वाचक मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला
जानेवारी १९९९ मध्ये
प्रदर्शित झालेला दिलीप प्रभावळकर,
सुरेखा कुडची, प्रदीप पटवर्धन
यांची प्रमुख भूमिका
असलेला आणि अजय
फणसेकर दिग्दर्शित ‘रात्र आरंभ’
हा चित्रपट किंवा
मार्च २००४ साली
प्रदर्शित अतुल कुलकर्णी,
सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार,
तुषार दळवी यांची
प्रमुख भूमिका असलेला सुमित्रा
भावे आणि सुनील
सुकथनकर यांनी दिग्दर्शन केलेला
‘देवराई’ हा चित्रपट
आठवतो का? मी
हे विचारतोय कारण
हे फक्त करमणूकप्रधान
चित्रपट नव्हते, तर माहितीपटाच्या
चौकटीत जाणारे; मात्र त्याचवेळी
माहितीपटाचा अवजडपणा दूर सारत
मनोरंजन करणारे देखील होते.
हे दोन्ही चित्रपट
स्किझोफेनिया या गंभीर
स्वरूपाच्या मानसिक आजाराबाबत मोठ्या
प्रमाणात समाजप्रबोधन करणारे होते.
‘रात्र आरंभ’ हा चित्रपट
मराठीतील पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर (Paranoid Schizophrenia) आधारित पहिला चित्रपट
मानला जातो, तर
‘देवराई’ हा चित्रपट
मानसिक आरोग्य विषयावर अत्यंत
संवेदनशीलपणे आणि मोठ्या
प्रमाणात सखोलतेने भाष्य करतो.
स्किझोफेनिया
हा कोणाच्याही आयुष्यात
येऊ शकणारा आजार
आहे. तो कोणत्याही
व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसतो.
त्यामुळे अशा व्यक्तींना
दोष देणे किंवा
त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहणे
चुकीचे आहे. “स्वीकारा” या
संकल्पनेत प्रत्येक व्यक्तीला समानतेने
वागवण्याचा संदेश दिला जातो.
विनाशकाले...
आजपासून साधरणत: आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारने एसटी महामंडळाबाबत एक निर्णय घेतला. महामंडळाच्या जागा खासगी विकासकाच्या माध्यमातून ४९ वर्ष इतक्या दिर्घ मुदतीच्या कराराने विकसीत करण्याचा. मुळात एसटी महामंडळाची आजची आर्थिक स्थिती बघता, महामंडळ पुढचे वर्ष तरी बघू शकेल का?असी स्थिती असताना राज्य सरकारने थेट अर्ध शतक वर्षासाठी महामंडळाची जागा खासगी विकासकांना देण्याचा निर्णय घेतला. या जागा विकसीत करुन त्याद्वारे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली जाईल,असे यावेळी राज सरकारकडून सांगण्यात आले. कोंबडी रोज एक सोन्याचे अंडी देत असताना सर्वच अंडी एकाचवेळी मिळावी,यासाठी कोंबडीला मारले असता,एकही अधिकचे अंडे न मिळता कोंबडी मरुन जाण्याची कथा आपण पंचततंत्रात वाचली असेल.माझा मते राज्य सरकारचा निर्णय याच पथडीतील आहे. एसटी महामंडळाच्या जागा शहरात मोक्याचा ठिकाणी आहेत. त्यांचे क्षेत्र ही मोठे आहे.ही गोष्ट विचारात घेता एकेका जमिनीची किंमत डोळे पांढरे करणारी आहे,हे मान्य केले तरी या जमिनीच्या आधारे आर्थिकदृष्ट्यासंपन्न होण्याचे धोक्याचे आहे.देव न करो पण नाशिकचा ठक्कर बझार सारखा हा प्रकल्प फसला तर...



Comments
Post a Comment