आत्महत्येच्या विळख्यात तरुणाई .. !
कोणत्याही देशाचे भवितव्य तेथील तरुणाई ठरवत असते. तरुणाईच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर कोणत्याही देशाच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरत असते., आणि याच मुद्ययावर आपल्या भारताचे टेंशन वाढवणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झालीये . ही आकडेवारी 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ती झटकून टाकता येणे अशक्य .कारण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे येणारी माहिती हि देशभरातील पोलीस स्टेशनमधून थेट येत असते .देशभरातील विविध पोलीस सटेशनमध्ये वेगवेगळ्या क्लालाखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची एकत्रित नोंद म्हणजे ही आकडेवारी या आकडेवारीत विविध गुन्हयात देशभरात किती प्रकरणे दाखल झाली याची ,माहिती असते .जसे रस्ते अपघात इतक्या , दरोड्याच्या तितक्या , देशभरात दखल झाल्या या प्रमाणे तर वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून नुकतीच सन २०२४ मध्ये देशभरात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी कोणत्या वयोगटातली किती आत्महत्या होत्या ?आत्महत्या करणाऱ्यां व्यक्तींचे व्यवसाय काय होते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे . यातील आकडे हृदय पिळटवून टाकणारे...