मंगरूळचे हस्तांतरण आणि मराठवाडा
महाराष्ट्रातहोणारे एमपीएससी आंदोलन आणि देशाचा विचार करता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या सर्व गदारोळत आपल्या भारतीय रेल्वेच्या नकाशात बदल झाला त्याविषयी आपल्या मराठी माध्यमांमध्ये काहीच बोलले गेले नाही.. आता मी जे सांगणार आहे तो कदाचित अनेकांना स्थानिक मुद्दा वाटेल आणि तो स्थानिक मुद्दा असल्यामुळे आपल्या मराठी माध्यमांमध्ये त्याच्याविषयी आलेले नाही असे काहींना वाटेल मात्र तसे नाही तो स्थानिक मुद्दा असला तरी त्याच्या आपल्या मराठवाड्याचाही सुद्धा संबंध आहे.
तर माझ्या वाचक मित्र मैत्रिणींनो भारतीय रेल्वेच्या प्रशासनाचा विचार करता दक्षिण रेल्वे विभागात असणाऱ्या मंगरूळ रेल्वे स्टेशन आणि परिसराचा समावेश आता दक्षिण पश्चिम रेल्वेत करण्यात आलेला आहे. गेल्या एक ऑक्टोबर पासून याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. केरळ राज्यातील पालक्काड शहर दक्षिण रेल्वे चे एक डिव्हिजनल मुख्यालय आहे या मुख्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशात मंगरूळ रेल्वे स्टेशन होते. मात्र स्थानिकांची सातत्याने मागणी आणि प्रशासनावरच्या दबाव बघत त्याचा समावेश राज्यस्तरावरचा विचार करता कर्नाटक राज्यात असणाऱ्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर या डिव्हिजन मध्ये करण्यात आलेला आहे. यासाठी मुख्यालयापासूनचे अंतर आणि केरळ राज्यापेक्षा महसूल विभाग कडे असणारा प्रवाशांच्या ओघ याचे कारण दिले आहे. या हस्तातरणाविषयी चॅट डीपी टी द्वारे माहिती घेतली असता,मंगळूरू हे पालक्काड विभागाच्या मुख्यालयापासून ३५० किमीपेक्षा अधिक अंतरावर आहे. त्याउलट मंगळूरूची महत्त्वाची रेल्वे जोडणी—मंगळूरू–हासन–म्हैसूर–बंगळुरू मार्ग—दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षेत्राशी आधीपासूनच संबंधित आहे. त्यामुळे मंगळूरूला म्हैसूर विभागाशी जोडल्यास प्रशासकीय समन्वय, परिचालन नियोजन आणि देखभाल व्यवस्था अधिक सुलभ होईल, असा रेल्वेचा युक्तिवाद आहे. असी माहिती मिळाली. यामध्ये सांगण्यात आलेल्या नसला तरी याला कन्नड आणि मल्याळम अस्मितेचा मुद्दा आहेच हे तर उघडे आहे. .
तर ही झाली या हस्तांतराची माहिती. आता आपण जाऊया मराठवाड्यात. मराठवाडा हा दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजन मध्ये येतो. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजनचा समावेश मध्य रेल्वे करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येते आहे. मात्र याविषयी काही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीये. दक्षिण मध्य रेल्वेचे तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे मुख्यालय आहे. तेलंगणा राज्याची भाषा ही तेलगू आहे. मराठवाड्यातील प्रमुख भाषा मराठी आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे तेलगू अधिकारी मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नावर काहीच ठोस उपाययोजना करताना दिसत नाही असे सातत्याने म्हणते जाते आणि आपणमराठवाड्यात फिरलो असता ते आपल्याच अनुभव देखील येते.. मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजी नगर ते मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) यातील अंतर सध्याच्या रेल्वे मार्गानुसार सुमारे ३७३ किमी आहे. छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद डेक्कनचे रेल्वे अंतर सुमारे ५०८ किमी आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादचे रेल्वे अंतर मुंबईपेक्षा साधारण १३५ किमीने अधिक आहे.वरील माहितीहे समजते विचार घेतली असता मंगरूळचे हस्तांतरण करण्यासाठी जो किलोमीटरच्या मुद्दा उपस्थित करण्यात आला त्याचा विचार करता छत्रपती संभाजीनगर पासून मुंबई जास्त जवळ आहे हे चटकन समजते तसेच छत्रपती संभाजीनगर परिसराचा विकास करण्यासाठी त्याला हैदराबाद पेक्षा मुंबईला जास्त कनेक्टिव्हिटी देणे अधिक आवश्यक आहे. हेही या आधी अनेकदा लक्षात आले आहे भाषिक मुद्दा काही काम बाजूला ठेवूया. मात्र संभाजीनगर परिसरात रल्वेच्या विकास करण्यासाठी प्रशासकीय समन्वय, परिचालन नियोजन आणि देखभाल व्यवस्था या मुद्द्यांचा विचार करता दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड डिव्हिजन हा मध्य रेल्वे किती आवश्यक आहे हे लक्षात येते.
काहीजण मराठवाडा हा हैदराबाद निजामाच्या राज्यातील भाग असल्याचे आणि त्यामुळे त्याची हैदराबादशी अधिक जवळीक असल्याचे सांगतील. . हा ऐतिहासिक मुद्दा महत्त्वाचा आहेच मात्र मराठवाड्याचा विकास करायचा झाल्यास त्यातही रेल्वेचा विकास करायचा झाल्यास मराठवाड्यातील रेल्वे ही मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणे आवश्यकच आहे हा मुद्दा सुद्धा नाकारता येणे असंभव. नांदेड डिव्हिजनचे मुख्यालय असणारे नांदेड हे किलोमीटरचा विचार करता मुंबईपेक्षा हैदराबादला जवळ आहे त्यामुळे मराठवाडा दक्षिण मध्य रेल्वेतच असावा असाही मुद्दा समोर शकतो त्यांना माझा सांगणे आहे. आता रेल्वेच्या कारभार अत्यंत वेगवान होत आहे त्यामुळे किलोमीटरचा मुद्दा महत्त्वाचा असला तरी त्यास अधिक महत्त्व न देता लोकभावनाला महत्व देत जे मंगरूळचा हस्तांतरणाबाबत झाले. त्याच पद्धतीने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजन हा मध्य रेल्वेला जोडण्यात यावा जर पूर्ण विभाग जोडण्यात अडचण असेल तर किलोमीटर चा विचार करत नांदेड मधील संभाजीनगर आणि जालना जिल्हा तरी मध्य रेल्वेला जोडण्यात यावेच. कारण हे दोन जिल्हे किलोमीटरचा जो मुद्दा रेल्वेने मंगरूळाच्या हस्तांतरणाबाबबत अधिकृतपणे दिला आहे त्याच्या विचार करता हैद्राबाद पेक्षा मुंबईच्या अधिक जवळ आहेत.
मात्र मराठवाड्यातील प्रश्न अनेकदा मार्गी गतच नाही हा इतिहास आहे त्यामुळे आत्तासुद्धा मंगरूळच्या हस्तांतरांवरून धडा घेत नांदेड डिव्हिजन मध्ये रेल्वेला जोडण्याबाबत फारच कमी हालचाली होतील असा माझा अंदाज आहे. माझा अंदाज खोटा ठरवा आणि मराठवाड्यातील नांदेड डिव्हिजन पूर्णतः किंवा काही प्रमाणात का होईना तरी मध्य रेल्वेला जोडण्यात येऊन माझ अंदाज खोटा ठरवा ही सदिच्छा ही व्यक्त करत मी आपली रजा घेतो.



Comments
Post a Comment