महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...

महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही  आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर  झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ? 

    तर जरा थांबा मी जे म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपणास आजपासून २९ वर्ष मागे सन  १९९७ मध्ये जावे लागेल. माझ्या  नाशिकचे भूमिपुत्र कविवर्य कुसुमाग्रज यांनी एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहलेल्या सुप्रसिद्ध अश्या ' स्वातंत्र्य देवतेची विनवणी' या कवितेपर्यंत मागे जावे लागेल. या कवितेत त्यांनी परभाषेतही व्हा पारंगत असा उपदेश केलेला असला तरी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली होती  मायमराठी मरते इकडे परकींचे पाय चेपू नका. भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका।। असेही त्यांनी सांगितले होते. मात्र गेल्या २९ वर्षात तिचे पालन करताना आपण मात्र त्यांच्या परभाषेतही व्हा पारंगत या उपदेशाकडे जास्त लक्ष देत फक्त भारतातीलच नव्हे तर फ्रेंच स्पेनिश जर्मन सारख्या मराठी मुलुखाशी काहीही संबंध नसलेल्या भाषेत मोठी प्रगती केली मात्र आपल्या मराठी भाषेकडे सोईस्कर दुर्लक्ष केले हे गेल्या २९ वर्षातीलपाप म्हणजे मराठी भाषेत ९४००० विद्यार्थी नापास होणे ते देखील राज्य शैक्षणिक बोर्डाच्या परीक्षेत ?  एकवेळ सीबीएससी, आयसीएससी या बोर्डाचे समजू शकते त्यात मराठी भाषिक सोडून अन्य मातृभाषा असलेले मात्र काही कारणाने महाराष्ट्रात राहणारे असू शकतात  मात्र राज्य बोर्डाचे सर्व विद्यार्थी  मात्र मराठी भाषिकच असतात हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे .  

त्यातही दुर्दैव म्हणजे सध्या मुलाना शिकताना ताण  येऊ नये यासठी कृती पुस्तिका भरण्यात येते. तसेच तोंडी परीक्षा देखील असते तोंडी परीक्षा जरी बाहेरचा शिक्षक घेत असला तरी तू माझ्या  विद्यार्थ्यांना खूप मार्क दे मी तुझ्यया विद्यार्थ्यंना खूप मार्क देतो असं व्यवहार असल्याने तोंडी परीक्षेतच मुले पास  होऊन गेलेली असतात .कृती पुस्तिका म्हणजे फक्त गाळलेल्या जागा भरणे असते अस्या स्थितीत जर राज्य भाषेत राज्य बोर्डाचा परीक्षेत एकूण परीक्षेला बसलेल्या मुलांपैकी ८ टक्के नापास होत असतील ती भाषा  अवघड स्थितीतून जात आहे हेच सिद्ध होतेय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेत सांगितल्याप्रमाणे भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे हे बघितल्यास हे वाक्य पण महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... असे देखील म्हणू शकतो आणि दुःख तेच आहे 


Comments

Popular posts from this blog

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

फक्त अनावश्यक सवलती आवरा !