शुभार्थींचा आपल्याच त्रस्त बांधवांच्या मदतीसाठी सहकार्याचा हात!
मन ! आपल्या सर्व वर्तनावर व्यक्तिमत्त्वावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा शरीरातील घटक. आपण डोळे झाले विविध हाडे किंवा पेशी यांचे स्वतंत्र असे दाखवून देऊ शकतो तसे स्वतंत्र अस्तित्व दाखवता न येणाऱा मात्र अत्यंत परिणामकारक असणारा घटक . समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे सांगत मानवी आयुष्यातील मनाचे महत्त्वाचे अधोरेखित केले आहे. मेंदूत स्त्रवणाऱ्या विविध केमिकल्सचा एकत्रित परिणाम म्हणजे मन असी ढोबळ व्याख्या मानसशास्त्रात केली जाते. या स्त्रवणाऱ्या विविध केमिकल्स सर्वसाधारण प्रमाण ठरलेले आहे त्यात काही प्रमाणात बदल झाला की व्यक्तीचा वर्तनात व्यक्तिमत्वात मोठ्या प्रमाणात बदल होतो तिचे आयुष्य मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते आणि आपण म्हणतो त्याला मानसिक आजार आहे. व्यक्तीला मानसिक आजार झाला की फक्त त्या व्यक्तीचेच नव्हे तर ती व्यक्ती ज्या कुटुंबाचा भाग आहे त्या कुटुंबाचे जीवन सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते आपल्या घरातील ज्या व्यक्तीला काही मानसिक व्याधी आहे ती व्यक्ती बाहेर समाजत कसे वागेल लोक त्या व्यक्तीच्या वागण्याच्या अर्थ काय काढतील याबाबत असा कुटुंबांना मोठ्या प्रमाणात तणाव असतो हा तणाव कमी व्हावा आणि शरीरासारखेच मनाला देखील विकार होऊ शकतात आणि शरीराचे विकार जसे औषध गोळ्या घेऊन बरे होतात अगदी तसेच पूर्ण 100% नाही मात्र मोठ्या प्रमाणात मानसिक आजार नियंत्रणात राहू शकतात फक्त त्याविषयी जनजागृती असणे अत्यावश्यक आहे लोकांना समजावे म्हणून 1992 पासून जगातील आरोग्य संघटनेमार्फत सयुंक्त राष्टसंघटनेच्या मार्फत जागतीक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो हा दिवस साजरा करण्यात यावा यासाठी जागतिक मानसिक आरोग्य संघटनेमार्फत सातत्याने पुढाकार घेतला जातो 1992 पासून साजरा करण्यात येणारा हा दिवस 194 पासून एक विशिष्ट संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो आत्ताच्या 2026 ची संकल्पना आहे. Lived experiences heard: real voices, real chance अनुभवलेल्या व्यक्तींचा कथनातून थेट बदल करणे असे आपण म्हणू शकते
मानसिक आरोग्याच्या समस्यांचा, उपचारांचा किंवा त्यातून बरे होण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांच्या अनुभवांना आणि ज्ञानाला महत्त्वाचा दर्जा देणे.मानसिक आरोग्याशी संबंधित शासकीय धोरणे, वैद्यकीय सेवा आणि निर्णय प्रक्रियांमध्ये या लोकांच्या आवाजाला (ममता आणि मते) स्थान देणे. केवळ त्यांच्या कथा ऐकण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय भागीदार बनवणे हा यामागचा हेतूआहे. भारतात मानसिक आजार आणि त्याविषयीची जनजागृती याविषयी काम करणारी एक महत्त्वाची संस्था म्हणून स्किझोफेनिया अवरनेस असोसिएशन ओळखली जाते. मानसिक रुग्ण यांच्या विषयी असणाऱ्या काहीसा कलंकित भावनेमुळे या संस्थेमार्फत मानसिक रुग्णांना शुभार्थी या नावाने संबोधतात त्यामुळे आपण आपल्या भारतीय मानसिकतेनुसार शुभार्थींची आपल्या त्रस्त भावना बांधवांना केलेली मदत असे सर्वसाधारण आपण या वर्षाच्या थीम विषयी म्हणू शकतोमानसिक आरोग्याचा सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव गांभीर्याने ऐकले जातील, तेव्हाच समाजात आणि आरोग्य व्यवस्थेत 'वास्तविक बदल' घडून येईल.दिपिका पडुकोण हीने स्वत: स्वतःला अनुभवास आलेल्या नैराश्याचा विषय जाहीरपणे सांगितल्यावर लोकांनी त्याविषयी माउंट सोडले हे आपण बघितले आहेत दीपिका पादुकोण प्रमाणेच ज्या लोकांनी स्वतः मानसिक आरोग्याच्या समस्यांचा, उपचारांचा किंवा त्यातून बरे होण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांच्या अनुभवांना आणि ज्ञानाला महत्त्वाचा दर्जा देणे. मानसिक आरोग्याशी संबंधित शासकीय धोरणे, वैद्यकीय सेवा आणि निर्णय प्रक्रियांमध्ये या लोकांच्या आवाजाला (ममता आणि मते) स्थान देणे. केवळ त्यांच्या कथा ऐकण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय भागीदार बनवणे हा यामागचा हेतू आहे.जेव्हा मानसिक आरोग्याचा सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव गांभीर्याने ऐकले जातील,

ज्यांनी मानसिक त्रास भोगला आहे.त्यांच्याच अनुभवाच्या आधारे आता ध्येय धोरणे ठरवण्यात येत असल्याने ती अत्यंत अचूकपणे ठरवता येऊ शकतात तसेच हे लोक सुद्धा जसे मानसिक आजाराचा त्रास पडली
असे आपण पण पडू अशी सकारात्मकता सुद्धा मानसिक रोग्यांमध्ये निर्माण होऊन त्यांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मोठे बळ मिळू शकते त्यामुळे या वर्षी संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची ठरते.

Comments
Post a Comment