एसटी महामंडळाचे उशिरा का होईना पण पडलेले अत्यंत कौतुकास्पद पाऊल

सध्या आपल्या एसटी महामंडळाकडून निर्णयाच्या अक्षरश: धडाका लावण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्याच्या विचार करता एका आठवड्यात किमान चार निर्णय तरी एसटी महामंडळाने घेतलेले असतात. काही निर्णय हे कौतुक करण्यासारखे असतात तर काही निर्णय टीका करण्यासारखे असतात याच मालिकेत 29 सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाने अत्यंत अत्यंत  कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. खरं तर हा निर्णय या आधीच घेणे आवश्यक होते मात्र शेवट गोड तर सर्वच गोड या मराठी म्हणी नुसार हा निर्णय उशिरा का पण घेतला याबद्दल महामंडळाचे करावे तेवढे कौतुक कमीच. या निर्णयामुळे उशीरा का होईना पण एक खूप खूप चांगला निर्णय घेतल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा जाहीर नागरी सत्कार करण्याबाबत यावा असे एक एसटी बस प्रेमी म्हणून माझी इच्छा आहे.
तर वाचक मित्र-मैत्रिणींनो तो निर्णय आहे मी ज्या पासचा फायदा घेत आपल्या महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली  हे चार जिल्हे सोडून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका तसेच अहमदाबाद, पणजी, बेळगाव, इंदोर शहरात फिरलो आहे तो पास अर्थात 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा पास ऑनलाईन पद्धतीने  काढता येण्याची सोय करण्याचा.
या पासचा फायदा घेण्यासाठी मी जेव्हा जेव्हा याआधी डेपोत जात असे त्यावेळेस अनेक अडचणींना मला समोर जावे लागेल जसे पासच उपलब्ध नाही किंवा पासवर जुनीच रक्कम छापलेली आहे, त्यामुळे तो पास अवैध आहे असे ऐकणे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नाशिकच्या एका बस स्टँडवरून दुसऱ्या बस स्टँडवर पायपीट करणे.तसेच पास काढण्यासाठी ऑफलाइन पैसे देताना सुट्टे पैसे नसणे. सदर कागदी पास खराब न होण्यासाठी काळजी घेणे यासारख्या अनेक अडचणींना ऑनलाईन पास मिळण्याची सोय उपलब्ध झाल्याने आता मोठ्या प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे.
 आवडेल तिथे प्रवास या योजनेचा ऑनलाइन पद्धतीने काढता येणार असल्याचे जाहीर करताना या योजनेचा पास आता पीडीएफ स्वरूपात सुद्धा मिळणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. पीडीएफ स्वरूपात पास मिळत असल्याने पास हरवला किंवा पास खराब झाला या त्रासातून आता प्रवाशांची सुटका होईल.आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देणारी योजना म्हणून आपण आवडेल तिथे प्रवास या योजनेकडे बघू शकतो. या योजनेचा पास आता ऑनलाईन उपलब्ध झाल्याने ही योजना तर अधिक व्यापक स्तरावर राबवता येणे शक्य होईल त्यामुळे आत्तापर्यंत पर्यटनाच्या बाबत दुर्लक्षीत राहिलेल्या अनेक स्थळांना नागरिक भेट देऊ शकतील. ज्यामुळे या पर्यटन स्थळांची माहिती देणे तसेच तिथे नागरिकांना मदत होईल या पद्धतीच्या सोयी उभारणे या सारख्या माध्यमातून  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होईल. तुम्ही कोणत्याही बस स्टॅन्ड वर एक अर्धा तास सहज भेट द्या. विविध प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची  एक अजब दुनिया तुम्हाला अनुभवता येईल. या विक्रेत्यांचा प्रमुख ग्राहक हा आवडेल तिथे प्रवास यासारख्या योजनेच्या फायदा घेत प्रवास करणारा प्रवासी असतो हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. आता योजनेचा ऑनलाइन पद्धतीने मिळणार असल्याने  अधिकाधिक लोक आवडेल ते प्रवास या योजनेचा फायदा घेत फिरायला निघतील त्यामुळे मी आधीच सांगितल तसे एसटी महामंडळाच्या बस स्टँडवर विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांच्या मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्यामुळे या योजनेचे कौतुक तुम्ही महायुतीचे मतदार असाल अथवा नसाल तुम्हाला करावेच लागेल हे मात्र नक्की

Comments

Popular posts from this blog

विनाशकाले...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

लालपरी एसटी महामंडळ विकणे आहे!