पुन्हा एकदा संतोष माने!
ती नेहमीप्रमाणे पुण्यातील एक सकाळ होती सुट्टीचा दिवस नसल्याने सर्वजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते मात्र काय त्यांच्यावर ओढवणार आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. त्यावेळी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या ठिकाण असणाऱ्या स्वारगेट परिसरात एका एसटी बस ड्रायव्हरने बस भरधाव पणे बस चालवत नऊ जणांना मृत्युमुखी पाडले तर किमान 30 जणांना गंभीरित्या जखमी केली
आज ही घटना संतोष माने प्रकरण या नावाने प्रसिद्ध आहे. ही घटना घडली 25 जानेवारी 2012 रोजी त्यानंतर या प्रकरणातील आरोपी संतोष माने यांच्यावर पुणे सत्र न्यायालय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला . पुणे सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी संतोष माने यांना फाशीची शिक्षा सुनावली मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते हे कृत्य करताना तणावात होते असे निरीक्षण नोंदवात त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. आज संतोष माने येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय . संतोष माने यांनी वरिष्ठांचा जाचाल कंटाळून हे कृत्य केले होते मात्र आज हे वरिष्ठ शांतपणे आपल्या घरात बसले असतील.आणि संतोष माने तूरुंगात खितपत पडले आहेत.
हे सर्व सांगायचे कारण म्हणजे या घटनेची आठवण व्हावी,असी घटना नुकतीच घडली ती देखील पुण्यात यात देखील एक डायव्हर दोषी ठरला आहे आता हा डायव्हर देखील संतोष माने यांची चूकीची पद्धत पुढे नेत तूरुंगात खितपत पडेल.
हिंजवडीच्या घटनेत सुद्धा वरीष्ठांचा त्रासातून जनार्दन हंबर्डिकर यांनी वरीष्ठांच्या त्रासातून हे कृत्य केल्याचे समोर येत आहे.हा लेख वाचणाऱ्यांपैकी अनेकजण खासगी नोकरीत असतील त्यामुळे खासगी नोकरीत काय त्रास होतो,हे माहिती असेलच.अवास्तव वाटणारे टार्गेट पुर्ण करण्याबाबत वरीष्ठाचा दबावचा अनेकांनी अनुभव घेतला असेलचं या अनुभवातून मात्र हा त्रास दुर करण्याचा मार्ग जनार्दन यांनी अवंलबलेला कदापी योग्य नाही हे ही जाणालाचं त्यांनी नोकरी बदलायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. किंवा पोलीसात जावून वरीष्ठ विनाकारण त्रास देत आहेत, हे सांगायला पाहिजे होते.पोलीसात गेल्याने त्यांची विद्यमान नोकरी जरी गेली असती, तरी वरीष्ठाना काही प्रमाणात चाप बसला असता. मात्र असे न करता त्यांनी आपल्या त्रासाला मोकळी वाट करण्यासाठी चुकीचा उपाय योजत आयुष्याचे मातेरे केले आहे. हे कोणीही नाकारु शकत नाही.
सरकारनेही या प्रकारणातून धडा घेत खासगी क्षेत्रात वेठबिगारी सदृश्य स्वरुपाचे वर्तन अनेक ठिकाणी घडते यावर रोखण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.काही महिन्यापुर्वी पुण्यातच एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला वरीष्ठांकडून देण्यात आलेल्या अती कामामुळे जीव गमावला होता,त्यावेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या असता तर ही घटना काही प्रमाणात रोखली गेली असती. ती चूक सुधारण्याची संधी सरकारला पुन्हा एकदा मिळाली आहे. तरी सरकारने ही साखळी थांबवण्यासाठी पाउले उचलणे आवश्यक आहे.कारण यात होणारी मनुष्यहानी अखेर राज्याचे नुकसान करणारी आहे जे राज्याला परवडणारे नाही.
Comments
Post a Comment