भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म


आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.
     तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी पक्षांनी नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र जाहिर केले.त्याविरोधात सातत्याने आंदोलने नेपाळमध्ये होत असतात.मात्र सध्या या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन गेल्या कित्येकआंदोलनापेक्षा मोठे आहे.देशातील जवळपास सर्वच जनता हिंदू धर्मिय आहे, त्यामुळे नेपाळला हिंदू राष्ट्र जाहिर करण्यात यावे असी आंदोलकांची मागणी  आहे. सन 2008च्या आधी नेपाळ हिंदू राष्ट्र होतेच असा आधार या आंदोलनाचे समर्थक घेत आहेत.
   बांगलादेशाबाबत बोलायचे झाल्यास, यांच्या पुर्णतः उलट स्थिती आहे.तेथील हिंदू अल्पसंख्यांकावर ,त्यांची बाजु घेणाऱ्या मुस्लिम व्यक्तींवर हल्ला करण्याचा घटना वाढलेल्या आहेत. तेथील सर्वसामान्य जनतेत भारतविरोधी भावना वाढत आहे. पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामन्यात भारत हरल्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया  या बांगलादेशातील सरकार जरी भारत समर्थक  असले तरी सर्वसामान्य जनता भारत विरोधी असल्याचे दाखवून देत आहे. भारताचा धर्म म्हणून हिंदू धर्मिय व्यक्तींवर हल्ला करण्याचा  घटनेत बांगलादेशात सातत्याने वाढ होत आहे. .अन्य इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या देशात जसे इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात सौदी अरेबिया या देशात भारताच्या विरोधात नव्हे तर भारताला अनुकूल भुमिका घेण्यात येते.त्यामुळे हा इस्लामचा विरोध आहे,असे समजता येते नाही. 1947च्या वेळी बांगलादेशातील हिंदू धर्मियांची लोकसंख्या सुमारे 20% होती . मात्र यात सध्या मोठी घट झाली असून ती आजमितीस साडेतीन ते चार टक्याचा आसपास असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ‌बांगलादेशातील हिंदू धर्मियांची संख्या घटन्यामागे त्यांची हत्या, किंवा बळजबरीने धर्म परिवर्तन किंवा हिंदू धर्मियांचे बांगलादेशातून पलायन यामुळे ही संख्या घटली आहे.  
तसे बघायला गेले तर संविधानात अधिकृतरित्या आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत असे जाहीर करणारा दक्षिण आशियातील पहिला देश म्हणजे बांगलादेश होय. भारताने 42व्या घटनादुरुस्तीने 1975साली संविधानाच्या प्रास्ताविकात धर्मनिरपेक्षता हा शद्ब समाविष्ट करुन भारत धर्मनिरपेक्ष आहे,असे अधिकृतरित्या जाहिर केले. मात्र बांगलादेशाने या आधीच4 वर्ष  1971मध्येच स्वतः ला धर्मनिरपेक्ष म्हणून जाहीर केले होते. बांगलादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि सध्या सत्तेत असणाऱ्या अवामी लिग हा पक्ष धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जातो मात्र असे असून देखील बांगलादेशात कट्टरता वाढत आहे.बांगलादेश अधिकाधिक इस्लामी पद्धतीने चालवण्यात यावा असी मागणी जनतेकडून सातत्याने होत आहे ‌जे भारतासाठी नक्कीच धोक्याचे आहे ‌

Comments

Popular posts from this blog

एसटी खासगीकरणाचे अजून एक पाउल

२०२४ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

३० नोव्हेंबरपासून दुबईत मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?