शनी ग्रहाविषयी या बाबी आपणास माहिती आहेत ना !
शनी नाव ऐकताच अनेकांना धडकी भरणारा ग्रह. साडेसातीमुळे ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध असलेला ग्रह. मात्र हा शनी ग्रह खुपच रंजक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खगोलशास्त्राचा विचार करता दोन गोष्टीमुळे हा ग्रह विशेष चर्चेत आलायं. त्या गोष्टी आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन
तर मित्रांनो साडेसाती वगळता शनी म्हटल्यावर जी गोष्ट लगेच समोर येते,ती म्हणजे त्याचे कडे. शनीखेरीज गुरु, युरेनस, नेपच्युन या ग्रहांना देखील कडे असले तरी कडी असलेला ग्रह म्हटल्यावर नाव समोर येते ते शनीचेच.माझे खगोलशास्त्रप्रेमी मित्र आहेत ते जेव्हा जाहीर आकाशदर्शनाचे कार्यक्रम करतात तेव्हा लोक त्यांना शनीच्या कडी दुर्बिणीतून दाखवा असी मागणी करत असतात. ही कडी निर्माण होण्याचा दोन शक्यता सांगितल्या जातात.त्यातील पहिली म्हणजे काही कारणाने लाखो वर्षापुर्वी शनीचा एका उपग्रह काही अज्ञात कारणाने खुपच जवळ आला त्यामुळे त्या उपग्रहावरील शनीचे गुरुत्वाकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले या वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या उपग्रहाचे तूकडे झाले जे आपण शनीच्या कड्याचा रुपात बघत आहोत.एखादा खगोलीय घटक त्याच्यापेक्षा मोठ्या खगोलीय घटकाच्या किती जवळ येवू शकतो यास मर्यादा आहे.ज्याला रोशची मर्यादा म्हणतात. रोशची मर्यादा त्या त्या उपग्रहाकडून ओलांडण्यात आली होती. दुसरी शक्यता म्हणजे शनीच्या दोन उपग्रहांची टक्कर झाल्याने ही कडी निर्माण झाली असावी.
तर ही कडी येत्या23 मार्चपासून काही काळ दिसणार नाहीये. ही घटना दुर्मिळ नसली तरी नेहमी घडणारी नाहीये तर दर 15वर्षांनी घडणारी घटना आहे .ही घटना कशी घडणार हे आता समजून घेवूया.
तर मित्रांनो पृथ्वी सुर्याभोवती फिरताना साडे 23 अंशाचा कोन करते तर शनी ग्रह सुर्याभोवती फिरताना साडे 26 अंशाचा कोन करतो. पृथ्वी 365.25 दिवसात सुर्याभोवती एक चक्कर पुर्ण करते ज्याला आपण एक वर्ष म्हणतो शनी ग्रहाचा विचार करता शनी पृथ्वीवरील 29.4 वर्षात सुर्याभोवती चक्कर पुर्ण करतो तर यामुळे होत काय तर तर काही अपवाद वगळता आपण शनीची कडी वरून किंवा खालून बघतो . सुमारे 15 वर्षानंतर ही कडी आपल्या पृथ्वीवरून शनी बघण्याचा विचार करता समोर येतात.त्यामुळे पृथ्वीवरुन कडी स्वतंत्र्यपणे दिसत नाही तर फक्त एक रेष स्वरुपात ही कडी दिसतात.ज्याची सुरवात येत्या रविवारपासून अर्थात 23मार्चपासून होणार आहे.
दुसरी गोष्ट शनीच्या उपग्रहाच्या बाबतीत आहे.तर नुकतेच शनीचे 128 उपग्रह सापडले आहेत.त्यामुळे एकुण 274 उपग्रहांसह शनी सुर्यमालिकेतील सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह झाला आहे. आजमितीस गुरु ग्रहाला 95 उपग्रह आहे नेपच्युला 16 तर युरेनसला 28 उपग्रह आहेत तर मंगळाला दोन अणि पृथ्वीला एकच उपग्रह आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेतर्फे ग्रह कोणास म्हणावे याचे ठोस निकष असले तरी उपग्रहाबाबत ठोस निकष नाहीत. ग्रहाभोवती फिरणाऱ्या कोणत्याही गोष्टीला उपग्रह समजण्यात येते.तीचा आकार किती मोठा आहे.तीचा आकार काय आहे.याबाबत विचार न करता ग्रहाभोवती फिरतोना या एकाच निकषावर तीला उपग्रह समजण्यात येते.त्यामुळे शनीच्या उपग्रहांची संख्या इतकी मोठी आहे शनीचे काही उपग्रह काही किलोमीटर मोठे आहेत.असो मात्र त्यामुळे शनीला उपग्रहांचा राजा हा मान तर मिळाला ना?असो माझी ही माहिती तूम्हाला आवडली असेल,असी आशा आहे.
Comments
Post a Comment