एका पिढीचा कालखंड सरून देखील समस्या त्याच

कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली  सकाळच्या दिवाळी अंकासाठी फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती .ज्याची मध्यवर्ती कल्पना स्वातंत्र्यदेवता भारतीयांना अरे बाबानो स्वातंत्र्य मिळून आता ५० वर्षे झाली आहेत आता तरी या समस्या कायमच्या सोडवा असे सांगत आहे ही  होती. 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ' असे शीर्षक असलेल्या या सुप्रसिद्ध कवितेला पहिल्यांदा प्रसिद्ध होऊन आता लवकरच ३० वर्षे अर्थात एका पिढीचा कालखंड पूर्ण होईल तर  ज्या घटनेचा संदर्भ घेत हि कविता लिहण्यात आली होती. त्याला ३० वे वर्ष येत्या शनिवारी जेव्हा आपण ८० व स्वातंत्र्यदिन साजरा करत असू तेव्हाच पूर्ण होईल 
या ३० वर्षात आपण यात सांगितलेल्या कोणत्या उणिवांवर मात केली .कोणत्या समस्या तेव्हा होत्या त्याच स्थितीत आहेत .कोणत्या समस्या पूर्ण सुटल्या नसल्या तरी त्यात बऱ्यापैकी मात केली आहे तसेच कोणत्या समस्या गेल्या ३० वर्षत अजूनच चिघळला आहेत याचा आढावा घेतला तर समोर येणारे चित्र फार अनुकूल म्हणता येण्यासारखे नाही . असे दुःखाने म्हणावे लागतेय या कवितेत मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली होती. माझ्यामते ही  समस्या अजून आहे तशीच आहे असे म्हणता येईल काही जणांना या वर्षी राज्य शिक्षण बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत  मराठी भाषेचा निकाल बघून यात  घसरण  झाल्यासारखे वाटेल मात्र माझ्या मते ही गोष्ट तात्पुरती आहे या निकालामुळे मराठी भाषेची घसरणझालेली आहे असे म्हणता येणार नाही . याच कवितेत
भाषेविषयी सांगितलेल्या इतर एका गोष्टीत मात्र मराठी भाषिकांनी खूपच म्हणजे खूपच छान प्रगती केली आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही ती म्हणजे पर भाषेत ही व्हा पारंगत गेल्या तीस वर्षात मराठी भाषिकांनी इतर भाषेत खूपच उत्तम प्राविण्य मिळवले आहे हे नाकारता येणे अशक्य महिलांच्या बाबत या कवितेत सामान दर्जा देण्याविषयी संज्ञानता आले होते. त्या वेळेपासून रखडलेले संसदेतील महिला आरक्षण विधेयक , महिलांच्या  अत्याचाराच्या वर्तमानपत्रात येणाऱ्या घटना याचा विचार करता यात आपण काहीसे घसरलोय असे मला वाटतेय तीच गोष्ट जातीय सलोख्याबाबत म्हणता येण्यासारखी स्थिती आहे असे मला वाटतंय . जरी सध्या विशिष्ट जाती -जमातीत जन्मला म्हणून अन्याय होणाच्या घटना  जाहीरपणे होत नसल्या तरी विविध  घटकांकडून करण्यात येणाऱ्या आरक्षणाचा मागण्या तसेच आरक्षण विरोधकांचे आंदोलन बघता (कायदे करा मात्र हटवा जाहीर जातीचे मनातुनी)  यात आपण अल्पसे का होईना घसरलोय हे नाकारता येणे अशक्यच आपल्याकडे सर्वत्र पुतळे उभारले जातात मात्र त्यांच्या मार्ग अनुसरला जात नाही (बोथट पुतळे पथपथवर जर त्याचा मार्ग अनुसरा ) यामध्ये आपली स्थिती देखील अजून चिंताजनकच स्थितीत आहे असो 
मात्र चित्र फारच वाईट आहे असे नाही अनेक बाबतीत आपण खूपच छान प्रगती देखील केली ज्यामध्ये भष्ट्राचाराचे   प्रमाण (मेजा  खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ) कमी झाले आहे शासकीय कारभार उत्तम झाला आहे (जनसेवेस्तव असे कचेरी  डाकूंची नसे गुहा ) नागरिक अनेक बाबतीत आता सजगपणे
चुकीच्या गोष्टीना विरोध करताय .आपल्या परीने त्यात चांगले करण्याच्या प्रयत्न करताय  ( भले पानाचे कार्य दिसता शंखच पोकळ फुंकू नका / इथे भष्ट्रता तिथे नष्टता / सुजन असा पण कूजन जन्मता हत्यार हाता मध्ये धरा  ) आपली आर्थिक स्थिती फारच ऊत्तम झाली आहे (करा साधना धनाची बैरागीपण नसे बरे ) असे असले तरी आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे माणुसकी कमी झाली आहे (आस्तिक असा वा  नास्तिक असा माणुसकीतच देव बघा ) शाळेची स्थिती अनेक ठिकाणी फारशी उत्तम नाही (मनी मंदिरी मी मंदिरलाय ... ) आपल्याकडे अजूनही काही कालबाह्य  गोष्टीना विनाकारण महत्तव देण्यात येते बदल सहजतेने स्वीकारले जात नाही ( जुनाट पाने गळूनी पडती ...... २१ वे शतक सामोरी सोळ्यास्तव रडू नका )
तसे बघायताला गेले तर या कवितेविषयी जितके लिहू बोलू तितके कमीच आहे मला पूर्वी हि कविता तोंडपाठ होती मात्र बऱ्याच दिवसात न म्हंटल्याने ती काहीशी विसरली आहे तरी यात सांगितलेल्या अनेक गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आता हे लिहितं असताना ती कविता माझ्याकडे नाहीये मी सर्व आठवून आठवून लिहीत आहे माझा हा प्रयत्न आपणास आवडला असेल असे मनोमनी मानून आता थांबतो 

जय हिंद 

Comments

Popular posts from this blog

विनाशकाले...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?