आरामदायी नव्हे,पुरेशी सोय द्या !

उच्चभ्रू श्रीमंत वर्गाला आकर्षित करण्याचा हेतूने एसटी महामंडळामध्ये 
व्होल्वो बसेस समाविष्ट करण्याची घोषणा नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर नुकतीच करण्यात आली, आणि सर्वसामान्य एसटी बस प्रेमींच्या मनात एकच भावना दाटून आली. ती म्हणजे '
आरामदायी नव्हे,पुरेशी सोय द्या !' मी एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे सोडून आपली एसटी जाते अश्या सर्व तालुक्यांमध्ये फिरलेलो आहे त्यां अनुभवावर  सांगतोय आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणीला अनुसरून एसटी महामंडळाचा कारभार सुरू आहे एसटी महामंडळाचे दुखणे काय आहे आणि त्याचा काय उपचार करणे आवश्यक आहे याचा सोयीस्कर विचार पडलेला दिसतोय एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना असेच त्यांचे निर्णय बघून वाटते.

आज महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फेरफटका मारल्यास अत्यंत खराब बसेस चालवल्या जात असल्याचे आपल्या सहज लक्षात येते. तसेच त्यांची संख्या सुद्धा अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागातील एसटी ही सुधारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र असे न करता आरामदायी प्रवासाच्या नावाखाली महागड्या बसेस समाविष्ट करण्याचे काम सध्या आपल्या एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही दिवसापूर्वी एसटी महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत करण्यात आलेली पोस्ट हेच दाखवते. नाशिक जिल्ह्याच्याच विचार करू आपण. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा दिंडोरी या तालुका मुख्यालयीच डेपो नायीये. अन्य तालुक्यातील डेपोंद्वारेच तालुक्यातील बस सेवा चालवण्यात येते त्यामुळे या तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुरी बस सेवा आहे या तालुक्या मुख्यालय डेपो आल्यास तालुक्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये उत्तम बस सेवा देता येऊ शकते ज्यांना मुळात बससेवेची गरज आहे तेच नागरिक डेपो नसल्याने बस सेवेपसून दूर जात आहेत.
.
मुळात आजकाल किती उच्चभ्रू आणि श्रीमंत वर्ग एस टी महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करतो  एसटी महामंडळाच्या जागेतील स्वच्छतेचा बाबत या अभिजात वर्गाची मते काय असतात याची एसटी महामंडळास कल्पना आहे का? हाच एक मुळात एक प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे ही नकारात्मक आहेत. मग हा घाट कशासाठी घातला जातोय.? तसेच या बसेसचे भाडे खासगी बस वाहतूकदारांच्या समकक्ष  बसेसचा विचार करता अत्यंत जास्त असते त्यामुळे हिला मुळातच कमी प्रवासी मिळतात. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील बसेसची संख्या कमी करून या बसेस मध्ये प्रवासी कोंबले जातात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासीवर्ग जो एसटीचा खरा  प्रवासी आहे तो कमी भाडे आहे म्हणून खासगी बस वाहतूकदारांकडे जातो. त्यामुळे या आरामदायी बसेस फक्त न फक्त पांढरा
 हत्ती ठरतात. तसेच या बसेस 
एंड टू एंड या पद्धतीने चालवल्या जातात म्हणजे समजा नाशिक पुणे या मार्गावर या बसेस चालविण्यात येत असतील तर नाशिक मधील मेळा बस स्टॅन्ड, द्वारका बस स्टॉप आणि नाशिक रोड बस स्टॅन्ड असे मिळून फक्त तीनच स्टॉप घेणार आणि थेट उतरवणार नाशिक फाटा आणि वाकडेवाडी बसस्टँडला.  जर नाशिक मधील एखाद्या प्रवाश्याला संगमनेर, आळेफाटा, मंचर ठिकाणी उतरायचं असल्यास त्याला या बसेस मध्ये चढताच येत नाही. या बसेसचे ड्रायव्हर्स सरळ सांगतात साध्या गाडीने जा मात्र त्याचवेळी या पांढऱ्या हत्तीला प्रवासी मिळावेत म्हणून त्या मार्गावरील साध्या बसेस बंद केलेल्या असतात त्यामुळे त्या प्रवाश्याला इच्छा असो वा नसो खासगी वाहतूकानदारांकडेच वळावे लागते.
कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात आरामदायी एसटी बस सेवा आहेत हे पूर्णतः मान्य आहे मात्र या बस सेवा कोणत्या पद्धतीने चालवल्या जातात याचा मात्र अभ्यास महाराष्ट्रातील एसटी महामंडळ करतच नाही असेच त्यांच्या निर्णयातून दिसून येते. कर्नाटक असो आंध्र प्रदेश असो या राज्यातील एसटी महामंडळाच्याआरामदायी बसेस मध्ये जितके प्रवासी येतील त्या प्रमाणात  पगारापेक्षा अधिकचे कमिशन ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना मिळते आपल्याकडे कमिशन सोडा मुळात ठरलेला पगार मिळेलच याचीच शाश्वती नाहीये. कमिशन मिळत असल्याने आंध्रपदेश आणि कर्नाकच्या एसटी बसेस  स्वच्छ ठेवण्यावर ड्रायव्हर आणि कंडक्टर कडूनच विशेष प्राधान्य देण्यात येते. आपल्याकडे पगाराचीच खात्री नसल्याने कशाला जास्तीचे काम करूया असा दृष्टिकोन ठेवत बसेस चालवल्या जातात. त्यामुळे त्या अनेकदा अस्वच्छ असतात. अस्वच्छ बसेस मुळे प्रवासी नको ती बस असा दृष्टिकोन ठेवत आपल्या एसटी महामंडळाच्या आरामदायी बसेस कडे कानाडोळा करतात. तसेच या या राज्यातील एसटी महामंडळाकडून चालण्याण  येणाऱ्या बस सेवा आणि खासगी वाहतूकदारांचा बस सेवा यात तिकीटांचा फरक हा नसतोच काही. आपल्या महाराष्ट्र राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसवर तब्बल 17 टक्के हा कर आकारण्यात येतो जो एसटी महामंडळ प्रामाणिकपणे भरते मात्र खासगी बस वाहतूकदार भरतीलच याची काही शाशती नाही. यामुळे एसटी महामंडळाचे तिकीट खूप मोठ्या प्रमाणात महाग होते आणि प्रवासी कमी तिकीट आहे असे समजून खासगी वाहतूकदाराककडेच वळतात. किमान सर्व खासगी बस वाहतूकदार सुद्धा एसटी एवढाच कर भरतील याची खातरजमा प्रशासनाकडून करण्यात येणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र ते करण्यात येत नाही. 
फक्त एसटी महामंडळाकडून विविध आनंदायी बसेस चालवण्याचा घोषणा करण्यात येतात ज्यामुळे मूळ दुखणे कायमचेच राहते आणि होतो तो फक्त देखावा देखावा देखावा.



Comments

Popular posts from this blog

विनाशकाले...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

आम्हाला वाहक हवेच!