस बंद पडल्याने दुसऱ्या बस मध्ये प्रवाशांना स्थलांतरित केल्यावर ज्या पद्धतीने त्याची नोंद तिकिटावर करण्यात येते आणि त्यानंतर प्रवासी तिकिटातील शिल्लक रक्कम उतरल्यावर घेतो आणि अन्य बस मार्गे प्रवास करतो त्या पद्धतीचे काहीतरी कार्यवाही करणे आवश्यक होते ही कारवाई न केल्यामुळे प्रवासी वर्ग बऱ्याच प्रमाणात नाराज झाला
कार्डची सक्ती करताना, त्या संभाव्य अडचणीच्या पुरेसा प्रमाणात प्राथमिक गृहपाठ करणे आवश्यक होते मात्र त्याबाबत मोठ्या प्रमाणात अनास्था दिसून आली ज्यामुळे कार्डचे अंमलबजावणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले या अडचणींमुळे नको ते कार्ड थोडे महाग पडले तरी चालेल परंतु खासगी बस वाहतुकीत जाऊ असा प्रवाशांच्या कल झाला आणि त्याचा फटका आता महामंडळ बसतोय.
Comments
Post a Comment