Posts

Showing posts from March, 2025

पुन्हा एकदा संतोष माने!

Image
ती नेहमीप्रमाणे पुण्यातील एक सकाळ होती सुट्टीचा दिवस नसल्याने सर्वजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते मात्र काय त्यांच्यावर ओढवणार आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाण असणाऱ्या स्वारगेट परिसरात एका एसटी बस ड्रायव्हरने बस भरधाव पणे बस चालवत नऊ जणांना मृत्युमुखी पाडले तर किमान 30 जणांना गंभीरित्या जखमी केली  आज ही  घटना संतोष  माने प्रकरण या नावाने प्रसिद्ध आहे. ही घटना घडली 25 जानेवारी 2012 रोजी त्यानंतर या प्रकरणातील आरोपी संतोष माने यांच्यावर पुणे सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला . पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी संतोष माने यांना फाशीची शिक्षा सुनावली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते हे कृत्य करताना तणावात होते असे निरीक्षण नोंदवात त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. आज संतोष माने येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय . संतोष माने यांनी वरिष्ठांचा जाचाल कंटाळून हे कृत्य केले होते मात्र आज हे वरिष्ठ शांतपणे आपल्या घरात बसले असतील.आणि संतोष माने तूरुंगात...

शनी ग्रहाविषयी या बाबी आपणास माहिती आहेत ना !

Image
      शनी नाव ऐकताच अनेकांना धडकी भरणारा ग्रह. साडेसातीमुळे ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध असलेला ग्रह. मात्र हा शनी ग्रह खुपच रंजक आहे‌. गेल्या काही दिवसांमध्ये  खगोलशास्त्राचा विचार करता दोन गोष्टीमुळे हा ग्रह विशेष चर्चेत आलायं. त्या गोष्टी आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रांनो साडेसाती वगळता शनी म्हटल्यावर जी गोष्ट लगेच समोर येते,ती म्हणजे त्याचे कडे. शनीखेरीज गुरु, युरेनस, नेपच्युन या ग्रहांना देखील कडे असले तरी कडी असलेला ग्रह म्हटल्यावर नाव समोर येते ते शनीचेच.माझे खगोलशास्त्रप्रेमी मित्र आहेत ते जेव्हा जाहीर आकाशदर्शनाचे कार्यक्रम करतात तेव्हा लोक त्यांना शनीच्या कडी दुर्बिणीतून दाखवा असी मागणी करत असतात. ही कडी निर्माण होण्याचा दोन शक्यता सांगितल्या जातात.त्यातील पहिली म्हणजे काही कारणाने लाखो वर्षापुर्वी शनीचा एका उपग्रह काही अज्ञात कारणाने खुपच जवळ आला त्यामुळे त्या उपग्रहावरील शनीचे गुरुत्वाकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले या वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या उपग्रहाचे तूकडे झाले जे आपण शनीच्या कड्याचा रुपात ...

एसटी महामंडळाची उलट गंगा!

Image
    सध्या आपल्या भारतातील सर्वच सार्वजनिक बसवाहतूक महामंडळे  प्रवाश्यांना अधिकाधीक उत्तम सेवा कोणत्या प्रकारे देता येईल,यासाठी प्रयत्नशील आहेत.राजस्थान, उत्तर प्रदेश सारख्या गरीब राज्यांचे  महामंडळ सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीये.मात्र म्हणतात ना, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा या नियमाला एक अपवाद आहे.आपले महाराष्ट्र एसटी महामंडळ. आपले महामंडळ घडाळ्याचे काटे मागे फिरवत आपणास 2008 सालची अनुभुती देण्यासाठी पुढे सरसरावले आहे. महामंडळाने 4मार्च रोजी पुर्णत: तयार असलेल्या  बसची खरेदीची ऑर्डर देण्यासाठी काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तर मित्रांनो  आपल्या भारतात सार्वजनिक बसवाहतूक व्यवस्थेत सर्वप्रथम 2×2 या पद्धतीची आसने बसवून  प्रवाश्यांना आरामदायी प्रवाश्याची अनुभुती देणाऱ्या आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाने पुन्हा एकदा 3×2 बसेस चालवण्याचे ठरवले आहे‌.4 मार्चच्या काढलेल्या परीपत्रकातून हे स्पष्ट झाले आहे. तसेच आता  हवेच्या दाबाने उघडणारे न्युमटिक दरवाजे ही बसेससाठी सर्वसामान्य बाब झाली असताना, या बसेससाठी पुर्वीप्रमाणे खटकीचे...

नेपाळची लोकशाही धोक्यात

Image
  नेपाळ, भारताखेरीज हिंदू बहुसंख्य असलेला भारताचा शेजारी. भुतानखेरीज भारतीयांना कायमस्वरुपी व्हिसा फ्री प्रवेश असणारा देश हा नेपाळ सध्या मात्र राजकीय आंदोलनात गटंगळ्या खातोय. तस बघायला गेलो तर नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. मात्र ही व्यवस्था मोडीत काढत देशात सौदी अरेबिया सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसी या प्रकारची राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत. मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत        2001 जून 3 रोजी नेपाळचा भावी राजा दिपेंद्र याने आवडत्या मुलीशी राजघराण्यातील व्यक्ती लग्न करु देत नाहीत, या रागातून राजपरीवाराच्या केलेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या पोकळीपासूनच नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.  त्या हत्याकांडानंतर राज...