भारताच्या हृदयात पुन्हा एकदा एसटीची चाके फिरणार!
भारताचा स्वातंत्र्यानंतर एक वर्ष ही पूर्ण व्हायच्या आतच अर्थात एक जून 1948 रोजी आपल्या महाराष्ट्रात राज्य सरकारकडून चालवण्यात येणारी सार्वजनिक बस वाहतूक एसटी बस सुरू झाली. महाराष्ट्र एसटी बस सुरू झाल्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 1956 साली केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतूक अधिनियम हा संमत केला त्यानंतर विविध राज्यात त्या त्या राज्य सरकारकडून नियंत्रित होणारी सार्वजनिक वाहतूक बस सेवा अर्थात एसटी बस सेवा सुरू झाली. आज 2026 साली भारताचे हृदय पर्यटनाच्या अपार संधी असणारे राज्य म्हणून ओळख असणाऱ्या मध्य प्रदेश आणि एकेकाळी त्याच्याच भाग असणाऱ्या मात्र नंतर स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलेल्या छत्तीसगडचा अपवाद वगळता भारतातील प्रत्येक राज्यात छोटी मोठी का होईना पण एसटी बस सेवा आहे. आज पासून 21 वर्षांपूर्वी अर्थ 2005 साली तत्कालीन मध्यप्रदेश सरकारने मध्य प्रदेश राज्य परिवहन महामंडळ याला प्रचंड प्रमाणात तोटा होतोय असे सांगत राज्यातील एसटी महामंडळाची सेवा बंद केली. पुढे मध्य प्रदेश मधून छत्तीसगड वेगळे झाल्यावर सुद्धा छत्तीसगडची परिवहन सेवा बंदच होती. मध्यप्रदेश मध्ये काही खासगी बस वाहतूकदार मध्यप्रदेश परिवहन अशी पाटी लावत त्याची सेवा देत होते मात्र या खासगी बस धारकांचे नियम स्वतःला अनुकूल असेच होते. राज्यातील गोरगरीब जनतेचाकाही विचारच त्यांनी केला नव्हता जो महाराष्ट्रासारखे सार्वजनिक परिवहन महामंडळ करतात.
आता मात्र या चित्रात सकारात्मक बदल होतोय.जनसंघाचे महत्त्वाचे नेते पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयतींचे औचित्य साधत नुकतीच मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एकदा एसटी बसची चाके फिरण्यास सुरूवात झाली आहे. राज्य सरकारकडून ३५० बसेसद्वारा या सेवेची सुरुवात करण्यात आली. या बसेस इंदोर, जबलपुर रेवा आदी शहरादरम्यान सेवा पुरवतील. येत्या वर्षभरात १५,०००हजार बसेस ताफ्यात समाविष्ट करुन त्यास पुर्ण स्वरूप देण्याचे राज्य सरकारडून जाहिर करण्यात आले आहे. भगव्या रंगात असणाऱ्या या बसेस पी.पी.पी. या तत्वावर चालवण्यात येणार असल्या तरी त्यावर राज्य सरकारचे पुर्ण नियंत्रण असणार आहे. यासाठी प्रती किलोमीटर २रूपये दर निश्चित करण्यात आला आहे.पुर्णत: एसी आणि सी सी टिव्ही, जीपीएस यूक्त या बसेस असणार आहेत.
मध्यप्रदेश मध्ये सरकारी बससेवा नसल्याने ग्रामीण भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते आता हे प्रमाण बराच मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील मध्य प्रदेश मध्ये होईल. खासगी बस वाहतूकदार प्रवाशांच्या अडचणीचा फायदा घेत मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करत त्याला देखील सरकारी बस सेवा आल्यामुळे मोठ्या प्रमाणात चाप बसेल.
मात्र असे असले तरी 21 वर्षानंतर सुरू होणाऱ्या या बस सेवेला अडचणींना देखील समोर जावे लागू शकते आज 2026 साली भारतातील पहिले सार्वजनीक बस वाहतूक सेवा सुरू करणारे मध्य प्रदेश बरोबर सीमा शेअर करणारे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बस वाहतुकीचा संदर्भात अनेक अडचणींना तोंड देत आहे 21 वर्षांपूर्वी जसे तोट्याच्या कारणास्तव मध्य प्रदेश एसटी बस सेवेला टाळे लागले काहीसा तोच प्रकार आता महाराष्ट्रात घडेल का असे वाटावे अशी सध्याची स्थिती आहे. मध्यप्रदेशचा विचार करता सध्या मध्य प्रदेश मध्ये खासगी बस वाहतूक केलेला अक्षरशः मोकळे रान आहे. या मक्तेदारी मोडत या 21 वर्षांनी सुरू होणाऱ्या एसटी महामंडळाला आपले स्थान निर्माण करायचे आहे.
अर्थात अडचणींना सामोरे जात जो यश मिळवतो तोच खरा बादशाह म्हणण्यास योग्य ठरतो असे एक वचन आहे त्या वचनाच्या आधारे आपण जरी मध्य प्रदेश एसटीला काही अडचणी असल्या तरी त्यावर ते यशस्वी करत भारतातील ज्या दोन राज्यात काहीच सर्वजनीक परिवहन बस सेवा नाही या कलंकातून बाहेर पडत छोटी का होईना पण सार्वजनिक परिवहन बस वाहतूक आहे असे म्हणायला मोकळे होतील. आणि तुमचे माहित नाही परंतु माझा सारख्या एसटी बस प्रेमी साठी हेच फार मोठी गोष्ट आहे.
Comments
Post a Comment